Multibagger stock | या ३ रुपयांच्या शेअरने फक्त तीन महिन्यात केले १ लाखाचे २४ लाख

सध्या ताझा इंटरनॅशनल लि.चा शेअर ७१.७५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त साडेतीन महिन्यांपूर्वी म्हणजे १ जुलै २०२१ला हा शेअर ३ रुपये या किंमतीला उपलब्ध होता.

Multibagger Stock of Taaza International
ताझा इंटरनॅशनलचा मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • काही शेअर्सनी काही महिन्यातच गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे
  • ताझा इंटरनॅशनलच्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास २,२९२ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला
  • या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज जवळपास २४ लाख रुपये झाले

मुंबई: Multibagger stock : शेअर बाजारानाचे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोचले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांनी अभूतपूर्व पैसा कमावला आहे. सध्याच्या बाजारातील तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. गुंतवणुकदारांना न भूतो न भविष्यति: अशी घोडदौड अनुभवायला मिळते आहे. काही शेअर्सनी जबरदस्त घोडदौड करत काही महिन्यातच गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. जे शेअर्स असे कित्येक पटींनी गुंतवणूक वाढवतात त्यांना मल्टीबॅगर शेअर म्हणतात. तर काही शेअर जे काही वर्षांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी अतिशय किरकोळ किंमतीत उपलब्ध होते त्यांनी आज गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. असाच एक शेअर आहे ताझा इंटरनॅशनल लि. (Taaza International Ltd)या कंपनीचा. सध्या ताझा इंटरनॅशनलचा शेअर ७१.७५ रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. (Share market: Multibagger Stock of Taaza International Ltd turned Rs 1 lakh to Rs 24 Lakhs in 3.5 months)

शेअरने गुंतवणुकदारांना करून दिली जबरदस्त कमाई

सध्या ताझा इंटरनॅशनल लि.चा शेअर ७१.७५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त साडेतीन महिन्यांपूर्वी म्हणजे १ जुलै २०२१ला हा शेअर ३ रुपये या किंमतीला उपलब्ध होता. या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ताझा इंटरनॅशनलच्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास २,२९२ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. तर ताझा इंटरनॅशनलची स्थापना २००१ मध्ये झाली होती.

१ लाखाच्या गुंतवणुकीचे झाले २४ लाख

ताझा इंटरनॅशनल शेअरच्या किंमत फक्त काही महिन्यांच्याच कालावधीत जवळपास २४ पट वाढ झाली आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज जवळपास २४ लाख रुपये झाले आहे. साडेतीन महिन्यात या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास २,२९२ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे श्रीमंत बनवले आहे. 

शेअर बाजारातील गुंतवणूक

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्सने मागील काही महिन्यात अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सध्या शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर पोचले असून त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढल्या आहेत. शेअर बाजारातील ही तेजी कल्पनेपलीकडची आहे. चढ आणि उतार हे शेअर बाजाराचे अविभाज्य घटक आहेत.  या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे जोखमीचे ठरेल. सध्या सेन्सेक्स ६१,००० अंशांच्या पातळीवर पोचला आहे. ही सेन्सेक्सची आतापर्यतची उच्चांकी पातळी आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी