Sovereign Gold Bond : आधीच घसरलेले सोने आणखी स्वस्तात मिळवा, गुंतवणुकीची सुवर्णसंधी, आजपासून...जाणून घ्या आरबीआयची सोव्हेरन बॉंड योजना

Gold Investment : सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करू इच्छिणाऱ्यांसाठी सोव्हरेन गोल्ड बॉंड योजना (Sovereign Gold Bond)हा एक जबरदस्त पर्याय आहे. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेचा दुसरा टप्पा आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ही योजना 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली असेल. ऑनलाइन अर्ज करणार्‍यांना सरकार नाममात्र मूल्यापेक्षा 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देखील देत आहे.

Sovereign Gold Bond
सोव्हेरन गोल्ड बॉंड 
थोडं पण कामाचं
  • सोन्यामध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी
  • सोव्हेरन गोल्ड बॉंड योजना 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली असेल
  • सोव्हेरन गोल्ड बॉंडच्या या सेरीजमध्ये सोन्याचा भाव 5,197 रुपये प्रति ग्रॅम इतका असणार आहे

Sovereign Gold Bond Investment : नवी दिल्ली : सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करू इच्छिणाऱ्यांसाठी सोव्हरेन गोल्ड बॉंड योजना (Sovereign Gold Bond)हा एक जबरदस्त पर्याय आहे. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेचा दुसरा टप्पा आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.  ही योजना 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली असेल. ऑनलाइन अर्ज करणार्‍यांना सरकार नाममात्र मूल्यापेक्षा 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देखील देत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका निवेदनात म्हटले आहे की सोव्हेरन गोल्ड बॉंडच्या या सेरीजमध्ये सोन्याचा भाव 5,197 रुपये प्रति ग्रॅम इतका असणार आहे. (Sovereign Gold Bond scheme opens today for investment, check details)

अधिक वाचा : Amit shah with JR Ntr: Amit shah with JR Ntr: अमित शाह भेटले ज्युनियर एनटीआरला, ट्विट करत केलं अभिनेत्याचं कौतुक, अनेकांकडून रिट्विट

आरबीआयने आणले सोव्हेरन गोल्ड बॉंड

“सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2022-23, सेरीज II ही सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी खुली असेल. साध्या सरासरी बंद किंमतीवर आधारित बाँडचे नाममात्र मूल्य [इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडद्वारे प्रकाशित (IBJA)  आधीच्या आठवड्याच्या शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांच्या 999 शुद्धतेच्या सोन्यासाठी, म्हणजे 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट 2022 ची किंमत 5,197 रुपये प्रति ग्रॅम इतकी असणार आहे ”असे आरबीआयने म्हटले आहे.

“भारत सरकारने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून, ऑनलाइन अर्ज करणार्‍या गुंतवणुकदारांना नाममात्र मूल्यापेक्षा 50/- रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय घेतला आहे आणि अर्जाचे पैसे डिजिटल मोडद्वारे केले जातात. अशा गुंतवणुकदारांसाठी, गोल्ड बाँडची इश्यू किंमत 5,147 रुपये प्रति ग्रॅम सोने इतकी असेल,” असे त्यात म्हटले आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियानेही सार्वभौम गोल्ड बाँड्सवर एक ट्विट पोस्ट केले आहे. ” ही सुवर्णसंधी चुकवू नका! सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2022-23 मालिका – II 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान खुली असेल.”

अधिक वाचा : Pitru Paksha 2022: पितृपक्षात चुकूनही करू नका ही कामे नाहीतर...

सार्वभौम गोल्ड बाँड म्हणजे काय?

सार्वभौम गोल्ड बाँड म्हणजे एसजीबी (Sovereign Gold Bond) सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केले जातात. या सरकारी सिक्युरिटीज आहेत, भौतिक सोन्याचा पर्याय आहे आणि एका आर्थिक वर्षात दोन वेळा जारी केल्या जातात. योजनेसाठी 8 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. 5व्या, 6व्या आणि 7व्या वर्षी व्याज देण्याच्या तारखांना एक्झिटचादेखील यात पर्याय आहे. 

अधिक वाचा : Weight loss tips in marathi : अंडी खाल्ल्यामुळेही होतं वजन कमी, फक्त ऍड करा हे तीन पदार्थ

सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये का गुंतवणूक करावी -

  1. -सोव्हेरन गोल्ड बॉंड हे व्याज सहामाही स्वरुपात दिले जाते. ही गुंतवणूक आठ वर्षांसाठी असते.
  2. -सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर २.५ टक्के वार्षिक व्याज सरकारकडून दिले जाते. 
  3. - सोव्हेरन गोल्ड बॉंडवर मिळणारे व्याज हे प्राप्तिकर नियम १९६१ नुसार करपात्र असते. मात्र सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक काढल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नात करवजावट मिळते. 
  4. - सोन्यातील गुंतवणूक आणि तीदेखील सरकारच्या बॉंडमधील यामुळे सोव्हेरन गोल्ड बॉंड ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जातेचे मात्र त्याचबरोबर यात व्याजदेखील मिळत असल्याने गुंतवणुकीचा कालावधी संपल्यावर घवघवीत परतावादेखील मिळतो.
  5. - या गुंतवणुकीतील आणखी एक फायदा म्हणजे सोव्हेरन गोल्ड बॉंड तारण ठेवून कर्जदेखील मिळते. कर्जाचे सोन्याच्या मूल्याशी असलेले गुणोत्तर हे रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी सोन्यावर दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीच्या सूचनांप्रमाणे ठरवले जाते. 
  6. - सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक कशी कराल
  7. - सोव्हेरन गोल्ड बॉंडची विक्री शेड्युल्ड कमर्शियल बॅंक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी केली जाते. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रत्यक्ष शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकता. 

सोने खरेदीची मर्यादा

सार्वभौम सुवर्ण बाँडमध्ये, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकते. तर HUF 4 किलोपर्यंतचे सोने बॉंडद्वारे घेऊ शकतात आणि ट्रस्ट 20 किलोपर्यंतचे  खरेदी करू शकते. सार्वभौम गोल्ड बाँड्सच्या गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध असेल. मिळकतीवर कोणताही भांडवली लाभ कर आकारला जाणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी