5 वर्षांत 5 लाख जमा करायचे आहेत? प्रत्येक महिन्याला SIP मध्ये इतकी करा गुंतवणूक

SIP Investment: सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करु शकता. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करु शकता
  • एसआयपी किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्या संपूर्ण प्लानबाबत माहिती मिळवा

SIP investment plan and calculator: जर तुम्हीही पाच वर्षांत एखादी मोठी रक्कम जमा करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. याच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला केवळ 6500 रुपये सेव्हिंग करुन पाच वर्षांत पाच लाख रुपयांहून अधिक पैसे जमा करु शकता. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP) तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करु शकतो. यामध्ये तुम्ही ठराविक अंतराने लहान रक्कम गुंतवणूक करु शकता. (sip investment tips for 5-year plan read details in marathi)

जर तुम्ही 5 वर्षांत 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करु इच्छित असाल तर जाणून घेऊयात एसआयपी कॅलक्युलेटरच्या सहाय्याने या गुंतवणुकीच्या संदर्भात....

हे पण वाचा : तुम्ही केलं असेल हे काम तर 6 वर्षांनंतर मिळतील 2 लाख रुपये

5 वर्षांत 5 लाख कसे जमा करायचे?

SIP

(Source: Groww)

जर तुम्ही 5 वर्षांत सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लामध्ये दर महिन्याला 6500 रुपये गुंतवणूक करता तर अशा प्रकारे तुमची एकूण गुंतवणूक 3,90,000 रुपये होईल. अशा प्रकारे 12 टक्के व्याज दराने तुम्हाला रिटर्न्स म्हणून 1,46,161 रुपये मिळतील. तर पाच वर्षानंतर मिळणारी एकूण रक्कम ही 5,00,000 रुपयांहून अधिक म्हणजेच 5,36,161 रुपये इतकी होईल.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

एसआयपी काय आहे?

SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करु शकता. सध्याच्या काळात नागरिकांमध्ये एसआयपी करण्याचा क्रेझ वाढत चालला आहे. यामध्ये तुम्ही साप्ताहिक, मासिक किंवा तिमाहीच्या आधारे पैसे गुंतवणूक करु शकता. याची सर्वात खास बाब म्हणजे यामध्ये तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करु शकता. मात्र, कोणत्याही एसआयपी किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्या संपूर्ण प्लानबाबत माहिती मिळवा.

Disclaimer: टाइम्स नाऊ मराठी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी