Goat Farming: 90% अनुदानासह सुरू करा शेळीपालन व्यवसाय, घरबसल्या कमवा लाखो रुपये

काम-धंदा
Updated Mar 19, 2023 | 09:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Start Goat Farming Business : सध्या अनेक तरुण नोकरी सोडून व्यवयायाकडे वळत आहेत. आणि आता भारतातील लोक शेळीपालन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. शेळीपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा झाला आहे.

Start Goat Farming Business with 90% Subsidy Earn Millions of Rupees from Home
90% अनुदानासह सुरू करा शेळीपालन व्यवसाय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारत सरकार पशुपालनावर 35% नुदान देते
  • देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान
  • उदर्निर्वाहाचे साधन

Business Idea :सध्या अनेक तरुण नोकरी सोडून व्यवयायाकडे वळत आहेत. आणि आता भारतातील लोक शेळीपालन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. शेळीपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा झाला आहे. शेळीपालनातून दूध, खत इत्यादी अनेक प्रकारचे फायदे मिळतात. तुम्ही देखील या व्यवसायातून भरपूर कमाई करू शकता आणि नुकसानाची चिंताही कमी आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान

शेळीच्या दुधापासून ते मांसापर्यंत सर्वच वस्तूंना बाजारात चांगली मागणी आहे. हल्ली बाजारात शेळीच्या दुधाला खूप मागणी आहे. त्याच वेळी शेळीच्या मासाची देशांतर्गत मागणी खूप जास्त आहे आणि त्याची किंमत देखील जास्त आहे.  हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. सध्या हा एक असा व्यवसाय मानला जातो, जो देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि पोषणात खूप योगदान देतो. 

अधिक वाचा: Aadhaar Update Steps in marathi: आता Aadhaar अपडेट होईल फुकटात; UIDAI ने दिली माहिती

भारत सरकार पशुपालनावर 35% नुदान देते

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देखील मदत करते. 90 टक्क्यांपर्यंत सबसिडीची सुविधा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकते. सरकारी मदत घेऊन तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. ग्रामीण भागात पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राज्य सरकार पशुपालकांना 90 टक्के पर्यंत सबसिडी देत ​​आहे. भारत सरकार पशुपालनावर 35% पर्यंत अनुदान देत आहे. शेळीपालन सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही बँकांकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता. नाबार्ड देखील तुम्हाला शेळीपालनासाठी कर्ज उपलब्ध करून देते.

अधिक वाचा: Campa Cola । कोका कोला झाला स्वस्त! रिलायन्सच्या एंट्रीने खेळ बिघडवला

उदर्निर्वाहाचे साधन

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे ठिकाण, चारा, ताजे पाणी, आवश्यक मजुरांची संख्या, पशुवैद्यकीय मदत, बाजारपेठ आणि निर्यात क्षमता याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या व्यवसायात शेळीच्या दुधापासून मांसापर्यंत मोठी कमाई होते.  भारतात ही व्यवसाय नविन नाही आणि हा व्ययसाय प्रक्रिया प्राचीन काळापासून सुरू आहे आणि अनेकांच्या उदनिर्वाहाचे साधन आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी