खुशखबर! जीएसटीच्या संकलनात वाढ, सरकारच्या तिजोरीत एवढे कोटी जमा

काम-धंदा
Updated Dec 02, 2019 | 17:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. जीएसटी संकलन पुन्हा एक लाख कोटींवर गेले आहे.

Six percent increase in GST collection
जीएसटीच्या संकलनात वाढ, सरकारच्या तिजोरीत एवढे कोटी जमा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. जीएसटी संकलन पुन्हा एक लाख कोटींवर गेले आहे.
  • वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलनापोटी नोव्हेंबरमध्ये १ लाख ३ हजार ४९२ कोटी रूपये जमा झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

नवी दिल्ली: वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलनापोटी नोव्हेंबरमध्ये १ लाख ३ हजार ४९२ कोटी रूपये जमा झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. जीएसटी संकलन मागील वर्षातील याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ९७ हजार ४३७ कोटी रूपये एवढे झाले होते, तर ऑक्टोबरमध्ये ९५ हजार ३८० कोटी रूपये एवढे होते. सणासुदीच्या काळातील वस्तूंच्या मागणीमुळे जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे समजते. जीएसटी संकलन वाढले याचाच अर्थ मागणी वाढली पर्यायाने जीएसटी भरणामध्ये वाढ झाली. कोणत्याही प्रकारची कठोर पावलं न उचलता तसेच तरतुदी न करता हे जीएसटी संकलन वाढले आहे.

नोव्हेंबरमध्ये केवळ देशांतर्गत जीएसटी संकलन हे १२ टक्क्यांनी वाढले आहे. हा वर्षातील सर्वात मोठा उच्चांक आहे. नोव्हेंबरमध्ये १ लाख ३ हजार ४९२ कोटी रूपये जीएसटी संकलन वाढले असून केंद्राचे जीएसटी १९,५९२ कोटी रूपये तर राज्याचे जीएसटी २७,१४४ कोटी रूपये एवढे झाले. एकूण हे संकलन ४९,०२८ कोटी रूपये इतके झाले. यामध्ये आयातीवरचा जीएसटी २०,९४८ कोटी रूपये होता, तर उपकर ७,७२७ कोटी रूपये इतका होता. त्यात ८६९ कोटी रूपयांचे संकलन हे आयातीवरचे आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

जीएसटी लागू केल्यापासून संकलन वाढण्याची ही तिसरी वेळ आहे. यावर्षी मार्च व एप्रिल २०१९ या महिन्यांत जास्त जीएसटी संकलन झाले होते. तसेच यावर्षी जुलैमध्ये १,०२,०८३ कोटी जीएसटी संकलन झाले होते. मात्र आता नोव्हेंबरमध्ये संकलनाने याही पुढचा टप्पा गाठला आहे. सरकारने केंद्रीय जीएसटीमध्ये २५,१५० कोटी रूपयांची, तर राज्याच्या जीएसटीत १७,४३१ कोटी रूपयांची तडजोड एकात्मिक जीएसटीतून केली आहे. त्यातही केंद्र सरकार आणि राज्यांना नोव्हेंबरमध्ये ४४,७४२ कोटी केंद्रीय जीएसटीतून ४४,५७६ कोटी राज्याच्या जीएसटीतून मिळाले आहे.

येत्या महिन्यातही जीएसटी संकलनात अशीच वाढ होत राहिल्यास आर्थिक तूट भरून काढण्यास नक्कीच मदत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी