Soybean Price | पाहा आज काय आहे सोयाबीनचा भाव...शेतकऱ्यांची चिंता...बाजाराचा ट्रेंड

Soybean Price Today | राज्यातील विविध बाजारसमित्यांमधून सोयाबीनला किमान ५,१०० तर कमाल ६,५०० रुपयांपर्यतचा भाव मिळाल्याचे दिसून येते आहे. राज्यात सोयाबीनच्या भावासंदर्भात (Soybean price)सारखे चढ उतार होत आहेत. मागील काही दिवस सोयाबीनचा (Soybean)भाव खाली येताना दिसतो. काही ठिकाणी ५,१०० रुपयांपर्यत सोयाबीनचे भाव खाली आले आहेत. एकूणच राज्यात सोयाबीनला मिळणारा भाव आणि त्याच्याशी संबंधित परिस्थिती पाहता शेतकरी (Farmers)चिंतेत आहे.

Soybean Price Today
सोयाबीनचा आजचा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोयाबीनला चांगल्या भावाची प्रतिक्षा
  • सोयाबीनचा भाव पाहून शेतकरी चिंतेत
  • सोयाबीनच्या भावात अद्याप चांगली तेजी नाही

Soybean Rate | मुंबई : सोयाबीनचा भाव आज ५,१०० ते ६,५०० रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे. राज्यातील विविध बाजारसमित्यांमधून सोयाबीनला किमान ५,१०० तर कमाल ६,५०० रुपयांपर्यतचा भाव मिळाल्याचे दिसून येते आहे. राज्यात सोयाबीनच्या भावासंदर्भात (Soybean price)सारखे चढ उतार होत आहेत. मागील काही दिवस सोयाबीनचा (Soybean)भाव खाली येताना दिसतो. काही ठिकाणी ५,१०० रुपयांपर्यत सोयाबीनचे भाव खाली आले आहेत. एकूणच राज्यात सोयाबीनला मिळणारा भाव आणि त्याच्याशी संबंधित परिस्थिती पाहता शेतकरी (Farmers)चिंतेत आहे. एक आठवड्यापूर्वी ७,००० रुपयांच्या आसपास असणारा भाव आता ६,००० रुपयांवर आल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येते आहे. बहुतांश बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे भाव (soybean rate fall) उतरले आहेत.  (Soybean rate today, farmers under pressure, check today Soybean price)

सोयाबीनच्या भावातील चढउतार

विविध बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळताना दिसत नाही. अगदी ५,५०० रुपयांपासून ते ६,५०० रुपयांपर्यतचा भाव दिसतो आहे. सध्या जास्तीत जास्त ६,५०० रुपयांचा भाव आहे, तोही काही ठराविक बाजारातच. आठवडाभरापूर्वी ७,००० रुपयांवर असणारा भाव आता ६,००० रुपयांच्या खाली उतरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकीकडे अतिवृष्टीने पीकावर परिणाम झाला. आता भाव मिळत नाही, अशा कात्रीत शेतकरी आहे. सोयाबीनचे उत्पादन घेऊन देखील भाव नसल्याने साठवलेल्या सोयाबीनबाबत शेतकरी त्रस्त आहे. आधीच्याच सोयाबीनला बाजारात भाव नसताना नवा सोयाबीन बाजारात येण्याचीही स्थिती निर्माण झाली आहे. आगामी दिवसांमध्ये सोयाबीनला भाव मिळणार की त्यात आणखी घट होणार, माल बाजार नेऊन विकावा की अजून वाट पाहावी, हा शेतकऱ्यासमोरचा प्रश्नच आहे. 

नेमके काय करावे शेतकऱ्याने

काहींना वाटते आहे की सोयाबीनला भाव नसल्याने सध्या साठवणूक करावी आणि वाट पाहावी. नंतर भाव वाढले की माल बाजारात विकावा. शेतकरीदेखील द्विधा मनस्थितीत सापडला आहे. तर बाजारात भाव कोसळतच चालले आहे. त्यातच उन्हाळी सोयाबीनचे पीकदेखील बाजारात येणार असल्याने आता आहे त्या मालाची साठवण करावी की मिळेल त्या भावात विकावा अशी स्थिती आहे. अर्थात बहुतांश शेतकरी संयमाने माल साठवून भाव वाढल्यावरच बाजारात न्यावा अशा तयारीत दिसत आहेत. मात्र परिस्थितीवर त्यांचे नियंत्रण नसल्याने सारखे चढउतार करणारे भाव शेतकऱ्याच्या चिंतेत भर घालत आहेत.

मागील काही आठवड्यांपासून काही तेलबिया आणि खाद्यतेल यांच्या भावांमध्ये चढउतार दिसत आहेत. यात सोयाबीन (Soybean)प्रामुख्याने आहे. भाव पडत असल्याने व्यापारी देखील माल खरेदी करण्यास उत्सुक दिसत नाहीत. विविध बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक होते आहे मात्र भाव मिळताना दिसत नाही. दर आठवड्याला नव्हे तर दोन दिवसात सोयाबीनचे भाव वेगळेच चित्र दाखवत आहेत. शेतकऱ्याला आता रब्बी हंगामाचीदेखील चिंता सतावते आहे. त्यातच गारपीट आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी गारठला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी