Soybean rate | सोयाबीन भावाचा लंपडाव अंतिम टप्प्यात, इथे मिळाला ७,००० रुपयांचा भाव

Soybean price | सध्या तीन चार दिवसांआड सोयाबीनला (Soybean) चांगले भाव मिळताना दिसत आहेत. मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या भावात सातत्याने चढउतार होत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन मिळेल त्या भावात विकावा की चांगल्या भावासाठी थांबावे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर (Farmers)उभा आहे. सोयाबीनचा हंगामदेखील संपत आला आहे, मात्र शेतकऱ्याची चिंता दूर झालेली नाही. सोयाबीन भावाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आहे.

Soybean rate today
सोयाबीनचा आजचा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोयाबीनच्या भावातील चढउतार आता अंतिम टप्प्यात
  • अमरावतीत सोयाबीनला ७,०००चा भाव
  • विक्रीपेक्षा साठवणुकीवर शेतकऱ्याचा भर

Soybean rate today | नवी दिल्ली : सोयाबीनच्या भावातील (soybean rate) चढउतार आता अंतिम टप्प्यात आले आहेत. सध्या तीन चार दिवसांआड सोयाबीनला (Soybean) चांगले भाव मिळताना दिसत आहेत. मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या भावात सातत्याने चढउतार होत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन मिळेल त्या भावात विकावा की चांगल्या भावासाठी थांबावे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर (Farmers)उभा आहे. सोयाबीनचा हंगामदेखील संपत आला आहे, मात्र शेतकऱ्याची चिंता दूर झालेली नाही. सोयाबीनला चांगला म्हणजे दहा हजार रुपयांपर्यतचा भाव मिळावा या आशेवर शेतकरी आहे. मात्र आता उन्हाळी सोयाबीनची आवक सुरू होणार असल्याने माल साठवावा की विकावा हा निर्णय शेतकऱ्याला घ्यावा लागणार आहे. (Soyabean rate still under pressure, farmers are waiting for good rates)

शेतकऱ्याने करावे तरी काय

सोयाबीनचे उत्पादन घेऊन देखील भाव नसल्याने साठवलेल्या सोयाबीनबाबत शेतकरी त्रस्त आहे. आधीच्याच सोयाबीनला बाजारात भाव नसताना नवा सोयाबीन बाजारात येण्याचीही स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी काय करायचे हा शेतकऱ्यासमोरचा प्रश्नच आहे. सध्या सोयाबीनचा भाव (Soybean price) ६,००० ते ६,५०० रुपयांच्या आसपास किंवा खाली आहे. काही ठिकाणी तर भाव ६,००० रुपयांच्यादेखील खाली गेला आहे. काही दिवसांनी सोयाबीनच्या भावात सुधारणा होते, ६,५०० ते ७,००० रुपयांचा भाव मिळतो आणि लगेच भावात घसरण सुरू होते. सोयाबीनच्या भावाचा हा लपंडाव शेतकऱ्याला चिंता करायला लावतो आहे. क्वचितच एखाद दुसऱ्या बाजारसमितीत सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. 

अमरावतीत ७,००० चा भाव

बहुतांश बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे भाव पडलेले असताना अमरावती आणि मेहकर बाजारसमितीत सोयाबीनला ७,००० रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्याने विक्रीपेक्षा मालाचा साठा करण्यावर भर दिल्याने भाव कोसळणे बंद होत जरा स्थिरावले आहेत. जर आगामी काळातदेखील शेतकऱ्याने संयम दाखवला तर सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. सध्या सोयबीनचे भाव ६,००० ते ७,००० रुपयांच्या दरम्यान फिरत आहेत. मात्र काही बाजारसमित्यांमध्ये तर ६,००० रुपयांच्या खालीदेखील भाव गेले आहेत.

खाद्य तेल (Edible oil) आणि तेलबिया यांचे भाव हे नेहमीच चर्चेत असतात आणि ते चिंतेचा विषय देखील असतात. एकीकडे भाव वाढल्यावर ग्राहक त्रस्त असतो, तर दुसरीकडे भाव पडल्यावर शेतकरी हवालदिल होतो. तर काहीवेळा दोघांच्याही तोंडचे पाणी पळालेले असते. मागील काही आठवड्यांपासून काही तेलबिया आणि खाद्यतेल यांच्या भावांमध्ये चढउतार दिसत आहेत. यात सोयाबीन (Soybean)प्रामुख्याने आहे. सोयाबीनला बाजारात मिळणारा भाव (soybean rate) हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या (Farmers) अडचणीचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी