Business Tips :अटर्ली, बटर्ली...प्रचंड फायदेशीर! अमूलबरोबर छोट्याशा भांडवलाद्वारे सुरू करा दणदणीत कमाईचा व्यवसाय

Business Idea : दूध आणि त्याच्या उत्पादनांचा व्यवसाय (Dairy Business) हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. लोक या व्यवसायात गुंतवणूक करून चांगला नफा कमावत आहेत. देशातील सर्वात मोठ्या दुधाच्या डेअरींपैकी एक असलेली अमूल (Amul) लोकांना त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याची संधी देते. अमूल लोकांना त्यांच्या स्वत:च्या फ्रँचायझी स्थापन करण्यासाठी एकत्र आणते. अशा परिस्थितीत कोणीही अमूलची फ्रँचायझी (Amul Franchise) घेऊन अमूल पार्लर उघडू शकतो.

Amul Parlor Outlet
अमूल पार्लर आउटलेटद्वारे सुरू करा व्यवसाय 
थोडं पण कामाचं
  • स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छित असणाऱ्यांसाठी मोठी संधी
  • अमूल फ्रँचायझी पार्लर सुरू करा फक्त 2 लाख ते 5 लाख रुपयांनिशी
  • अमूलच्या उत्पादनांवर मिळवा जबरदस्त मार्जिन आणि करा मोठी कमाई

Amul Parlor Outlet : नवी दिल्ली : दूध आणि त्याच्या उत्पादनांचा व्यवसाय (Dairy Business) हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. लोक या व्यवसायात गुंतवणूक करून चांगला नफा कमावत आहेत. देशातील सर्वात मोठ्या दुधाच्या डेअरींपैकी एक असलेली अमूल (Amul) लोकांना त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याची संधी देते. अमूल लोकांना त्यांच्या स्वत:च्या फ्रँचायझी स्थापन करण्यासाठी एकत्र आणते. अशा परिस्थितीत कोणीही अमूलची फ्रँचायझी (Amul Franchise) घेऊन अमूल पार्लर उघडू शकतो. अमूल फ्रँचायझी मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि हाती जास्त भांडवलदेखील नाही अशांसाठी ही एक चांगली संधी आहे. (Start your own business through Amul parlor franchise with little investment)

अधिक वाचा : Scrub Typhus : राज्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव; या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

अलीकडच्या काळात व्यवसायाचे महत्त्व वाढत चालले आहे. अनेकजण नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य देतात. मात्र अनेकवेळा भांडवलाअभावी किंवा नेमका काय व्यवसाय करावा याची कल्पना नसल्यामुळे अनेकांना व्यवसाय सुरू करता येत नाही. अशांसाठी अमूलबरोबर व्यवसाय सुरू करण्याची जबरदस्त संधी आहे.

किती गुंतवणूक करावी लागेल?

अमूलमध्ये सहभागी होऊन तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. अमूल पार्लर (Amul Parlor Outlet)हे अमूल आउटलेट्स असतात जिथे त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. ते उघडण्यासाठी किमान 100 चौरस फूट जागा आवश्यक आहे. ते उघडण्यासाठी तुम्हाला 2 लाख ते 5 लाख रुपये खर्च करावे लागतील. हे पैसे अमूलच्या फॉर्मेटनुसार आउटलेटवर आणि इतर उपकरणे बसवण्यासाठी खर्च केले जातील.

मार्जिन पासून कमाई

अमूलकडून आउटलेटची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला 25 हजार रुपये सिक्युरिटी मनी म्हणून जमा करावे लागतील. याशिवाय अमूलला एक रुपयाही द्यावा लागत नाही. अमूल डीलर्स आउटलेटवर उत्पादनाचा पुरवठा करतात, ज्याची विक्री केल्यावर फ्रँचायझीला मार्जिन मिळते. किरकोळ मार्जिन उत्पादनानुसार बदलते आणि पूर्णपणे पार्लर मालकावर अवलंबून असते.

अधिक वाचा : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरावर CBIची धाड

पैसा कुठे खर्च होतो?

अमूल पसंतीचे आउटलेट उघडण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये खर्च करावे लागतील. यासाठी 100-150 चौरस फूट जागा हवी आहे. 2 लाख रुपयांपैकी तुम्हाला 25 हजार रुपये अमूलला ब्रँड सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील. उर्वरित पैसे नूतनीकरण आणि उपकरणांवर खर्च केले जातात.

अधिक वाचा : Sapna Choudhary at Beed : अगोदर श्रद्धांजली, मग दहीहंडीचा उत्साह! सपना चौधरीच्या ठुमक्यांवर थिरकत बीडकर विसरले अतिवृष्टीचं दुःख, पाहा VIDEO

तुम्ही किती कमवाल

आता कमाईबद्दल बोलायचे तर दुधाच्या पॅकेटवर 2.5 टक्के मार्जिन उपलब्ध आहे. दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के मार्जिन उपलब्ध आहे. हे उत्पादन विकून तुम्ही मोठी कमाई करू शकता. यासोबतच टार्गेट पूर्ण केल्याबद्दल डेअरीकडून विशेष प्रोत्साहनही मिळते.

येथे संपर्क करा 

अमूल पार्लर उघडण्यासाठी तुम्ही सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत 022-68526666   या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, फ्रँचायझीच्या चौकशीसाठी तुम्ही retail@amul.coop वर मेल देखील करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी