Multibagger stock | या छोट्याशा शेअरने वर्षभरात केले १ लाखाचे २ कोटी, बंपर परतावा, तुफान कमाई

सध्या गोपाला पॉलीप्लास्टचा शेअर ९४८.५५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त वर्षभरापूर्वी म्हणजे २६ ऑक्टोबर २०२०ला हा शेअर ४.४६ रुपये या किंमतीला उपलब्ध होता.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • गुंतवणुकदारांना करोडपती बनवणारा शेअर
  • गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरच्या किंमत जवळपास २१३ पट वाढ
  • १ लाखाच्या गुंतवणुकीचे झाले २.१३ कोटी

मुंबई: Multibagger stock : शेअर बाजारानाचे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोचले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांनी अभूतपूर्व पैसा कमावला आहे. सध्याच्या बाजारातील तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. गुंतवणुकदारांना न भूतो न भविष्यति: अशी घोडदौड अनुभवायला मिळते आहे. काही शेअर्सनी जबरदस्त घोडदौड करत काही महिन्यातच गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. जे शेअर्स असे कित्येक पटींनी गुंतवणूक वाढवतात त्यांना मल्टीबॅगर शेअर म्हणतात. तर काही शेअर जे काही वर्षांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी अतिशय किरकोळ किंमतीत उपलब्ध होते त्यांनी आज गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. असाच एक शेअर आहे गोपाला पॉलीप्लास्ट (Gopala Polyplast)या कंपनीचा. सध्या गोपाला पॉलीप्लास्टचा शेअर ९४८.५५ रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. (Share market: Multibagger Stock of Gopala Polyplast turned Rs 1 lakh to Rs 2.13 crore in 12 months)

छप्परफाड परतावा, गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस

सध्या गोपाला पॉलीप्लास्टचा शेअर ९४८.५५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त वर्षभरापूर्वी म्हणजे २६ ऑक्टोबर २०२०ला हा शेअर ४.४६ रुपये या किंमतीला उपलब्ध होता. या १२ महिन्यांच्या कालावधीत गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास २१,१६७ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना अक्षरश: चिल्लरमधून करोडोंची कमाई करून दिली आहे. फक्त एका वर्षात या शेअरच्या किंमती आभाळावर पोचल्या आहेत.

१ लाखाच्या गुंतवणुकीचे झाले २.१३ कोटी

गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरच्या किंमत फक्त काही महिन्यांच्याच कालावधीत जवळपास २१३ पट वाढ झाली आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज जवळपास २.१३ कोटी रुपये झाले आहे. साडेतीन महिन्यात या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास २१,१६७ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. १२ महिन्यात या शेअरमधील गुंतवणूक २१३ पटींनी वाढली आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे श्रीमंत (Wealth creation)बनवले आहे. गुंतवणुकदार फक्त एका वर्षात करोडपती बनले आहेत. सहा महिन्यात या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ६७ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत.

शेअर बाजारातील तेजी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्सने मागील काही महिन्यात अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सध्या शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर पोचले असून त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढल्या आहेत. शेअर बाजारातील ही तेजी कल्पनेपलीकडची आहे. चढ आणि उतार हे शेअर बाजाराचे अविभाज्य घटक आहेत.  या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे जोखमीचे ठरेल. सध्या सेन्सेक्स विक्रमी पातळीवर पोचला आहे. ही सेन्सेक्सची आतापर्यतची उच्चांकी पातळी आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी