टाटांच्या या शेअरमध्ये जबरदस्त तेजी, गुंतवणुकदारांनी काही मिनिटांत कमावले हजारो कोटी, अजूनही आहे संधी!

टायटनचे बाजारमूल्य २,१०,५२० कोटी रुपयांच्या पलीकडे पोचले आहे. टीसीएसनंतर टाटा समूहातील ही दुसरी कंपनी आहे जिचे बाजारमूल्य २ लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे.

Rakesh Jhunjhunwala's investment Tata Group shares
टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक 

थोडं पण कामाचं

  • टाटा समूहातील (Tata Group)दोन शेअरमध्ये आज तुफान तेजी
  • टायटन आणि टीसीएस या दोन्ही कंपन्यांनी विक्रमी तेजी नोंदवली
  • सुप्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांचीदेखील या दोन्ही शेअरमध्ये चांगली गुंतवणूक

मुंबई: टाटा समूहातील (Tata Group)दोन शेअरमध्ये आज तुफान तेजी दिसून येते आहे. गुंतवणुकदारांनी फक्त मिनिटांमध्येच हजारो कोटी रुपये त्यामुळे कमावले आहेत. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांचीदेखील या दोन्ही शेअरमध्ये चांगली गुंतवणूक आहे. शेअर बाजारातील तेजीमध्ये या दोन्ही कंपन्यांचा मोठा वाटा आहे. टाटा समूहाची टायटन आणि टीसीएस या दोन्ही कंपन्यांनी विक्रमी तेजी नोंदवली आहे. टायटनने आज ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. सध्या टायटनचा (Titan)शेअर २,३६१ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर टाटा समूहाचा मुकुटमणी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा म्हणजे टीसीएसचा (TCS)शेअरदेखील जबरदस्त तेजीत असून ३,८८९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. टायटनचे बाजारमूल्य २,१०,५२० कोटी रुपयांच्या पलीकडे पोचले आहे. टीसीएसनंतर टाटा समूहातील ही दुसरी कंपनी आहे जिचे बाजारमूल्य २ लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. (These two Tata Group Shares surged, investors earned thousands of Crores in few minutes)

टायटनमध्ये राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ३ कोटी ३० लाख १० हजार ३९५ शेअर्स आहेत. त्यांच्या पत्नीकडे टायटनचे ९६.४७ लाख शेअर्स आहेत. झुनझुनवाला कुटुंबाकडे टायटनचे एकूण ४.२६ कोटी शेअर्स आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनची एकूण ४.८ टक्के हिस्सेदारी आहे. मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत झुनझुनवालांकडे टायटनची एकूण ५.१० टक्के हिस्सेदारी होती. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांच्याकडे ६.७ टक्के हिस्सेदारी होती. असे दिसून येते की झुनझुनवालाने सातत्याने टायटनमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. 

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी

टाटा समूहाचीच आणखी एक महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा मोटर्समध्येदेखील ११ टक्क्यांची तेजी दिसून येते आहे. सध्या हा शेअर ११.१६ टक्क्यांची तेजी नोंदवत ३७३ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. ही टाटा मोटर्सच्या शेअरची ३ वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. टाटा मोटर्सचे बाजारमूल्य सध्या १.२४ लाख कोटी रुपये आहे.

झुनझुनवालांची टाटा मोटर्समधील गुंतवणूक

जूनअखेर सरलेल्या तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सची १.१ टक्के हिस्सेदारी होती. म्हणजेच टाटा मोटर्सच्या एकूण शेअर्सपैकी १.१ टक्के शेअर राकेश झुनझुनवाला यांच्याकडे आहेत. त्याआधी मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत त्यांच्याकडे टाटा मोटर्सचे १.३ टक्के शेअर होते. पतमानांकन एजन्सीदेखील टाटा मोटर्सच्या शेअरचे पतमानांकन वाढवले आहे. या शेअरमध्ये भविष्यात आणखी तेजी येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. टाटा मोटर्सचा शेअर हा ऑटो सेक्टरमधील अंडर व्हॅल्यूड शेअर आहे. टाटा मोटर्स सध्या मोठ्या वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांकडे वाटचाल करते आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी