Russian LNG plant : युक्रेन युद्धाचा परिणाम... भारताची रशियात घोडदौड, भारतीय कंपन्या रशियन गॅस कंपनीतील हिस्सा विकत घेण्याची शक्यता...

Shell & Indian Petroleum companies : रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर ऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्र ढवळून निघाले आहे. जगभरातील पेट्रोलियम कंपन्या आणि नैसर्गिक वायू कंपन्या आपापल्या हितांची काळजी घेण्यासाठी धडपड करत आहेत. यातून नवे व्यवहार होत आहेत. शेल ही जगातील आघाडीची ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी आता रशियातील एका प्रमुख द्रवीभूत नैसर्गिक वायू प्रकल्पातील आपला हिस्सा विकण्याचा विचार करते आहे.

Shell in discussion with Indian energy companies
शेल भारतीय कंपन्यांना विकणार रशियातील हिस्सा 
थोडं पण कामाचं
  • ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी शेल रशियातून बाहेर पडण्याच्या मार्गावर
  • शेल आपला रशियन नैसर्गिक वायू प्रकल्पातील हिस्सा विकणार
  • भारतीय कंपन्या शेलकडून रशियन कंपनीतील हिस्सा विकत घेण्याची शक्यता

Shell & Indian Oil companies deal : नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर ऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्र ढवळून निघाले आहे. जगभरातील पेट्रोलियम कंपन्या आणि नैसर्गिक वायू कंपन्या आपापल्या हितांची काळजी घेण्यासाठी धडपड करत आहेत. यातून नवे व्यवहार होत आहेत. शेल ही जगातील आघाडीची ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी आता रशियातील एका प्रमुख द्रवीभूत नैसर्गिक वायू प्रकल्पातील आपला हिस्सा विकण्याचा विचार करते आहे. शेल (Shell)ही भारतीय ऊर्जा कंपन्यांच्या गटाशी(Indian Oil Companies consortium)रशियन प्रकल्पातील आपला हिस्सा विकण्यासंदर्भात चर्चा करते आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. (Shell in discussion with Indian energy companies to sale stake in Russian LNG plant)

अधिक वाचा : Privatization of Banks : सेंट्रल बँक ऑफ इंडियासह 2 बँकांचे खाजगीकरण होण्याची चिन्हे, पाहा काय आहे सरकारची संपूर्ण योजना

पाश्चिमात्य कंपन्या रशियातून बाहेर पडण्याच्या मार्गावर

पाश्चिमात्य कंपन्यांनी रशियामधून माघार घेतल्याच्या परिणामी बाजारात येणारी ऊर्जा मालमत्ता आणि स्वस्त तेलाचा पुरवठा यावर भारत कसा पुढे जाण्यास इच्छुक आहे हे कन्सोर्टियमचे रशियन नैसर्गिक वायू प्रकल्पामधील संभाव्य घडामोडीतून दिसून येते. युरोपियन कंपन्यांवर युक्रेन युद्धामुळे रशियाचा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना रशियातून नैसर्गिक वायूचा पुरवठा युरोपात करण्यात अडचणी येत आहेत. भविष्यात नेमके काय होणार याबाबत मोठी साशंकता असल्यामुळे या कंपन्या आता रशियातून पाय काढून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अर्थात यामुळे भारतीय कंपन्यांना मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यांना स्वस्तात रशियन कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

रशियातून पाश्चात्य कंपन्या बाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर शेल या ब्रिटिश कंपनीने रशियाच्या पूर्वेकडील सखालिन-2 एलएनजी प्रकल्पातील आपला 27.5% हिस्सा विकून फेब्रुवारीमध्ये रशियन कामकाजातून बाहेर पडणार असल्याचे सांगितले.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 27 May 2022: सोन्याच्या भावात कासवाच्या गतीने वाढ, चांदीची चमक वाढली, पाहा ताजा भाव

भारताचे रशियात विस्तारासाठी प्रयत्न

या निर्णयानंतर जगातील सर्वात मोठी द्रवीभूत नैसर्गिक वायू कंपनी 3.9 अब्ज डॉलर्सच्या रशियन मालमत्तेवर पाणी सोडणार आहे. कंपनीने अलीकडेच ओएनजीसी विदेश आणि गेलसह भारतीय कंपन्यांच्या समुहाशी भागभांडवल मिळविण्यासाठी चर्चा केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. या व्यवहारावर शेल यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. ओएनजीसी, गेल आणि इतर सरकारी भारतीय कंपन्यांनीदेखील याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

शेल ही ब्रिटिश कंपनी भारतीय समूहाला एलएनजी कार्गो आणि कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी सखालिन 2 सोबत असलेल्या दीर्घकालीन सौद्यांसाठी स्वतंत्र बोलीसाठी विचारणा आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. भारत सरकारने सरकारी ऊर्जा कंपन्यांना बीपीसह युरोपियन तेल कंपन्यांकडून रशियन मालमत्ता खरेदी करण्याच्या शक्यतेचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे, अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली होती. अर्थात शेल आणि भारतीय कंपन्यांचा गट यांच्यातील चर्चा यशस्वी होत हा करार होईल की नाही हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

अधिक वाचा : Credit Card Bill Date : रिझर्व्ह बॅंकेने दिला मोठा दिलासा, आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्वतः बदलू शकता क्रेडिट कार्ड बिलाची तारीख

रशियन सरकारचीदेखील परवानगी आवश्यक

अर्थात रशियन नैसर्गिक वायू प्रकल्पाशी संबंधित कोणत्याही विक्री करारासाठी रशियाची मंजुरी देखील आवश्यक असेल, असे सूत्रांनी सांगितले. शेल सध्या सखालिन-2 मधील हिस्सा विकण्याबाबत चिनी ऊर्जा समूहांसह इतर कंपन्यांशी चर्चा करत नसल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. 

सखालिन-2 हा नैसर्गिक वायू प्रकल्प रशियन गॅस कंपनी गॅझप्रॉमद्वारे नियंत्रित आणि चालवले जाते. प्रकल्पातील इतर भागधारकांमध्ये जपानची मित्सुई अँड कंपनी आणि मित्सुबिशी कॉर्प यांचा समावेश आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शेलने आपला रशियन रिटेल आणि वंगण व्यवसाय लुकोइलला विकण्यास सहमती दर्शविली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी