Gold Investment | सोव्हेरन गोल्ड बॉंड १० जानेवारीपासून खुले, स्वस्तात सोन्यामध्ये गुंतवणुकीची जबरदस्त संधी

Gold Bond : सोव्हेरन गोल्ड बॉंडची पुढील सेरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22) सोमवार १० जानेवारी पासून गुंतवणुकीसाठी खुली होते आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) बाजारात रिझर्व्ह बॅंकेकडून (RBI)आणले जातात. प्रत्येक सेरिजसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया सोन्याचा भाव निश्चित करत असते. नवी सेरिज १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान बाजारात गुंतवणुकीसाठी खुली आहे.

Investment in Sovereign Gold Bond
सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक आणि फायदे 
थोडं पण कामाचं
  • सोव्हेरन गोल्ड बॉंडची सेरिज १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान बाजारात गुंतवणुकीसाठी खुली
  • या सेरिजसाठी सरकारने सोन्याचा भाव (Gold price) ४,७८६ रुपये प्रति ग्रॅम इतका निश्चित केला
  • डिजिटल पेमेंट करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट

Sovereign Gold Bond | नवी दिल्ली : स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंडची पुढील सेरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22) सोमवार १० जानेवारी पासून गुंतवणुकीसाठी खुली होते आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) बाजारात रिझर्व्ह बॅंकेकडून (RBI)आणले जातात. प्रत्येक सेरिजसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया सोन्याचा भाव निश्चित करत असते. नवी सेरिज १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान बाजारात गुंतवणुकीसाठी खुली आहे. या सेरिजसाठी सरकारने सोन्याचा भाव (Gold price) ४,७८६ रुपये प्रति ग्रॅम इतका निश्चित केला आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये डिजिटल स्वरुपातदेखील पेमेंट करता येते. डिजिटल पेमेंट करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट मिळते. (Sovereign Gold Bond : SGB will be available for investment between 10th January and 14th January 2022)

सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Gold Investment) समजली जाते.  सोन्याच्या भावात मागील काही कालावधीत चढउतार होत असले तरी दीर्घ कालावधीची सोव्हेरेन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक ही नेहमी फायद्याची ठरते. 

सोव्हेरन गोल्ड बॉंड म्हणजे काय ? (Sovereign Gold Bond)

सोव्हेरन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond ) हे रिझर्व्ह बॅंक किंवा अर्थमंत्रालयाकडून बाजारात आणले जातात. यात किमान १ ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करता येते तर कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. शिवाय दरवर्षी २.५ टक्के इतके व्याजदेखील सरकारकडून दिले जाते. ही गुंतवणूक केल्यावर प्रत्यक्ष सोने मिळत नाही तर सर्टिफिकेटच्या रुपात ही गुंतवणूक असते. आठ वर्षांच्या कालावधीसाठी ही गुंतवणूक असते. सध्या असलेल्या बाजारभावाने तुम्ही गुंतवणूक करायची असते आणि आठ वर्षानंतर (यात ५ वर्षांचा लॉकइन कालावधी आहे) त्यावेळेस असलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तुम्हाला दिले जाते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने १० ग्रॅम सोन्याच्या मूल्याएवढी गुंतवणूक आज केली तर ८ वर्षांनी १० ग्रॅम सोन्याच्या जो काही भाव असेल तितकी रक्कम त्या गुंतवणुकदारास मिळेल. सोन्यातील गुंतवणूक आणि तीदेखील सरकारच्या बॉंडमधील त्यामुळे सोव्हेरन गोल्ड बॉंड ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते आणि शिवाय परतावादेखील चांगला मिळतो.

गोल्ड बॉंड कशी करायची गुंतवणूक?

सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये भारतीय नागरिक, मोठे गुंतवणुकदार, ट्रस्ट, विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्था गुंतवणूक करू शकतात. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय आहेत. बॅंका, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज स्टॉक होल्डिंग्स कॉर्पोरेशन अशा विविध पर्यायांद्वारे तुम्ही सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरुपात करता येते. सर्वसामान्यपणे लोक बॅंक, पोस्ट ऑफिस आणि डीमॅट खात्याद्वारे सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करतात. 

गोल्ड बॉंडच्या अटी आणि किती गुंतवणूक करता येते

सोव्हेरन गोल्ड बॉंडचा कालावधी ८ वर्षांचा असतो. मात्र याला पाच वर्षांचा लॉकइन कालावधी असतो. म्हणजे पाच वर्षानंतर तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकता. यामध्ये १ ग्रॅम सोन्यापासून गुंतवणूक करता येते आणि त्याच पटीत ही गुंतवणूक वाढवतादेखील येते. कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. ट्रस्टना यात जास्तीत जास्त २० किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. ही एकूण मर्यादा असून यात वर्षभरातील विविध टप्प्यात केलेली गुंतवणूक आणि मनी मार्केटमधून केलेली सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक यांचाही समावेश आहे.

सोव्हेरन गोल्ड बॉंडची किंमत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या भावावरून ठरवली जाते. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशन लि.ने आठवड्याच्या तीन कार्यालयीन दिवसांत जाहीर केलेल्या भावाप्रमाणे सोव्हेरन गोल्ड बॉंड ज्या दिवशी खुले करण्यात आले असतील त्या दिवसाच्या सोन्याच्या भावाप्रमाणे गुंतवणूक केली जाते. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये जे गुंतवणुकदार ऑनलाईन किंवा डिजिटल स्वरुपात गुंतवणूक करतात आणि पेमेंट करतात त्यांना बाजारभावापेक्षा ५० रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळते.

सोव्हेरन गोल्ड बॉंडचे जबरदस्त फायदे -

  1. गोल्ड बॉंडमध्ये मिळतात व्याज आणि इतर फायदे
  2. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर २.५ टक्के वार्षिक व्याज मिळते.
  3. हे व्याज सहामाही स्वरुपात दिले जाते.
  4. सोव्हेरन गोल्ड बॉंडवर मिळणारे व्याज हे प्राप्तिकर नियम १९६१ नुसार करपात्र असते.
  5. सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक काढल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नात करवजावट मिळते.
  6. याशिवाय सोव्हेरन गोल्ड बॉंडवर तुम्हाला बॉंड तारण ठेवून कर्जदेखील मिळते.कर्जाचे सोन्याच्या मूल्याशी असलेले गुणोत्तर हे रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी सोन्यावर दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीच्या सूचनांप्रमाणे ठरवले जाते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी