Stock Market : घटीसह खुला झाला शेअर बाजार, सेन्सेक्स ५० अंकानी घसरला, निफ्टी ११९०० खाली 

 स्थानिक शेअर बाजार बुधवारी कमकुवत जागतिक कलामुळे आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी किरकोळ घटीसह खुला झाला.

stock market 28 October 2020 Mumbai sensex nifty
Stock Market : घटीसह खुला झाला शेअर बाजार 

थोडं पण कामाचं

  •  स्थानिक शेअर बाजार बुधवारी कमकुवत जागतिक कलामुळे आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी किरकोळ घटीसह खुला झाला.
  • गेल्या सत्रात शेअर बाजार दिवसभर चढ उतारानंतर हिरव्या निशाणावर  बंद झाला.
  • आज प्रमुख शेअर्समध्ये टाटा मोटर्स, हिंदुस्तान यूनिलीवर, पावर ग्रिड, इन्फोसिस आणि एचसीएल टेकची सुरूवात हिरव्या निशाणाने झाली.

नवी दिल्ली :  स्थानिक शेअर बाजार बुधवारी कमकुवत जागतिक कलामुळे आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी किरकोळ घटीसह खुला झाला. BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 49.58  अंकांनी घसरून 40472.52 अंकांवर खुला झाला. तर NSE चा Nifty  14.60 अंकासह  घटीसह 11874.80 अंकांवर बंद झाला.  
 
गेल्या सत्रात शेअर बाजार दिवसभर चढ उतारानंतर हिरव्या निशाणावर  बंद झाला. सेंसेक्स 376.60 अंक वर 40522.10 च्या स्तरावर बंद झाला होता. दुसरीकडे निफ्टी 121.65  अंकांच्या वाढीसह 11889.40 च्या स्तरावर बंद झाला होता. 

आज प्रमुख शेअर्समध्ये टाटा मोटर्स, हिंदुस्तान यूनिलीवर, पावर ग्रिड, इन्फोसिस आणि एचसीएल टेकची सुरूवात हिरव्या निशाणाने झाली. दुसरीकडे   श्री सीमेंट, एचडीएफसी, बजाज फाइनेंस, अडाणी पोर्ट्स आणि अल्ट्राटेक सिमेंटची सुरूवात घटीसह झाली.  

सेक्टोरियल इंडेक्सवर नजर टाकली असता. आज प्राइवेट बँक, फाइनेंस सर्विसेज आणि रियल्टी लाल निशााणावर खुले झाले. दुसरीकडे पीएसयू बँक, मीडिया, एफएमसीजी, फार्मा, रियल्टी, आयटी, ऑटो आणि प्राइवेट बँकची सुरूवात तेजीने झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी