Small savings scheme | महत्त्वाची बातमी! पीपीएफसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात बदल नाही, पाहा व्याजदर...

Investment in Small savings scheme : केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. अल्पबचत योजनांवरील व्याजदर १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी आहे तेच म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये (१ ऑक्टोब २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१) जितके होते तितकेच राहणार आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

Small savings scheme rates remain unchanged
अल्पबचत योजनांच्या व्याजदरात बदल नाही 
थोडं पण कामाचं
  • अल्पबचत योजनांवरील व्याजदर आहे तसेच राहणार
  • केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केले व्याजदर, दर तिमाहीत सरकारकडून व्याजदर जाहीर
  • ओमायक्रॉन, महागाई या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Small savings scheme interest rate | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर (Small savings scheme) जैसे ठेवले आहेत. पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY),पोस्ट ऑफिसच्या इतर योजना (post office schemes) इत्यादींसाठी जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत व्याजदर (Interest rates) आता आहेत तेवढेच राहणार आहेत. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आणि वाढलेली महागाई लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Small savings scheme rates remain unchanged for the fourth quarter of FY22)

अर्थमंत्रालयाने घेतला निर्णय

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. अल्पबचत योजनांवरील व्याजदर १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी आहे तेच म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये (१ ऑक्टोब २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१) जितके होते तितकेच राहणार आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. 
कोरोनाचे संकट, महागाई आणि पुढील महिन्यात देशातील पाच राज्यांमध्ये होणार असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाला आहे. ही पाच राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गोवा. 

पीपीएफ आणि इतर योजनांवरील व्याजदर

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफवर ७.१ टक्के व्याजदर मिळतो आहे तो तसाच राहणार आहे. तर नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट म्हणजे एनएससीवरील व्याजदर आता इतकाच म्हणजे ६.८ टक्के इतका राहणार आहे. तिसऱ्या तिमाहीत मिळत असलेले व्याजदरच चौथ्या तिमाहीतदेखील सुरू राहणार आहेत. जाणकारांच्या मते सरकारने पाच राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे व्याजदरात बदल केलेला नाही. शिवाय कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर नवी आव्हाने येऊ शकतात.

एक वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर ५.५ टक्के व्याजदर मिळत होता तो तसाच राहणार आहे. तर मुलींसाठीची गुंतवणूक योजना असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के व्याजदर मिळतो आहे आणि तो तसाच राहणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पाच वर्षासाठीच्या सिनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीमवर ७.४ टक्के व्याजदर आहे. तो तसाच राहणार आहे. याशिवाय सेव्हिंग्स डिपॉझिटवरील व्याजदर ४ टक्केच राहणार आहे.

दर तिमाहीत व्याजदर जाहीर

सरकार दर तिमाहीमध्ये अल्पबचत योजनांवरील व्याजदर जाहीर करत असते. अल्पबचत योजना या सरकारकडून चालवल्या जातात. त्यामुळे त्यात भांडवल आणि परताव्याची हमी असते. आजही अनेक लोक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पश्चिम बंगालमध्ये अल्पबचत योजनांमध्ये सर्वात गुंतवणूक केली जाते. तर देशात अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीमध्ये उत्तर प्रदेशचा क्रमांक दुसरा लागतो.

अल्पबचत योजना (small savings scheme) या एरवी सर्वसामान्य गुंतवणुकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र अलीकडच्या काही दिवसात लोकांचा अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक (Investment)करण्याचा कल कमी होताना दिसतो आहे. देशातील सर्वात मोठ्या शहरांपासून ते छोटी शहरांपर्यत आता लोक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी शेअर बाजाराकडे (Share market) वळत आहेत. डीमॅट खाते सुरू करून शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याला लोक प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर म्युच्युअल फंडातील (Mutual funds)गुंतवणुकीचा ओघदेखील वाढला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी