SBI 3-in-1 Account | नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank of India)ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी ३ इन १ खात्याची (SBI 3-in-1 Account) सुविधा दिली आहे. यामध्ये बचत खाते (Saving Account), डीमॅट खाते (Dmat Account)आणि ट्रेडिंग खाते (Trading Account) एकत्र मिळते आहे. या खात्यामुळे ग्राहकांना एकाच खात्यात तीन सुविधांचा लाभ घेता येणार आहे. स्टेट बॅंकेने यासंदर्भातील ट्विट केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती https://bank.sbi/web/personal-banking/investments-deposits/stocks-securities/3-in-1-account या अधिकृत वेबसाइटवर घेता येणार आहे. (State bank gives offer of 3 in 1 account facility, check the details)
जर तुम्हाला एसबीआयचे ३ इन १ खाते सुरू करायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असली पाहिजेत. बचत खाते सुरू करण्यासाठी पुढील कागदपत्रे असली पाहिजेत.
१. पॅन कार्ड किंवा फॉर्म ६० (PAN or Form 60)
२. फोटोग्राफ
३. पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, मनरेगाद्वारे देण्यात आलेले जॉब कार्ड आणि राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरद्वारे देण्यात आलेले पत्र
१. पासपोर्ट साइज फोटोग्राफ
२. पॅन कार्ड कॉपी
३. आधार कार्ड कॉपी
४. एक कॅन्सल चेक किंवा लेटेस्ट बॅंक स्टेटमेंट
यासंदर्भात ट्रेडर्सला ई-मार्जिन सुविधेबद्दल माहिती असली पाहिजे. इथे लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे, या सुविधेअंतर्गत कोणीही किमान २५ टक्के मार्जिनसह ट्रेडिंग करू शकतो आणि आवश्य मार्जिन मिळवण्यासाठी कॅश किंवा कोलॅटरलचा वापर करून ३० दिवसांपर्यत ते पुढे नेऊ शकतो.
१. एसबीआय सिक्युरिटी वेब प्लॅटफॉर्म सिक्युरिटी वेब प्लॅटफॉर्म माध्यमातून ट्रेडिंग खात्यात लॉग इन करा.
२. ऑर्डर प्लेसमेंट (खरेदी किंवा विक्री) मेनूवर जा.
३. ऑर्डर देताना प्रॉडक्ट टाइप करून ई-मार्जिनच्या रुपात निवडा
अधिक माहितीसाठी इच्छूक व्यक्ती एसबीआयच्या bank.sbi या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करू शकता.
एसबीआयने मोठा निर्णय घेताना बेस रेटमध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे. बॅंकेकडून वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ०.१० टक्के वाढ केल्यानंतर बेस रेट ७.५५ टक्के झाला आहे. कोणत्याही बॅंकेचा बेस रेट किमान रेट असतो ज्याच्याखाली कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला बॅंक कर्ज देऊ शकत नाही. बेस रेट तो दर आहे ज्या व्याजदराला बॅंक आपल्या ग्राहकांसाठी लागू करतो.
देशातील सर्वात मोठी बॅंक असलेली स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India)आपल्या ग्राहकांसाठी आणि नागरिकांसाठी अनेक सुविधा राबवत असते. अशीच एक ऑफर आहे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी स्टेट बॅंक देते आहे. एसबीआय व्यवसाय करणाऱ्यांना करंट अकाउंट (Current Account) म्हणजे चालू खाते सुरू करण्याची सुविधा देते. एसबीआय करंट अकाउंट (SBI Current Account) हे फारच उपुयक्त आहे, विशेषत: जे छोटे व्यावसायिक, व्यापारी ज्यांना सर्व किंवा जास्तीत जास्त सुविधा या कमी शुल्कावर हव्या असतात. एसबीआय या ऑफरचे नाव आहे एसबीआय प्लॅटिनम करंट अकाउंट (SBI Platinum Current Account). या करंट अकाउंटद्वारे एसबीआय अनेक सुविधा आणि लाभ देते.