SIP Investment Tips: वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचंय? पण वय 30 झालं मग किती करावी लागेल बचत जाणून घ्या

काम-धंदा
भरत जाधव
Updated Mar 25, 2023 | 18:30 IST

SIP Investment Tips: खासगी नोकरदारांना (Private employees)सेवानिवृत्तीनंतर (Retirement) पेन्शन (Pension) मिळत नाही. त्यामुळे हा वर्ग नोकरी लागताच आर्थिक नियोजन सुरू करतो.  सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखमय असावे, कार, घर खरेदी, मुलांचे उच्चशिक्षण (higher education) आणि त्यांच्या विवाहासाठी पुरेसे पैसे जवळ असावेत हा या नियोजनामागील उद्देश असतो.

SIP Investment Tips:
वय 30 झालं तरी 40 व्या वर्षी व्हाल करोडपती? कसं जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • वयाच्या 40 व्या वर्षी कसे होणार करोडपती.
  • SIP रिटर्न हे शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतात.
  • 10 वर्षात सरासरी 12% परतावा आल्यास तुम्ही तब्बल 1 कोटी रुपयांचे मालक होऊ शकतात.

How to make one crore fund: खासगी नोकरदारांना (Private employees)सेवानिवृत्तीनंतर (Retirement) पेन्शन (Pension) मिळत नाही. त्यामुळे हा वर्ग नोकरी लागताच आर्थिक नियोजन सुरू करतो.  सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखमय असावे, कार, घर खरेदी, मुलांचे उच्चशिक्षण (higher education) आणि त्यांच्या विवाहासाठी पुरेसे पैसे जवळ असावेत हा या नियोजनामागील उद्देश असतो. आजकाल गुंतवणूक आणि बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आरडी किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायीपैकी एसआयपी हा पर्याय खूप चांगला आहे. या गुंतवणुकीच्या मार्गातून तुम्ही करोडपती होऊ शकतात. पण गुंतवणूक करायला उशिर झाला करोडपती कसं होणार असा प्रश्न अनेकांना सतावत असतो.  (Want to become a millionaire at age 40?But after age of 30; know how much you need to save)

अधिक वाचा  : काही मिनिटात उजळेल मुलांची त्वचा

तुमच्या या समस्येचं आणि करोडपती होण्याची अडचण आम्ही या लेखातून दूर करणार आहोत. शेअर बाजारमधील बिग बुल झुनझुनवाला नेहमी सांगत की, शेअर बाजारात गुंतवणूक करा. भारतातील परिस्थिती कशी ही असली तरी त्यात पैसा गुंतवा. एसआयपी हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. सध्या बँका, पोस्ट ऑफिसच्या तुलनेत अनेक एसआयपी खूप चांगला परतावा देत आहेत.

अधिक वाचा  : लग्नाला उशिर कराल तर बाप बनण्यास होईल अडचण

परंतु उच्च परताव्यासह, बँक, पोस्ट ऑफिसच्या तुलनेत एसआयपीमधील जोखीम देखील जास्त आहे. कारण SIP रिटर्न हे शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतात. करोडपती होण्यासाठी जोखीम घेण्याची तयारी तुमची असेल तर एसआयपी सुपर आहे. कारण SIP चा  मागील परतावा बघता 10 वर्षात सरासरी 12% परतावा आल्यास तुम्ही तब्बल 1 कोटी रुपयांचे मालक होऊ शकतात.  

अधिक वाचा  : वजन वाढण्यासाठी ऑफिसमधल्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत

दरम्यान मध्यम वर्गातील व्यक्तीचं गाडी आणि माढीचं स्वप्न असतं. जर तुम्ही एक कोटी रुपये अवघ्या चाळीस वर्षातच कमावले तर. इतका मोठा पैसा तुमच्याकडे आला तर तुम्ही देशातील कोणताही शहरात राहून हे स्वप्न पूर्ण करू शकतात. यासह भविष्यात इतर गोष्टी किंवा इतर वस्तू खरेदीसाठी देखील चांगला पैसा शिल्लक ठेवू शकतात.

अधिक वाचा  : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

आता तुम्ही म्हणाल माझं वय खूप झालं आहे, वयाची तिशी पार केली आहे, आता कुठे मी कोटी रुपयांची स्वप्न पाहून असं म्हणत असाल तर वाचक मित्रांनो आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा जो फंडा सांगणार आहोत ना तो वाचून तुमच्या चेहऱ्यावर करोडो रुपयांचे स्माईल येईल. जर तुमचं वय हे 35 ते 40 च्या दरम्यान असेल तर आणि तुम्हाला कोटी रुपयांचे मालक व्हाययचे आहे तर तुम्ही खालील प्रमाणे गुंतवणूक करा. 

वय कालावधी         महिन्याची बचत 
 
25  15  19,819 रुपये
30 10  43,041 रुपये
32   08  61,909 रुपये

कर्जाची नाही राहणार कटकट 

जर कोणी व्यक्ती महिन्याची बचत करत 40 वर्षात एक कोटी रुपये कमावले असतील. तर पुढील आयुष्यात त्याला आर्थिक अडचण निर्माण होत आहे. या काळात तुम्हाला कोणताही हप्ता किंवा इएमआय देण्याची चिंता राहणार नाही. या पैशांच्या मदतीने तुम्ही मुलांचं शिक्षण पूर्ण करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी