Soybean price | शेतकरी सोयाबीनच्या योग्य भावाच्या प्रतिक्षेत, भावात होतायेत चढ उतार

Soybean rate fluctuation | सोयाबीनच्या भावात अजूनही चढ उतार सुरू आहेच. सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची वाट शेतकरी पाहतो आहे. बाजारातील मालाची आवक आणि भाव यांचा थेट संबंध असतो. परिणामी एखादे पीक जोरात आले की त्याची बाजारातील आवक वाढते आणि मग त्या पीकाचा भाव कोसळतो. यावेळेस मात्र सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी बाजारात बाजारात सोयाबीन आणण्याचे टाळत आहे. तो भाव वाढण्याची वाट पाहतो आहे.

Soybean rate crisis
सोयाबीनच्या भावात चढउतार 
थोडं पण कामाचं
  • सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच
  • बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे भाव घसरले
  • शेतकरी सोयाबीनचे भाव वाढण्याच्या प्रतिक्षेत

Soybean rate crisis | नवी दिल्ली : सोयाबीनचे (Soybean)पीक हाती येऊनदेखील शेतकरी हवालदिल आहे. कारण सोयाबीनच्या भावात (Soybean rate)अजूनही चढ उतार सुरू आहेच. सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची वाट शेतकरी पाहतो आहे. बाजारातील मालाची आवक आणि भाव यांचा थेट संबंध असतो. परिणामी एखादे पीक जोरात आले की त्याची बाजारातील आवक वाढते आणि मग त्या पीकाचा भाव कोसळतो. यावेळेस मात्र सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी (Farmers) बाजारात बाजारात सोयाबीन आणण्याचे टाळत आहे. तो भाव वाढण्याची वाट पाहतो आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये सोयाबीनचे भाव कोणत्या पातळीवर स्थिरावतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. (Soybean rate still fluctuating, farmers are waiting to get better price)

शेतकरी हवालदिल

यंदाच्या मोसमात सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांना नाराज केले आहे. मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या भावात स्थिरता नाही. भाव कधी वर जातात तर कधी खाली येतात. ६,५०० ते ७,००० रुपयांच्या पातळीवर असलेले भाव ५,८०० रुपयांपर्यत खाली आले आहेत. काही मीलमध्ये ६,३०० पर्यत भाव मिळत आहेत. सोयाबीनला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी माल विकण्यास तयार नाही. तो भाव वाढण्याची वाट पाहतो आहे. मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यासमोर एक चिंता ही देखील आहे की आता उन्हाळी सोयाबीनचे पीकदेखील बाजारात येईल. आधीच्याच मालाला भाव नाही त्यात बाजारात नवीन आवक झाली तर भाव आणखी पडतील. 

शेतकऱ्याच्या संयम परीक्षा

या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या संयमाची परीक्षा ठरणार आहे. कारण शेतकऱ्याने जर बाजारातील मालाची आवक घटवली तर सोयाबीनचे भाव वाढू शकतात. मात्र त्याचबरोबर उन्हाळी सोयाबीनचे काय करायचे हादेखील प्रश्न आहे. बाजारातील आवकनुसारच व्यापारी मालाचा भाव ठरवत असल्याने पुढील काही आठवड्यात सोयाबीनची किती आवक बाजारात होते यावरच सर्व गणित अवलंबून असणार आहे. शेतकऱ्याने संयम दाखवल्यास त्याला चांगला भाव मिळू शकतो.

सोयापेंड, खाद्यतेलाची आयात यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा बाजारावर परिणाम होतो आहे. वायदेबाजारातील सोयाबीनच्या व्यवहारावर बंदीचा निर्णयदेखील शेतकऱ्याला अडचणीचा आहे. यामुळे शेतकऱ्याला भावाचा अंदाज येत असतो. 

मागील आठवड्यात सोयाबीनचे भाव ६५०० ते ७००० रुपयांच्या पातळीवर होते. सोयाबीनचे उत्पादन घेऊन देखील भाव नसल्याने काय करायचे या चिंतेत शेतकरी आहे. सध्या सोयाबीनचा भाव (Soybean price) ६,००० रुपयांच्या खाली आहे. क्वचितच एखाद दुसऱ्या बाजारसमितीत सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. दोन आठवड्यापूर्वी ७००० रुपये असलेला भाव आता आणखी खाली आला आहे. राज्यातील सोयाबीनच्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये चांगली आवक झाली होती. एकीकडे अतिवृष्टीमुळे पीक हाती येत नाही तर दुसरीकडे आलेल्या पीकाला चांगला भाव नाही अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. सोयाबीनचे भाव वाढले शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी