Anil Ambani update | अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी...गुंतवणुकदारांमध्ये शेअर खरेदीची स्पर्धा

Reliance Capital : अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या समूहातील अनेक कंपन्या दिवाळखोर झाल्या आहेत. दिवाळखोर कंपन्यांच्या शेअरच्या किंमती जोरात गडगडात. मात्र शेअर बाजारात (Share Market)काही वेळा धक्कादायक प्रकार घडत असतात. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (Reliance Capital Ltd) या अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी आलेली आहे. मागील काही दिवसांपासून शेअर्सच्या किंमतीत जोरदार वाढ होते आहे.

Reliance Capital share
अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी 
थोडं पण कामाचं
  • रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी
  • कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4.96% वाढून 22.20 रुपयांवर पोचले
  • रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सनी गेल्या 7 ट्रेडिंग सत्रात 33.33 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली

Reliance Capital share : मुंबई : अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या समूहातील अनेक कंपन्या दिवाळखोर झाल्या आहेत. दिवाळखोर कंपन्यांच्या शेअरच्या किंमती जोरात गडगडात. मात्र शेअर बाजारात (Share Market)काही वेळा धक्कादायक प्रकार घडत असतात. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (Reliance Capital Ltd) या अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी आलेली आहे. मागील काही दिवसांपासून शेअर्सच्या किंमतीत जोरदार वाढ होते आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4.96% वाढून 22.20 रुपयांवर (Share Price of Reliance Capital) पोचले. 31 मार्च 2022 पासून, हा शेअर सतत 4% च्या वर तेजी नोंदवत व्यवहार करतो आहे. 31 मार्च 2022 ला शेअरची किंमत 16.65 रुपये होती. म्हणजेच रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सनी गेल्या 7 ट्रेडिंग सत्रात 33.33 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली आहे. (Shares of Anil Ambani's debt ridden Reliance Capital surged more than 30%)

अधिक वाचा : Multibagger Stock | फक्त 3.48 रुपयांच्या या शेअरने एक लाखाचे केले 27 लाख...गुंतवणुकदार मालामाल

22 कंपन्यांनी लावली बोली

अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटलमधील ही तेजी अदानी, टाटासह 55 मोठ्या कंपन्यांनी कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलला विकत घेण्यास स्वारस्य दाखविल्याच्या बातम्यांनंतर पाहायला मिळते आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलसाठी एकूण 55 कंपन्यांनी बोली लावली आहे. त्याच वेळी, 22 कंपन्यांनी रिलायन्स कॅपिटल तसेच बिझनेस क्लस्टरसाठी बोली लावली आहे. सर्व 22 कंपन्यांनी दोन्ही पर्यायांसाठी बोली लावली आहे तर इतरांनी केवळ निवडक व्यावसायिक गटांसाठी बोली लावली आहे. इतर संभाव्य रिझोल्यूशन अर्जदारांमध्ये अदानी फिनसर्व्ह, ऑथम इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, बंधन फायनान्शिअल होल्डिंग्स, ब्रुकफील्ड, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स, टीपीजी एशिया आणि ट्रूनॉर्थ फंड यांचा समावेश आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | फारशी चर्चा न झालेला हा आहे छुपा रुस्तम शेअर...हजार गुंतवणाऱ्यांनी कमावले लाखो!

25 मार्च ही निविदा भरण्याची शेवटची तारीख 

प्रशासकाने 18 फेब्रुवारी रोजी कंपनीसाठी बिड मागण्यासाठी स्वारस्य व्यक्त केले होते. ईओआय सादर करण्याचा शेवटचा दिवस 25 मार्च होता. यापूर्वी, 11 मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती, परंतु काही संभाव्य बोलीदारांनी ईओआय सबमिट करण्यासाठी आणखी वेळ मागितल्याने ती दोन आठवड्यांनी वाढवण्यात आली होती. या कंपनीवर एकूण 40 हजार कोटींचे कर्ज आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | अदानींच्या या शेअरने घातली आकाशाला गवसणी....27 रुपयांचा शेअर पोचला 2420 रुपयांवर

विक्री प्रक्रियेत अनेक कंपन्या

अनिल अंबानी ग्रुपच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहेत. यामध्ये रिलायन्स इन्फ्राटेल (रिलायन्स कम्युनिकेशन्सची टॉवर शाखा), रिलायन्स टेलिकॉम, रिलायन्स नेव्हल आणि रिलायन्स कॅपिटल यांचा समावेश आहे.

मोठ्या प्रमाणात चढउतार असतानादेखील भारतीय शेअर बाजाराला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. जगभरातील मोठ्या गुंतवणुकदारांचे लक्ष भारतीय शेअर बाजाराकडे आहेच, मात्र त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणुकदारांचाही कल शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वाढत चालला आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी