हैदराबाद : ड्रिलमेक एसपीए ही हैदराबादच्या मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लि. (MEIL) या बलाढ्य उद्योग समुहाची उपकंपनी, तेलंगणातल्या हैदराबादेत स्वताचे जागतिक उत्पादन केंद्र स्थापन करणार आहे.
ड्रिलमेक एसपीए, ऑइल-ड्रिलिंग रिग्स मॅन्युफॅक्चरीगंच्या हैदराबादच्या या उत्पादन प्रकल्पासाठी USD 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे, यात उत्पादन, संशोधन आणि विकास केंद्र व यासाठी लागणारे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश असेल.
ड्रिलमेकने तेल रिग आणि सहायक उपकरणे तयार करण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या या इंटरनॅशनल हबसाठी तेलंगणा सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य विभागासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.
ड्रिलमेक एसपीएचे सीईओ सिमोन ट्रेविसानी म्हणाले, "आम्हाला भारतातील हायड्रोजन इंधन प्रकल्पात भविष्यातील गुंतवणुकीत रस आहे. हैदराबाद मॅन्युफॅक्चरिंग हब रिग मॅन्युफॅक्चरिंग आणि अनुषांगीक गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल. ह्यात R&D आणि उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र देखील असेल. आमच्या इटली, यूएसए (ह्यूस्टन) आणि बेलारूसमध्ये याआधीच 3 उत्पादन सुविधा आहेत. प्रगतीशील औद्योगिक धोरण आणि गुंतवणूकदारांसाठी तेलंगणा अनुकूल असल्याने विविध देशांच्या अनेक ऑफरचा विचार केल्यानंतर, आम्ही तेलंगणाची निवड केली
ड्रिलमेक एसपीए हे ऑनशोअर आणि ऑफशोअर अप्लिकेशन्ससाठी ड्रिलिंग आणि वर्कओव्हर रिग्सचे डिझाइन, उत्पादन आणि पुरवठा तसेच ड्रिलिंग उपकरणांसाठी स्पेअर पार्ट्सच्या विस्तृत श्रेणीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर आघाडीवर आहेत. जगभरात विश्वासार्हता हे ड्रिलमेकचने प्राप्त केलेले वैशिठ्य आहे. अभियांत्रिकी विकास, वेळेचे पालन करत वितरण आणि प्रभावी विक्री-पश्चात सेवा यामूळे ही विश्वासार्हता कंपनीने प्राप्त केली आहे.
ड्रिलमेकने आतापर्यंत जवळपास 600 ड्रिलिंग रिग्स वितरित केल्या आहेत. यात अनेक नाविन्यपूर्ण डिझाइन्स विकसित केले आहे आणि त्याचे जागतिक स्तरावर पेटंट देखील मिळवले आहे. इटलीच्या कंपनी कायद्यांतर्गत ड्रिलमेकचे नोंदणीकृत कार्यालय पॉडेन्झानो पीसी, इटली येथे असून, MEIL समूहाने 2020 मध्ये ही कंपनी अधिग्रहीत केली.
ड्रिलमेक एसपीए आणि इंडस्ट्रीज अँड कॉमर्स विभाग, तेलंगणा सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) द्वारे उपकरण निर्मिती युनिटची स्थापना करण्यात येईल.
यावेळी बोलताना मंत्री श्री. के.टी. रामाराव म्हणाले, " ड्रिलमेकने हैदराबादमध्ये त्याचे उत्पादन युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबध्दल त्याचे स्वागत आणि आम्हाला याचा रास्त अभिमान आहे. भारतातील सर्वात औद्योगिक प्रगतीशील राज्य बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. आम्ही ड्रिलमेकला संपूर्ण ड्रिलिंग रिग इकोसिस्टम तेलंगणामध्ये आणण्याची विनंती केली आहे."
ड्रिलमेक इंटरनॅशनलचे सीईओ उमा महेश्वर रेड्डी म्हणाले, "हैदराबादमध्ये जागतिक उत्पादन केंद्र निर्माण करण्याच्या दिशेने हा सामंजस्य करार हे पहिले पाऊल आहे. निश्चितपणे आम्ही जगभरातील बाजारपेठेच्या मागणीची पूर्तता करु. आमच्याकडे आधीच $1 अब्ज डॉलरची ऑर्डर बुक आहे."
श्री सिमोन ट्रेविसानी, सीईओ, ड्रिलमेक एसपीए आणि तेलगंणा सरकारतर्फे श्री जयेश रंजन, IAS, प्रधान सचिव उद्योग आणि आयुक्त औद्योगिक प्रोत्साहन, यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
ड्रिलमेकच्या प्रतिनीधीनी सांगीतले की तेलंगणा सरकारसोबत काम करणे हा मोठा सन्मान असेल तसेच हे उत्पादन केंद्र सुमारे 2,500 लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल."