राकेश झूनझूनवालाप्रमाणे तुम्हीही टाटांचा 'हा शेअर घेतला असता तर झाला असता श्रीमंत!

Multibagger Stock: ३ एप्रिल २०२०ला टाटा मोटर्सच्या शेअरच किंमत ६५.३० रुपये प्रति शेअर इतकी होती. सध्या हा शेअर ३०० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. हा एक मल्टीबॅगर शेअर बनला आहे.

Multibagger share of Tata Motors
टाटा मोटर्सचा दणदणीत परतावा 

थोडं पण कामाचं

  • टाटा समूहातील आघाडीच्या कंपनीचा हा शेअर ठरला मल्टीबॅगर
  • टाटांच्या या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल, टाटा मोटर्सने फक्त १२ महिन्यात दिला ३७० टक्के परतावा
  • राकेश झूनझूनवालाच्या पोर्टफोलिओमध्येदेखील टाटा मोटर्सचा समावेश

मुंबई: शेअर बाजाराने (Share Market)मागील वर्षभरात अनेकांना मालामाल केले आहे.  मागील वर्षभरात काही कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर्स (Multibaggers stock) ठरले आहेत. फक्त १२ महिन्यातच त्यांनी गुंतवणुकदारांना काही पटीने पैसा कमावून दिला आहे. टाटा समूहासारख्या (Tata group) देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाच्या एका शेअरने असे गुंतवणुकदारांना छप्परफाड पैसे कमावून दिले आहेत. झटपट श्रीमंत कसे व्हायचे (How to become Rich), कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे असा विचार करून शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांना या शेअरने चांगलीच कमाई करून दिली आहे. हा शेअर आहे टाटा मोटर्स (Tata Motors)या टाटा समूहातील आघाडीच्या कंपनीचा. फक्त ६५ ते ७० रुपयांच्या (Share price of Tata Motors) पातळीवर असणारा हा शेअर सध्या ३०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. शेअर बाजार गडगडला असताना, वॉरन बफेंच्या (Warren Buffett) म्हणण्याप्रमाणे जेव्हा सर्व जग शेअर विकते तेव्हा तुम्ही विकत घ्या, या तत्वानुसार ज्यांनी गुंतवणूक केली ते मालामाल झाले आहेत. टाटा मोटर्सच्या शेअरने वर्षभरात ३५० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. विशेष म्हणजे हा शेअर प्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये देखील आहे.  (Share Market : Multibagger Stock, Tata Motors share gave more than 350% returns in a year)

१२ महिन्यात केले १ लाख रुपयांचे ४.२५ लाख

टाटा समूहातील आघाडीची कंपनी असणाऱ्या टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेअरमध्ये मागील वर्षी एप्रिल महिन्यात (एप्रिल २०२०) टाटा मोटर्समध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे आज ४.२५ लाख रुपये झाले असते. फक्त वर्षभरात ३७० टक्क्यांचा जबरदस्त परतावा या शेअर दिला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर शेअर बाजार गडगडला होता, मात्र त्यानंतर काही महिन्यांनी शेअर बाजाराने चांगलीच उसळी घेतली आहे. या कालावधीत ज्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक (Share market investment) केली त्यांनी आयुष्यभराची कमाई केली आहे. जगप्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफे (Warren Buffett)म्हणतात त्याप्रमाणे, जेव्हा जग शेअर्स विकते तेव्हा तुम्ही विकत घ्या.  ३ एप्रिल २०२०ला टाटा मोटर्सच्या शेअरच किंमत ६५.३० रुपये (Share price of Tata Motors)प्रति शेअर इतकी होती. सध्या हा शेअर ३०० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. हा एक मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock) ठरला आहे. 

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे किती शेअर्स? (Rakesh Jhunjhunwala)

भारतीय शेअर बाजाराचे सध्याचे बिग बुल असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी २०२०-२१ या सरलेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेबर २०२१ या कालावधीत टाटा मोटर्सचे तब्बल ४ कोटी शेअर्स विकत घेतले होते. शिवाय झुनझुनवाला यांनी हे शेअर्स तसेच ठेवले होते. त्यांना भविष्यात हा शेअर आणखी तेजीमध्ये राहण्याची शक्यता वाटत असावी.

टाटा मोटर्सची कामगिरी (Tata Motors)

जूनअखेर सरलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत टाटा मोटर्सने १२,१५० कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. तर कंपनीचा एकूण खर्च ११,८५८ कोटी रुपये इतका होता. कंपनीला ४५.३९ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा झाला होता. मागील काही वर्षांपासून कंपनीची कामगिरी घसरली होती. तोट्यातही वाढ झाली होती. मात्र मागील वर्षभरात कंपनीच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून येते आहे. आगामी काळात कंपनीची कामगिरी अधिक चांगली होण्याची अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी