Budget 2023 for Women: नवी दिल्ली : आज मोदी सरकारने ( Modi Govt) आपलं शेवटचं बजेट (Budget) सादर केलं. हा अर्थसंकल्प सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा असल्याचं मत अनेक जाणकार म्हणत आहेत. या बजेटमध्ये महिलांविषयीही काही घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पात महिला बचत सन्मान पत्राची (Women's Savings samman paptra) घोषणा करण्यात आली. हे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी वैध असेल. यावर 7.5 टक्के व्याज दिले जाईल. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्यासाठी बचत योजनांमध्ये ठेवीची कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे. (Smriti Irani started clapping after hearing Finance Minister's announcement about women)
अधिक वाचा : नणदेने गळ्यात चपलांचा हार घालून वहिनीची गावातून काढली धिंड
बचत गट हे एक वन टाइम न्यू सेविंग स्कीम आहे.या घोषणेचे सर्वत्र कौतुक होत आहे.जसे किसान विकास पत्र आहे, त्याच पद्धतीने महिला बचत प्रमाणपत्र असणार असल्याची चर्चा आहे. या माध्यमातून महिला चांगली बचत करू शकतात. महिलांविषयी केलेल्या नव्या योजनांची घोषणा ऐकून संसदेत बसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. त्या स्मृती इरानी यांनी या घोषणेविषयी आनंद व्यक्त केला आहे. अर्थमंत्र्यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर स्मृती इरानी यांनी बाक वाजवत आपला आनंद व्यक्त केला.
महिला अर्थमंत्री असेल तर अर्थसंकल्पाकडून महिलांच्या अपेक्षा खूप वाढतात. यावेळीही महिलांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यापूर्वीच्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्र्यांनी महिलांशी संबंधित अनेक घोषणा केल्या होत्या. मागील अर्थसंकल्पात म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षात महिलांसाठी 1,71,006 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
अधिक वाचा : अर्थमंत्र्यांनी आयकरात ही घोषणा केली तर भरेल तुमचा खिसा
सीतारमन यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सक्षम अंगणवाडी, मिशन वात्सल्य, मिशन शक्ती आणि पोषण 2.0 यांसारख्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती. यासोबतच 2 लाख अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन करण्यात आले. याशिवाय महिला व बालकांच्या विकासासाठी 3 योजना सुरू करण्यात आल्या होत्या.
बजेट सादर करताना निर्मला सीतारमन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आललेल्या बचत योजनेत बदल केला आहे. सेव्हिंग स्किम्सच्या मर्यादेत वाढ केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सेव्हिंग स्कीम्सची मर्यादा 15 लाख ते 30 लाखापर्यंत वाढवली आहे. दुसरीकडे संयुक्त खात्याच्या योजनेची सीमा वाढविण्यात आली आहे. ही मर्यादा वाढवून 9 लाख रुपये ते 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.