'चॉकलेट' न खाता, 'हा' शेअर घेतला असता तर झाली असती लाखोंची कमाई...छोटा पॅकेट बडा धमाका!

२९ जून २०२०ला गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरची किंमत ५.५० रुपये प्रति शेअर (Share price of Gita Renewable Energy) इतकी होती. आज मुंबई शेअर बाजारात हाच शेअर २०३.८५ रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे.

Multibagger share of Gita Renewable Energy
गीता रिन्यूएबलची शेअरची तुफान कमाई 

थोडं पण कामाचं

  • अतिशय कमी किंमतीत मिळणाऱ्या या शेअरने गुंतवणुकदारांना करून दिली छप्परफाड कमाई
  • गीता रिन्यूएबल एनर्जीने मागील १२ महिन्यात दिला ४,००० टक्के परतावा
  • एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये फक्त ५,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज २ लाख रुपये किंवा एक लाखाचे झाले ४० लाख

मुंबई: शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करायची असेल आणि त्यातून चांगली कमाई करायची असेल (Making Money from Share Market) तर त्यासाठी मोठी रक्कम किंवा मोठे भांडवल हवे असा एक समज आहे. मात्र असे अजिबात नाही, काही अतिशय छोट्या किंमतीचे शेअर्सदेखील तुमचे नशीब पालटू शकतात. अगदी माफक गुंतवणुकद्वारे (Investment) देखील तुम्ही जबरदस्त कमाई करू शकता. असाच एक छोटा पॅकेट बडा धमाका असणारा शेअर आहे गीता रिन्यूएबल एनर्जी (Gita Renewable Energy)या कंपनीचा. हा एक पेनी स्टॉक (Penny stock) होता, म्हणजे या शेअरची किंमत फक्त ५ रुपये होती. मात्र फक्त १२ महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना थोडेथोडका नव्हे तर ४,००० टक्क्यांचा परतावा दिला आहे. श्रीमंत कसे व्हावे (How to become Rich) या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असणाऱ्यांसाठी असे शेअर म्हणजे लॉटरीसारखेच असतात. २९ जून २०२०ला गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरची किंमत ५.५० रुपये प्रति शेअर (Share price of Gita Renewable Energy)इतकी होती. आज मुंबई शेअर बाजारात हाच शेअर २०३.८५ रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे. (Share Market : Multibagger Stock, Investment of Rs 5,000 in Gita Renewable Energy become Rs 2 lakhs in 12 months)

वर्षभरात फक्त ५,००० रुपयांचे २ लाख करणारा शेअर

अतिशय कमी किंमत असणाऱ्या शेअर्सना पेनी स्टॉकदेखील म्हणतात. कारण त्यांची किंमत फारच कमी असते. या कंपनीच्या शेअरची किंमतदेखील ५ रुपयांच्या आसपास होती. म्हणजेच आपण एरवी एखादे चॉकलेट विकत घेतो तितकीच. अशा कंपनीचे शेअर्स जर एखाद्याने नियमितपणे विकत घेतले असते, तर फार थोड्या गुंतवणुकीत त्याला जबरदस्त कमाई करता आली असती. गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरमध्ये मागील वर्षी जून महिन्यात गुंतवणूक करणाऱ्याला फकत्त वर्षभरातच ४,००० टक्क्यांचा छप्परफाड परतावा मिळवता आला असता. गीता एनर्जी रिन्यूएबलच्या शेअरमध्ये गुंतवलेल्या फक्त ५,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज २ लाख रुपये झाले असते किंवा जर एखाद्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आजे त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल ४० लाख रुपये झाले असते. या तुलनेत सेन्सेक्समध्ये फक्त ३८.३७ टक्क्यांची वाढ वर्षभरात झाली आहे. गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरच्या किंमतीत २,७९७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील फक्त एका महिन्यात या शेअरने १५४ टक्क्यांची तेजी दाखवली आहे. मुंबई शेअर बाजारात या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. फक्त २१ दिवसांतच या शेअरच्या किंमत १५४.२९ टक्क्यांनी वाढली आहे.

श्रीमंत बनवणारा गीता रिन्यूएबल एनर्जीचा शेअर

एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी ७३.०५ टक्के इतकी होती तर सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडे कंपनीच्या २६.९५ टक्के मालकी होती. फक्त ४,१९१ सर्वसाधारण गुंतवणुकदारांकडे या कंपनीचे ११.०८ लाख शेअर्स होते. याचाच अर्थ मागील तिमाहीमध्ये या शेअरी खरेदी किंवा विक्री फार कमी प्रमाणात झाली होती. हा छोटासा पेनी स्टॉक आज एक मल्टीबॅगर शेअर बनला आहे. फारच थोड्या गुंतवणुकीतून या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. गीता रिन्यूएबल एनर्जीचा शेअर आपल्या ५ दिवस, २० दिवस, ५० दिवस, १०० दिवस आणि २०० दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजवर आहे. 

रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये सर्वात चांगली कामगिरी

गीता रिन्यूएबल एनर्जी ही कंपनी तामिळनाडूस्थित आहे. २०१० मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. मागील एका वर्षात या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअरपेक्षा या कंपनीच्या शेअरने कितीतरी जास्त घवघवीत परतावा दिला आहे. याच क्षेत्रातील इतर कंपन्यांशी तुलना करता हा फरक लक्षात येतो. एका वर्षात रवींद्र एनर्जी (Ravindra Energy)या कंपनीचा शेअर १२१.४७ टक्क्यांनी वाढला आहे, तर जीव्हीके पॉवर अॅंड इन्फ्रा (GVK Power and Infra) या आघाडीच्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत फक्त २७.११ टक्क्यांची वाढ वर्षभरात झाली आहे. ऊर्जा ग्लोबल (Urja Global)या कंपनीच्या शेअरमध्ये मागील वर्षभरात १६२.१३ टक्क्यांची तेजी आली आहे. ओरिएंट ग्रीन पॉवर (Orient Green Power Company) या याच क्षेत्रातील आणखी एका कंपनीच्या शेअरची किंमत ६३.७७ टक्क्यांनी वाढली आहे. त्याउलट गीता रिन्यूएबल एनर्जीचा शेअर ४,००० टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीची तोट्यातून फायद्याकडे वाटचाल

गीता रिन्यूएबल एनर्जीला सप्टेंबर २०१७ला सरलेल्या तिमाहीपासून सातत्याने तोटाच होत होता. मार्च २०२१ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीला जेमतेम १५ लाख रुपयांचा नफा मिळाला होता. यात विशेष गोष्ट म्हणजे मागील पाच वर्षांमध्ये कंपनीच्या वार्षिक उत्पन्नातील वाढ उणे ६३ टक्के आहे. म्हणजेच कंपनीचा महसूल ६३ टक्क्यांनी घटला होता. मार्च २०२१अखेर कंपनीने निव्वळ नफ्यात १३१.९१ टक्क्यांची वाढ नोंदवली आणि १५ लाख रुपयांचा नफा कमावला. याच कालावधीत २०२०मध्ये कंपनीला ४७ लाख रुपयांचा तोटा झाला होता.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी