Multibagger stock: 'या' इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरने थोड्याच अवधीत केले १ लाखाचे ४ लाख

Multibagger stock: १ जानेवारी २०२१ हा शेअर ४२.३० रुपयांच्या पातळीवर होता. तर सध्या हा शेअर १७४.६० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. शेअरने जवळपास ३१२.७६ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला

Multibagger stock investment
मालामाल करणारा जबरदस्त शेअर 

थोडं पण कामाचं

  • काही छोटे शेअर ज्यांची किंमतदेखील फारच नगण्य असते, असे शेअर अनेकवेळा जबरदस्त कमाई करून देतात
  • इलेकॉन इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरने गुंतवणूक काही पटींनी वाढवली आहे
  • साडेआठ महिन्यांच्या कालावधीतच या शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा ४ पट केला आहे

मुंबई: Multibagger stock: शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूक यादृष्टीने २०२१ हे वर्ष एक जबरदस्त वर्ष ठरले आहे. अनेक शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अनेक शेअर्सनी १०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मात्र काही शेअर असे आहेत की ज्यांनी काही महिन्यातच गुंतवणुकदारांचा पैसा काही पटींनी वाढवला आहे. इलेकॉन इंजिनियरिंग कंपनीचा (Elecon Engineering Company)शेअरदेखील असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे. प्रसिद्ध गुंतवणुकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्येदेखील इलकॉन इंजियरिंग कंपनीचा शेअर आहे. सध्या हा शेअर १७५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. मागील फक्त काही महिन्यातच या शेअरची किंमत काही पटींनी वाढली आहे. (Share market: Multibagger stock, Investment of Rs 1 lakh in Elecon Engineering Company become Rs 4 lakhs in 8 months)

इलेकॉन इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरचा परतावा

विजय केडिया हे देशातील प्रसिद्ध गुंतवणुकदार असून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एप्रिल ते जून या तिमाहीच्या काळात इलेकॉन इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरचा समावेश करण्यात आला होता. मागील फक्त ५ सत्रांमध्येच या शेअरची किंमत साडेतीन पट झाली आहे. मागील महिनाभरात त्यात घसरणदेखील झाली होती. मात्र मागील ६ महिन्यांच्या कालावधीत या मल्टीबॅगर शेअरने १७० टक्के परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. तर यावर्षी आतापर्यत म्हणजे जानेवारी २०२१पासून आतापर्यत इलेकॉन इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरने जवळपास ३१२.७६ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. १ जानेवारी २०२१  हा शेअर ४२.३० रुपयांच्या (Share price of Elecon Engineering Company)पातळीवर होता. तर सध्या हा शेअर १७४.६० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. 

१ लाखाचे झाले ४.२ लाख

याचाच अर्थ जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास ४.२ लाख रुपये झाले आहे. सहा महिन्यापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास २.६० लाख रुपये झाले असते. साडेआठ महिन्यांच्या कालावधीतच या शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा चौपटपेक्षा जास्त वाढवला आहे. इलेकॉन इंजिनियरिंग कंपनीची स्थापना १९५१मध्ये झाली होती. कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील आनंद येथे आहे. औद्योगिक उपकरणे, यंत्रसामुग्री बनवण्याच्या व्यवसायात ही कंपनी आहे. औद्योगिक गिअर सिस्टम, खाणउद्योगातील उपकरणे, मशिनरी, मटेरियल हॅंडलिंग यंत्रे बनवण्याच्या क्षेत्रात इलेकॉन इंजिनियरिंगही आशियातील आघाडीची कंपनी आहे.

शेअर बाजाराची घोडदौड आणि तुम्ही

शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या विक्रमी पातळीवर पोचले असून या तेजीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. बाजारातील दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोचले आहेत. अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ दिसत असल्याने शेअर बाजाराच्या तेजीला वातावरण अनुकूल झालेले दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजार सध्या मोठ्या तेजीत आहे. मात्र या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. कारण चढ उतार हा बाजाराचा स्थायी भाव आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी