Small Savings Schemes Update | तुमच्यासाठी आनंदाची बातमी! एप्रिल-जून 2022 साठी अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे...व्याजदरात बदल नाही

Interest Rates : अल्पबचत योजनांसाठीचे एप्रिल ते जून या तिमाहीसाठीचे व्याजदर (small savings schemes interest rates) केंद्र सरकारने स्थिर ठेवले आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि इतर योजनांचा समावेश असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीसाठी जैसे थे ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Small Savings Schemes Interest Rates
अल्पबचत योजनांच्या व्याजदरात एप्रिल ते जून तिमाहीसाठी बदल नाही 
थोडं पण कामाचं
  • अल्पबचत योजनांसाठीचे एप्रिल ते जून या तिमाहीसाठीचे व्याजदरात सरकारने बदल केलेला नाही
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि इतर अल्प योजनांचे व्याजदर आहेत तेच राहणार
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2021-22 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज 8.1 टक्क्यांवर आणले होते

Small Savings Schemes Interest Rates : नवी दिल्ली : अल्पबचत योजनांसाठीचे एप्रिल ते जून या तिमाहीसाठीचे व्याजदर (small savings schemes interest rates) केंद्र सरकारने स्थिर ठेवले आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि इतर योजनांचा समावेश असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीसाठी जैसे थे ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. (Small savings schemes interest rates unchanged for Apr-Jun 2022)

अधिक वाचा : PAN-Aadhaar Linking | तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक कराल? पाहा सोपी पद्धत

अर्थमंत्रालयाने केली घोषणा

सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचा लोकप्रिय आणि सुरक्षित पर्याय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी खूप महत्त्वाचे असतात. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून व्याजदरात सुधारणा करण्यात आलेली नाही.  1 एप्रिल 2022 पासून सुरू होणार्‍या आणि 30 जून 2022 रोजी संपणार्‍या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाचा दर स्थिर राहतील. त्या कोणताही बदल होणार नाही. " असे अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे.

अधिक वाचा : Homebuyers alert | तुमच्या गृहकर्जावर 1 एप्रिलपासून नाही मिळणार 'हा' कर वजावटीचा लाभ...पाहा किती बसणार फटका

विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदर

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) वर पहिल्या तिमाहीत अनुक्रमे 7.1 टक्के आणि 6.8 टक्के वार्षिक व्याजदर राहील. एक वर्षाची मुदत ठेव योजना पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 5.5 टक्के व्याजदर मिळवत राहील. तर मुलींसाठी बचत योजना असलेल्या सुकन्या समृद्धी योजने (SSY) वर 7.6 टक्के व्याज मिळेल. पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेवरील व्याजदर ७.४ टक्के राखला जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेवरील व्याज तिमाही दराने दिले जाते. बचत ठेवींवरील व्याज दर वार्षिक ४ टक्के राहील.

अधिक वाचा : Income Tax Rule | 1 एप्रिल पासून बदलणार हे 5 मोठे प्राप्तिकर नियम...लागा 'कर नियोजनाच्या' तयारीला

पीएफवरील व्याजदरात केली होती कपात

एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.5-6.7 टक्के व्याज मिळेल, जे तिमाही भरावे लागेल. तर पाच वर्षांच्या आवर्ती ठेवींवर 5.8 टक्के जास्त व्याज मिळेल. अल्पबचत योजनांचे व्याज दर तिमाही आधारावर अधिसूचित केले जातात. या महिन्याच्या सुरुवातीला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2021-22 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज 8.1 टक्क्यांवर आणले होते. पीएफवरील हा व्याजदर मागील 40 वर्षांतील सर्वात नीचांकी व्याजदर आहे.

पीएफवरील व्याजदर कमी केल्यावर संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की ईपीएफ (EPF) साठी प्रस्तावित 8.1 टक्के व्याजदर हा इतर अल्पबचत योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या व्याजदरांपेक्षा चांगला आहे. या पार्श्वभूमीवर आज अल्पबचत योजनांसाठीचे व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत.

सर्वसामान्य नागरिक आजही विविध अल्पबचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. अल्पबचत योजना या सरकारद्वारेच संचालित असल्यामुळे त्यात सुरक्षितता तर असतेच शिवाय व्याजदरदेखील आकर्षक असल्याने नागरिकांचा यात गुंतवणूक करण्याकडे ओढा असतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी