SSC Result: पुण्यातील ‘या’ विद्यार्थ्यानं चक्क ३५ टक्के मार्क्स मिळवण्याचा केला पराक्रम

काम-धंदा
Updated Jun 09, 2019 | 17:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

१०० टक्के गुण परीक्षेत मिळालेले आपण ऐकले असतील. पण एका विद्यार्थ्यानं अवघड असा पराक्रम केलाय. त्यानं सर्वच विषयांमध्ये ३५ गुण मिळवून बरोब्बर ३५ टक्के मार्क्स मिळविण्याचा पराक्रम केलाय. जाणून घ्या याबद्दल..

SSC result
पुण्यात विद्यार्थ्याला दहावीत मिळाले ३५ टक्के गुण  |  फोटो सौजन्य: Representative Image

पुणे: आज परीक्षेचा निकाल म्हटलं की, निकालाच्या दिवशी अनेकांच्या तोंडून नव्वद टक्क्यांच्यावरची आकडेवारी ऐकायला मिळते. एखाद्या विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळाल्याचंही आपण ऐकलं असेल. पण अवघ्या बाऊंड्रीवर सर्वच विषयांत पास होणारे फार कमी असतात. अशाच एका विद्यार्थ्यांनं दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात ३५ गुण मिळवत हा अवघड पराक्रम गाजवलाय. सध्या राज्यात सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.

पुण्यातील धनकवडी येथील रोहन माध्यमिक शाळेतील श्रवण राजेश साळुंके असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्यानं सर्व विषयांमध्ये ३५ मार्क्स मिळवले आहेत. श्रवण हा पुण्यातील नाना पेठ येथे राहणारा आहे. मात्र शिक्षणासाठी तो आपल्या मामाकडे धनकवडीला आला होता. गेल्या वर्षी नवव्या वर्गामध्ये तो नापास झाला होता. त्यानंतर त्यानं धनकवडी इथल्या शाळेत दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर सर्वच विषयांमध्ये ३५ टक्के गुण मिळवून श्रवणनं एक अवघड पराक्रम गाजवला आहे.

पुण्यातील श्रवण सारखाच हा पराक्रम ठाण्यातील एका विद्यार्थ्यानं गाजवलाय. मीरारोड इथं राहणाऱ्या अक्षित जाधव या विद्यार्थ्याला सुद्धा सर्वच विषयांमध्ये ३५ गुण मिळाले. अक्षीत जाधवचे वडील गणेश जाधव हे मूळचे रायगड जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहेत. मात्र, ते कामानिमित्तानं ते ठाण्यातील मीरारोड इथल्या शांतीनगर परिसरात राहतात. गणेश जाधव हे डायमंड मार्केटमध्ये कामाला आहेत. मुलगा अक्षित नवव्या वर्गात नापास झाल्यानंतर त्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी त्याचा फॉर्म नंबर १७ भरला आणि त्याला दहावीच्या परीक्षेला बसवलं. या परीक्षेत अक्षित सुद्धा सर्वच विषयांमध्ये ३५ मार्क्स मिळवले आहेत.

SSC Result: akshit ganesh jadhav scored 35 percent all subject

दरम्यान, शनिवारी राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागलाय. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी झालीय. यंदा तब्बल २० विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे मुलींचं जास्त आहे. राज्यातील विविध विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. नागपूर विभागाचा यंदाचा निकाल हा ६७.२७ टक्के इतका लागला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
SSC Result: पुण्यातील ‘या’ विद्यार्थ्यानं चक्क ३५ टक्के मार्क्स मिळवण्याचा केला पराक्रम Description: १०० टक्के गुण परीक्षेत मिळालेले आपण ऐकले असतील. पण एका विद्यार्थ्यानं अवघड असा पराक्रम केलाय. त्यानं सर्वच विषयांमध्ये ३५ गुण मिळवून बरोब्बर ३५ टक्के मार्क्स मिळविण्याचा पराक्रम केलाय. जाणून घ्या याबद्दल..
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola