RBI Imposes Penalty on Ola: RBI ने ओलावर ठोकला दीड कोटीचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jul 13, 2022 | 16:56 IST

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने Ola Financial Services Pvt Ltd वर 1.67 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले की, प्रीपेड पेमेंट सिस्टम आणि आपल्या ग्राहक जाणून घेण्याच्या (KYC) नियमांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. ओला फायनान्शियल सर्व्हिसेस ही ओलाची उपकंपनी आहे जी अॅप आधारित कॅब सेवा प्रदान करते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांव्यतिरिक्त, वैयक्तिक कर्ज देखील देते. 

 RBI slaps Rs 1.5 crore fine
RBI ने ओलावर ठोकला दीड कोटीचा दंड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ओला फायनान्शियल सर्व्हिसेस ही ओलाची उपकंपनी आहे.
  • कंपनीच्या उत्तराचा विचार केल्यानंतर, निर्देशांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहिल्याचा निष्कर्ष काढण्यात आला
  • सोमवारी आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता

RBI Imposes Penalty on Ola: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने Ola Financial Services Pvt Ltd वर 1.67 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले की, प्रीपेड पेमेंट सिस्टम आणि आपल्या ग्राहक जाणून घेण्याच्या (KYC) नियमांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. ओला फायनान्शियल सर्व्हिसेस ही ओलाची उपकंपनी आहे जी अॅप आधारित कॅब सेवा प्रदान करते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांव्यतिरिक्त, वैयक्तिक कर्ज देखील देते. 

नोटीस बजावून विचारण्यात आला होता प्रश्न

रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओला फायनान्शियल सर्व्हिसेस केवायसीबाबत जारी केलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात कंपनीला यापूर्वी नोटीसही बजावण्यात आली होती आणि सूचनांचे पालन न केल्याबद्दल दंड का भरू नये, अशी विचारणा करण्यात आली होती. 

आरबीआयच्या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी

आरबीआयने म्हटले आहे की, 'कंपनीच्या उत्तराचा विचार केल्यानंतर, निर्देशांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहिल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे आणि ओलाला दंड आकारणे आवश्यक आहे. नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले आहे. ओला फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या ग्राहकांसोबतच्या कोणत्याही व्यवहाराच्या कायदेशीरपणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही.

आरबीआयने या बँकांवर दंडही ठोठावला 

याआधी, सोमवारी आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. ज्या बँकांवर हा दंड ठोठावण्यात आला त्यात नाशिक व्यापारी सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि नॅशनल सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा समावेश आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी