'या' केमिकल कंपनीच्या शेअरने केले १ लाखाचे १ कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Multibagger Stock: मल्टीबॅगर शेअर म्हणजे ज्या शेअरची किंमत सुरूवातीला अत्यंत कमी होती मात्र त्याची किंमत आता खूपच वाढली आहे. असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे, दीपक नायट्राईट (Deepak Nitrite) या केमिकल कंपनीचा.

Deepak Nitrite stock has become Multibagger
दीपक नायट्राईटचा शेअर बनला मल्टीबॅगर 

थोडं पण कामाचं

  • कोरोना महामारीनंतर भारतीय शेअर बाजारात अनेक शेअर्स बनले मल्टीबॅगर
  • दीपक नायट्राईटच्या शेअर दिला १० वर्षात तब्बल १०,६१८ टक्के म्हणजेच १०६ पट परतावा
  • १० वर्षांपूर्वी गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे आज झाले १.०६ कोटी रुपये

मुंबई: कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर (Corona Pandemic)आलेल्या संकटामुळे भारतीय शेअर बाजार (Indian stock market)कोसळला होता. मात्र त्यानंतर काही महिन्यातच शेअर बाजाराने (Share market) उसळी घेतली. त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या संख्येने मल्टीबॅगर (Multibagger stock) शेअर दिसून येत आहेत. मल्टीबॅगर शेअर म्हणजे ज्या शेअरची किंमत सुरूवातीला अत्यंत कमी होती मात्र त्या शेअरच्या किंमतीत आता खूप मोठी वाढ झाली आहे. अशा शेअरमध्ये गुंतवणूक करणारे कोट्यधीश झाले आहेत. यावर्षी अनेक स्मॉलकॅप आणि मिडकॅप श्रेणीतील कंपन्यांचे शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत. असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे दीपक नायट्राईट  (Deepak Nitrite) या केमिकल कंपनीचा. (Multibagger Stock, Investment of Rs 1 lakh in Deepak Nitrite become Rs 1.06 in 10 years)

दीपक नायट्राईट १० वर्षात दिला १०,००० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

दीपक नायट्राईट ही एक केमिकल उत्पादक कंपनी आहे. दीपक नायट्राईटच्या शेअरची किंमत ८ जुलै २०११ला १८.५० रुपये प्रति शेअर इतकी होती. १२ जुलै २०२१ला म्हणजेच काही दिवसांपूर्वी दीपक नायट्राईटच्या शेअर किंमत १,९८३ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचली आहे. याचाच अर्थ या शेअरने मागील १० वर्षात तब्बल १०,६१८ टक्के म्हणजेच १०६ पट परतावा दिला आहे. दीपक नायट्राईटच्या शेअरमध्ये १० वर्षांपूर्वी जर एखाद्या व्यक्तीने १ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल तर आज त्याच्या १ लाख रुपयांचे १.०६ कोटी रुपये झाले असतील.

स्पेशिअॅलिटी केमिकल्स कंपन्यांची दणदणीत वाढ

भारतातील स्पेशिअॅलिटी केमिकल्स कंपन्यांची कामगिरीत आगामी काळात चांगली होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. भारतात पुढील ५ वर्षात स्पेशिअॅलिटी केमिकल्सचा व्यवसाय दुप्पट होण्याची शक्यता आहे. सध्या भारतातील स्पेशिअॅलिटी केमिकल्स इंडस्ट्री वार्षिक १२.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील ५ वर्षे वाढीचा हाच दर राहण्याची चिन्हे आहेत. २०२५ पर्यत भारतातील स्पेशिअॅलिटी केमिकल्स कंपन्यांचा व्यवसाय जवळपास ६४ अब्ज डॉलरवर पोचू शकतो.

आगामी काळातदेखील तेजीची शक्यता

आगामी काळातदेखील दीपक नायट्राईटची कामगिरी चांगली होण्याची अपेक्षा आहे. सरलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीने दणदणीत कामगिरी केली आहे. भरपूर मागणी आणि वाढलेल्या किंमती याचा फायदा कंपनीला झाला आहे. आपल्या उत्पादनांच्या श्रेणीत दीपक नायट्राईट बाजारातील आघाडीची कंपनी आहे. मोतीलाल ओस्वालसारख्या ब्रोकरेज फर्म आगामी काळात दीपक नायट्राईटच्या शेअरची किंमत २,३०० रुपये प्रति शेअरपर्यत वाढेल असा अंदाज व्यक्त करत आहेत. अर्थात शेअर बाजारातील गुंतवणुकीत चढउतार दोन्ही असतात. त्यामुळे एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या मोहात शेअर बाजारात गुंतवणूक करू नये.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी