Multibagger Stock Tips: एक लाख गुंतवणाऱ्यास वर्षभरात ३८.८५ लाख मिळवून देणारा शेअर

Share Market News: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई / BSE) १८ डिसेंबर २०२० रोजी एक पेनी स्टॉक १ रुपया ५ पैशांवर वर बंद झाला. वर्षभरात हा पेनी स्टॉक ४० रुपये ८० पैशांवर जाऊन पोहोचला. ज्यांनी या पेनी स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते त्यांना वर्षभरात साधारण ३८.८५ लाख रुपयांची कमाई झाली.

Share Market
एक लाख गुंतवणाऱ्यास वर्षभरात ३८.८५ लाख मिळवून देणारा शेअर 
थोडं पण कामाचं
  • एक लाख गुंतवणाऱ्यास वर्षभरात ३८.८५ लाख मिळवून देणारा शेअर
  • टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) ही नॉन बँकिंग वित्त पुरवठादार कंपनी
  • कंपनी निवडक अल्पकालीन आणि मोजक्या दीर्घकालीन योजनांसाठी अर्थ पुरवठा करते

Share Market News: मुंबई :  बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई / BSE) १८ डिसेंबर २०२० रोजी एक पेनी स्टॉक १ रुपया ५ पैशांवर वर बंद झाला. वर्षभरात हा पेनी स्टॉक ४० रुपये ८० पैशांवर जाऊन पोहोचला. ज्यांनी या पेनी स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते त्यांना वर्षभरात साधारण ३८.८५ लाख रुपयांची कमाई झाली. घसघसशीत कमाई मिळवून देणाऱ्या टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉकने ३ हजार ७८५ टक्के रिटर्न दिले.  

टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉकने उत्तुंग भरारी घेतली. या कालावधीत सेन्सेक्स १८.४३ टक्के वर गेला. या वर्षी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉक त्याच्या ५२ आठवड्यांच्या रेकॉर्डमध्ये सर्वोत्तम स्थानावर होता. टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ५२ रुपये ५ पैशांवर होता. तेव्हापासूनच गुंतवणूकदार स्टॉक विकून प्राॉफिट बुक करत आहेत. 

बीएसईमध्ये टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉक सोमवारी ०.९९ टक्के वर चढला आणि ४० रुपये ८० पैशांवर जाऊन पोहोचला. फर्मचे मार्केट कॅपिटल स्टॉक वधारल्यामुळे ९९.२० कोटी रुपये झाले. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉक २ हजार ९६७ टक्के वधारला आणि एका महिन्यात ६.८१ टक्के वधारला. पण या मायक्रोकॅप शेअरमध्ये आठवड्याभरात १४.४७ टक्के घसरण दिसून आली. 

टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉक २० दिवस, ५० दिवस, १०० दिवस आणि २०० दिवस या कालावधीत मुव्हिंग अॅव्हरेजपेक्षा जास्त वधारला. पण पाच दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेजच्या तुलनेत घसरला. फर्मचे मार्केट कॅपिटल सोमवारी वाढून १०३.६५ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले. 

सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीच्या अखेर सात प्रमोटरांकडे फर्मची २५ टक्के मालकी होती आणि शेअर होल्डरकडे ७५ टक्के मालकी होती. दोन लाखांपर्यंत वैयक्तिक गुंतवणूक करणाऱ्या १ हजार २३६ शेअर होल्डरकडे (समभाग धारक) १८.१० लाख शेअर होते. सप्टेंबर अखेरीस ५.९१ टक्के मालकी हक्क १५.०२ लाख शेअरधारक असलेल्या सहा प्रमोटरांच्या हाती प्रत्येकी दोन लाखांरपेक्षा जास्त रक्कम होती. 

टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) ही नॉन बँकिंग वित्त पुरवठादार कंपनी आहे. कंपनी निवडक अल्पकालीन आणि मोजक्या दीर्घकालीन योजनांसाठी अर्थ पुरवठा करते. यामुळे आर्थिक नियोजन करणे सोपे होते. 

शेअर मार्केट संदर्भातली बातमी ही फक्त माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत धोका आहे. पण ज्यांची धोका पत्करण्याची तयारी मोठी आहे, अशांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी