Sovereign Gold Bond : स्वस्तात मिळवा सोने, गुंतवणुकीची सुवर्णसंधी, 22 ऑगस्टपासून...जाणून घ्या

Gold Investment : सार्वभौम गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सोमवारपासून पाच दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार्‍या सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या 2022-23 च्या पुढील टप्प्यासाठी इश्यू किंमत प्रति ग्रॅम सोन्यासाठी 5,197 रुपये निश्चित करण्यात आली आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले.

Sovereign Gold Bond
सोव्हेरन गोल्ड बॉंड, सोन्यातील गुंतवणुकीची सुवर्णसंधी 
थोडं पण कामाचं
  • सार्वभौम गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक उत्तम पर्याय
  • सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या 2022-23 च्या पुढील टप्प्यासाठी इश्यू किंमत प्रति ग्रॅम सोन्यासाठी 5,197 रुपये निश्चित करण्यात आली
  • सार्वभौम गोल्ड बॉंड योजना 2022-23 सेरिज II ही गुंतवणुकीसाठी 22 ते 26 ऑगस्ट 2022 दरम्यान खुली असणार

Sovereign Gold Bond Investment : नवी दिल्ली : सार्वभौम गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सोमवारपासून पाच दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार्‍या सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या 2022-23 च्या पुढील टप्प्यासाठी इश्यू किंमत प्रति ग्रॅम सोन्यासाठी 5,197 रुपये निश्चित करण्यात आली आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले. सार्वभौम गोल्ड बॉंड योजना 2022-23 सेरिज II ही गुंतवणुकीसाठी 22 ते 26 ऑगस्ट 2022 दरम्यान खुली असणार आहे.(Sovereign Gold Bond  2022-23 series II opens on August 22 for investment)

अधिक वाचा : Chia Seeds Benefits: वजन कमी करण्यासोबतच चिया बिया या आजारांपासूनही वाचवतात, जाणून घ्या कसे करायचे सेवन

केंद्र सरकारने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून, ऑनलाइन अर्ज करणार्‍या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये, नाममात्र मूल्यापेक्षा कमी, सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय गुंतवणुकदारांना डिजिटल पद्धतीने पैसे मोजता येणार आहेत. आरबीआयने या सेरिजसाठी सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 5,147 रुपये इतका ठेवला आहे.

सोने खरेदीची मर्यादा

सार्वभौम सुवर्ण बाँडमध्ये, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकते. तर HUF 4 किलोपर्यंतचे सोने बॉंडद्वारे घेऊ शकतात आणि ट्रस्ट 20 किलोपर्यंतचे  खरेदी करू शकते. सार्वभौम गोल्ड बाँड्सच्या गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध असेल. मिळकतीवर कोणताही भांडवली लाभ कर आकारला जाणार नाही.

आरबीआयने पुढे सांगितले की, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) ने शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांसाठी प्रकाशित केलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किंमतीच्या सदस्यता कालावधीच्या आधीचा आठवड्याच्या साध्या सरासरीच्या आधारावर SGB ची किंमत रुपयांमध्ये निश्चित केली जाईल.

अधिक वाचा : Mumbai Police: मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या मेसेजनं खळबळ, पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला?; बंदोबस्त वाढवला

सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये का गुंतवणूक करावी -

  1. -सोव्हेरन गोल्ड बॉंड हे व्याज सहामाही स्वरुपात दिले जाते. ही गुंतवणूक आठ वर्षांसाठी असते.
  2. -सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर २.५ टक्के वार्षिक व्याज सरकारकडून दिले जाते. 
  3. - सोव्हेरन गोल्ड बॉंडवर मिळणारे व्याज हे प्राप्तिकर नियम १९६१ नुसार करपात्र असते. मात्र सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक काढल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नात करवजावट मिळते. 
  4. - सोन्यातील गुंतवणूक आणि तीदेखील सरकारच्या बॉंडमधील यामुळे सोव्हेरन गोल्ड बॉंड ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जातेचे मात्र त्याचबरोबर यात व्याजदेखील मिळत असल्याने गुंतवणुकीचा कालावधी संपल्यावर घवघवीत परतावादेखील मिळतो.
  5. - या गुंतवणुकीतील आणखी एक फायदा म्हणजे सोव्हेरन गोल्ड बॉंड तारण ठेवून कर्जदेखील मिळते. कर्जाचे सोन्याच्या मूल्याशी असलेले गुणोत्तर हे रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी सोन्यावर दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीच्या सूचनांप्रमाणे ठरवले जाते. 
  6. - सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक कशी कराल
  7. - सोव्हेरन गोल्ड बॉंडची विक्री शेड्युल्ड कमर्शियल बॅंक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी केली जाते. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रत्यक्ष शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकता. 

अधिक वाचा : Vastu Tips : चुकूनही या दिशेला पाय ठेवून झोपू नका, होईल नुकसान

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी