Multibagger stock | या फार्मा कंपनीने गुंतवणुकदारांना दिले पैशाचे व्हिटामिन, दीड रुपयाच्या शेअरने केले १ लाखाचे ५० लाख

सध्या मार्कसन्स फार्मा लि.चा शेअर ६९.८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी म्हणजे २९ जून २०१२ला हा शेअर १.४० रुपये या किंमतीला उपलब्ध होता. या दहा वर्षांच्या कालावधीत मार्कसन्स फार्माच्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास ४,८८६ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे.

Multibagger Stock of Marksans Pharma Ltd
मार्कसन्स फार्माचा मल्टीबॅगर शेअर 

थोडं पण कामाचं

  • मार्कसन्स फार्मा लि. गुंतवणुकदारांना पैशाचे व्हिटामिन देत श्रीमंत बनवले आहे
  • दहा वर्षांच्या कालावधीत मार्कसन्स फार्माच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे
  • लाखाचे मूल्य आज जवळपास ५० लाख रुपये झाले

मुंबई: Multibagger stock : शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना अभूतपूर्व पैसा कमावून दिला आहे. सध्याच्या बाजारातील तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. गुंतवणुकदारांना न भूतो न भविष्यति: अशी घोडदौड अनुभवायला मिळते आहे. एरवी दीर्घकालावधीत मोठा नफा कमावण्याचा शिरस्ता असताना काही शेअर्सनी जबरदस्त घोडदौड करत मागील वर्षभरात किंवा काही महिन्यातच गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. जे शेअर्स असे कित्येक पटींनी गुंतवणूक वाढवतात त्यांना मल्टीबॅगर शेअर म्हणतात. तर काही शेअर जे दहा वर्षांपूर्वी अतिशय किरकोळ किंमतीत उपलब्ध होते त्यांनी आज गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. असाच एक शेअर आहे मार्कसन्स फार्मा लि. (Marksans Pharma Ltd.)या औषधनिर्मितीच्या क्षेत्रात असलेल्या कंपनीचा. सध्या मार्कसन्स फार्माचा शेअर ६९.८० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या फार्मा कंपनीने गुंतवणुकदारांना पैशाचे व्हिटामिन देत श्रीमंत बनवले आहे. (Share market: Multibagger Stock of Marksans Pharma Ltd. turned Rs 1 lakh to Rs 50 Lakhs in 10 years)

शेअरने गुंतवणुकदारांना करून दिली जबरदस्त कमाई

सध्या मार्कसन्स फार्मा लि.चा शेअर ६९.८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी म्हणजे २९ जून २०१२ला हा शेअर १.४० रुपये या किंमतीला उपलब्ध होता. या दहा वर्षांच्या कालावधीत मार्कसन्स फार्माच्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास ४,८८६ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. तर एप्रिल २०२० मध्ये हा शेअर २० रुपयांच्या पातळीवर होता. म्हणजे फक्त वर्षभरात शेअरने जवळपास २५० टक्क्यांचा परतावा दिला आहे. मार्कसन्स फार्मा ही एक आघाडीची फार्मा कंपनी असून कंपनीची स्थापना १९९२ मध्ये झाली होती.

१ लाखाचे झाले ५० लाख

मार्कसन्स फार्मा लि.च्या शेअरची किंमत सध्या ६९.८० रुपये प्रति शेअर आहे. . या शेअरच्या किंमत १० वर्षांच्या कालावधीत जवळपास ५० पट वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज जवळपास ५० लाख रुपये झाले आहे. १० वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास ४,८८६ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे श्रीमंत बनवले आहे. 

शेअर बाजारातील गुंतवणूक

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्सने मागील काही महिन्यात अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सध्या शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर पोचले असून त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढल्या आहेत. शेअर बाजारातील ही तेजी कल्पनेपलीकडची आहे. चढ आणि उतार हे शेअर बाजाराचे अविभाज्य घटक आहेत.  या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे जोखमीचे ठरेल.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी