एका वर्षात ४०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, तुमच्याकडे हा शेअर आहे का?

रामको सिस्टम्स लि.च्या शेअरमध्ये (Share of Ramco Systems Limited) गुंतवणूक करणाऱ्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. फक्त वर्षभरातच हे गुंतवणुकदार (Investors)मालामाल झाले आहेत.

Multibagger share
दणदणीत कमाई करून देणारा शेअर 

थोडं पण कामाचं

  • रामको सिस्टम्स लि.च्या शेअरमधील जबरदस्त तेजी
  • कंपनीचा येमेनमधील दमदार व्यवसाय
  • फक्त १२ महिन्यात रामको सिस्टम्स लि. या कंपनीच्या शेअरने ४४७ टक्क्यांचा छप्परफाड परतावा

मुंबई: मागील फक्त १२ महिन्यात रामको सिस्टम्स लि. (Ramco Systems Limited)या कंपनीच्या शेअरने ४४७ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. त्यामुळे रामको सिस्टम्स लि.च्या शेअरमध्ये (Share of Ramco Systems Limited) गुंतवणूक करणाऱ्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. फक्त वर्षभरातच हे गुंतवणुकदार (Investors)मालामाल झाले आहेत. हा शेअर मल्टीबॅगर शेअर (multibagger)ठरला आहे. रामको सिस्टम्स लि.मध्ये वर्षभरापूर्वी गुंतवलेल्या ५ लाख रुपयांचे आज जवळपास २७.३६ लाख रुपये झाले आहेत. २९ जून २०२० ला रामको सिस्टम्सचा शेअर ११४.९ रुपयांच्या पातळीवर होता. आज या शेअरची किंमत काही पटींनी वाढून ६२८.९० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचली आहे. (Share of Ramco systems ltd has delivered 447 percent returns in just one year)

रामकोचा एडन पोर्ट्स डेव्हलपमेंटबरोबर दमदार व्यवसाय

रामको सिस्टम्स लि. एंटरप्राईस रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर विकसित करते. अलीकडेच कंपनीने घोषणा केली आहे की ती एडन पोर्ट्स डेव्हलपमेंट कंपनीला त्यांच्या एडन कंटेनर टर्मिनलसाठी एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर पुरवणार आहे. येमेनमधील या सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलशी रामको सिस्टम्सचा १२ वर्षांपासूनचा व्यवहार आहे. एडन कंटेनर टर्मिनलबरोबरचा रामकोचा व्यवसाय २००९मध्ये सुरू झाला होता. रामको सिस्टम्स आता एडन पोर्ट्स डेव्हलपमेंटला विविध प्रकारचे सॉफ्टवेअर, मोबाईल अॅप आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान पुरवणार आहे. या व्यवसायामुळे रामकोने चांगलीच कमाई केली आहे. 

रामको सिस्टम्सशीची जबरदस्त कमाई

२०२०-२१ या आर्थिक वर्षात रामको सिस्टम्स लि.चे जागतिक उत्पन्न ८.६९ कोटी डॉलर (जवळपास ६४०.९ कोटी रुपये) इतके होते. तर कंपनीचा निव्वळ नफा ७५ लाख डॉलरवर (जवळपास ५५.८ कोटी रुपये) पोचला होता. रामकोने या कालावधीत पुरेशी रोख रक्कमदेखील कमावली आहे ज्यातून कंपनी कर्जमुक्त झाली आहे. ३१मार्च २०२१ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने ७.३५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला ५.८५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मार्च २०२१ अखेर कंपनीचे एकूण उत्पन्न १२.८६ टक्क्यांनी वाढून १५२.९२ कोटी रुपयांवर पोचले आहे.

अर्थातच कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची कामगिरी आणि व्यवसायाचे स्वरुप जाणून घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे तुमच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीतील जोखीम कमी होते आणि त्याचे रुपांतर एखाद्या सट्टयामध्ये होत नाही. शेअरच्या किंमती जशा झपाट्याने वर जाऊ शकतात तशाच त्या खालीदेखील येऊ शकतात. आपली जोखीम क्षमता लक्षात घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. जोखीम आणि परतावा यांचे उत्तम संतुलन आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओत असले पाहिजे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी