Multibagger Stock: 'या' फार्मा कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना दिले पैशाचे व्हिटामिन, केले १ लाखाचे २५ लाख

Multibagger share: सध्या ५६२.४५ रुपये किंमत असणारा हा शेअर १५ सप्टेंबर २०१६ला फक्त २२.५३ रुपयांना मिळत होता. या पाच वर्षांमध्ये या शेअरची किंमत २५ पटींनी वाढली आहे.

Multibagger Stock of Kwality Pharmaceuticals Ltd
क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.च्या शेअरची जबरदस्त घोडदौड 

थोडं पण कामाचं

  • काही छोटे शेअर ज्यांची किंमतदेखील फारच नगण्य असते, असे शेअर दीर्घकालावधीत गुंतवणुकदारांना मोठी कमाई करून देतात
  • क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.च्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे
  • पाच वर्षात या शेअरमधील गुंतवणूक २५ पट झाली आहे

मुंबई: Multibagger Stock: कोरोना काळात औषधनिर्मिती क्षेत्रावर सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे. शेअर बाजारातदेखील फार्मा कंपन्यांच्या शेअर्सना चांगलीच तेजी आली आहे. या शेअर्सनी गुंतवणुकदारांना चांगलीच कमाई करून दिली आहे. काही शेअर्स इतक्या कमी कालावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करतात की त्याचा अंदाज बांधणे अवघड होऊन बसते. काही कंपन्यांचे शेअर अत्यंत कमी किंमतींना बाजारात उपलब्ध असतात. मात्र हे शेअर नंतर मोठी झेप घेत गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवतात. शेअर बाजारातील तेजीमुळे काही फार्मा शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. या तेजीमुळे काही शेअर्स अल्पावधीत मल्टीबॅगर शेअर (Multibagger share) बनले आहेत. फक्त काही महिन्यांमध्येच या शेअर्सनी गुंतवणुकदारांना काही पटींनी पैसा कमावून दिला आहे. 'क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.' (Kwality Pharmaceuticals Ltd)या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. सध्या शेअर बाजारात 'क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.' च्या शेअरची किंमत ५६२.४५ रुपये प्रति शेअर इतकी आहे. (Share market: Multibagger Stock, Investment of Rs 1 lakh in Kwality Pharmaceuticals Ltd become Rs 25 lakhs in 5 years)

गुंतवणूक २५ पट करणारा शेअर

मागील फक्त एका वर्षात 'क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.' या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल १० पटींपेक्षा अधिकने वाढली आहे. सध्या हा शेअर ५६२.४५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. तर १२ महिन्यांपूर्वी म्हणजे १५ सप्टेंबर २०२० ला 'क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.' च्या शेअरची किंमत (Share price of Kwality Pharmaceuticals Ltd)फक्त ५५.५० रुपये प्रति शेअर इतकी होती. या कालावधीत ''क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.''च्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. वर्षभराच्या कालावधी या शेअरने जवळपास ९१३.४२ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. म्हणजे १२ महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या (Investment)१ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास १० लाख रुपये झाले आहे. या शेअरने गुंतवणुकदारांसाठी चांगलीच संपत्ती (Wealth creation) निर्माण केली आहे. तर पाच वर्षात या शेअरने तब्बल २३९३.७८ टक्के परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. म्हणजेच पाच वर्षात या शेअरमधील गुंतवणूक २५ पट झाली आहे.

१ लाखाचे झाले २५ लाख

याचाच अर्थ पाच वर्षापूर्वी 'क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.'च्या शेअरमध्ये केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास २५ लाख रुपये झाले आहे. १२ महिन्यापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास १०लाख रुपये झाले असते. सध्या ५६२.४५ रुपये किंमत असणारा हा शेअर १५ सप्टेंबर २०१६ला फक्त २२.५३ रुपयांना मिळत होता. या पाच वर्षांमध्ये या शेअरची किंमत २५ पटींनी वाढली आहे. 

क्वालिटी फार्मास्युटिकल्स लि.चा व्यवसाय

ही एक फार्मास्युटिकल्स क्षेत्रात म्हणजे औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापना १९८३ मध्ये झाली होती. विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती ही कंपनी करते. कोरोना काळात औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेअर बाजारात औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली आहे. त्याचा फायदा कंपनीच्या शेअरलादेखील झाला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी