Soybean Price | सोयाबीनचा भाव स्थिर होईना...शेतकऱ्यांची चिंता सरेना

Agriculture products market : राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनच्या भावाला गळतीच लागली आहे. अगदी ५,५०० रुपयांपासून ते ६,२०० रुपयांपर्यतचा भावदेखील बाजार दिसतो आहे. जास्तीत जास्त ६,५०० भाव मिळाला आहे, तोही काही ठराविक बाजारातच. आठवडाभरापूर्वी ७,००० रुपयांवर असणारा भाव आता ६,००० रुपयांच्या खाली उतरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकीकडे अतिवृष्टीने पीकावर परिणाम झाला. आता भाव मिळत नाही, अशा कात्रीत शेतकरी आहे.

Soybean price today
सोयाबीनचे आजचे भाव 
थोडं पण कामाचं
  • सोयाबीनच्या भावातील चढउतार वाढला
  • सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत
  • भाव वाढल्यावरच विकण्याच्या मनस्थितीत शेतकरी

Soybean Rate | मुंबई :  सोयाबीनच्या भावासंदर्भात (Soybean price)सारखे चढ उतार होत आहेत. मागील काही दिवस सोयाबीनचा (Soybean)भाव खाली येत होता. एकूणच राज्यात सोयाबीनला मिळणारा भाव आणि त्याच्याशी संबंधित परिस्थिती पाहता शेतकरी (Farmers)चिंतेत आहे. एक आठवड्यापूर्वी ७,००० रुपयांच्या आसपास असणारा भाव आता ६,००० रुपयांवर आल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येते आहे. बहुतांश बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे भाव (soybean rate fall) उतरले आहेत. आगामी दिवसांमध्ये सोयाबीनला भाव मिळणार की त्यात आणखी घट होणार, माल बाजार नेऊन विकावा की अजून वाट पाहावी असे प्रश्न शेतकऱ्यासमोर आ वासून उभे राहिले आहेत. (Soybean rate fall continues this week, farmers under pressure, check today Soybean price)

सोयाबीनचा भाव घसरला

राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनच्या भावाला गळतीच लागली आहे. अगदी ५,५०० रुपयांपासून ते ६,२०० रुपयांपर्यतचा भावदेखील बाजार दिसतो आहे. जास्तीत जास्त ६,५०० भाव मिळाला आहे, तोही काही ठराविक बाजारातच. आठवडाभरापूर्वी ७,००० रुपयांवर असणारा भाव आता ६,००० रुपयांच्या खाली उतरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकीकडे अतिवृष्टीने पीकावर परिणाम झाला. आता भाव मिळत नाही, अशा कात्रीत शेतकरी आहे. सोयाबीनचे उत्पादन घेऊन देखील भाव नसल्याने साठवलेल्या सोयाबीनबाबत शेतकरी त्रस्त आहे. आधीच्याच सोयाबीनला बाजारात भाव नसताना नवा सोयाबीन बाजारात येण्याचीही स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी काय करायचे हा शेतकऱ्यासमोरचा प्रश्नच आहे. 

साठवावा की विकावा

सोयाबीनला भाव नसल्याने सध्या साठवणूक करावी आणि वाट पाहावी. नंतर भाव वाढले की माल बाजारात विकावा, अशा मनस्थितीत शेतकरी असताना भाव कोसळतच चालले आहे. त्यातच उन्हाळी सोयाबीनचे पीकदेखील बाजारात येणार असल्याने आता आहे त्या मालाची साठवण करावी की मिळेल त्या भावात विकावा अशी स्थिती आहे. अर्थात बहुतांश शेतकरी संयमाने माल साठवून भाव वाढल्यावरच बाजारात न्यावा अशा तयारीत दिसत आहेत. मात्र परिस्थितीवर त्यांचे नियंत्रण नसल्याने सारखे चढउतार करणारे भाव शेतकऱ्याला चिंता करायला लावत आहेत.

ग्राहक आणि शेतकरी कात्रीत

खाद्य तेल (Edible oil) आणि तेलबिया यांचे भाव हे नेहमीच चर्चेत असतात आणि ते चिंतेचा विषय देखील असतात. एकीकडे भाव वाढल्यावर ग्राहक त्रस्त असतो, तर दुसरीकडे भाव पडल्यावर शेतकरी हवालदिल होतो. तर काहीवेळा दोघांच्याही तोंडचे पाणी पळालेले असते. मागील काही आठवड्यांपासून काही तेलबिया आणि खाद्यतेल यांच्या भावांमध्ये चढउतार दिसत आहेत. यात सोयाबीन (Soybean)प्रामुख्याने आहे. 

भाव पडत असल्याने व्यापारी देखील माल खरेदी करण्यास उत्सुक दिसत नाहीत. विविध बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक होते आहे मात्र भाव मिळत नाही. दर आठवड्याला सोयाबीनचे भाव वेगळेच चित्र दाखवत आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी