Stock Market : घसरणीने खुला झाला शेअर बाजार, 40,000च्या खाली आला सेन्सेक्स  

 Stock Market Today । स्थानिक शेअर बाजार गुरूवारी आठवड्याच्या चौथ्या दिवशी किरकोळ घसरणीसह खुला झाला.

stock market 29 October 2020 Mumbai sensex nifty
घसरणीने खुला झाला शेअर बाजार, 40,000च्या खाली आला सेन्सेक्स   

थोडं पण कामाचं

  • स्थानिक शेअर बाजार गुरूवारी आठवड्याच्या चौथ्या दिवशी किरकोळ घसरणीसह खुला झाला.
  • गेल्या सत्रात शेअर बाजार दिवसभर चढ उतारानंतर मोठी घसरण होऊन बाजार  बंद झाला.
  • शेअर बाजारात आलेली घट ही बीएसईतील लिस्टेड कंपन्यांच्या बाजार मूल्य 1,56,739.58 कोटींनी घटून 1,58,22,119.75 कोटी झाली आहे. 

नवी दिल्ली :  स्थानिक शेअर बाजार गुरूवारी आठवड्याच्या चौथ्या दिवशी किरकोळ घसरणीसह खुला झाला. BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 298.36  अंकांनी घसरून 39624.10 अंकांवर खुला झाला. तर NSE चा Nifty  96.30 अंकासह  घटीसह 11633.30 अंकांवर खुला झाला.  
 
गेल्या सत्रात शेअर बाजार दिवसभर चढ उतारानंतर मोठी घसरण होऊन बाजार  बंद झाला. सेंसेक्स 599.64 अंक वर 39922.46 च्या स्तरावर बंद झाला होता. दुसरीकडे निफ्टी 159.80   अंकांच्या घटीसह 11729.60 च्या स्तरावर बंद झाला होता. 

आज प्रमुख शेअर्समध्ये टेक, महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इचर मोटर्स और एल एंड टीची सुरूवात हिरव्या निशाणाने झाली. दुसरीकडे   श्री सीमेंट, भारती एयरटेल, बजाज ऑटो और एनटीपीटीची सुरूवात घटीसह झाली.  

सेक्टोरियल इंडेक्सवर नजर टाकली असता. आज सर्व सेक्टर लाल निशाणावर खुले झाले. प्राइवेट बँक, फाइनेंस सर्विसेज, रियल्टी,  पीएसयू बँक, मीडिया, एफएमसीजी, फार्मा, रियल्टी, आयटी, ऑटो आणि प्राइवेट बँक यात समावेश आहे.


शेअर बाजारात आलेली घट ही बीएसईतील लिस्टेड कंपन्यांच्या बाजार मूल्य 1,56,739.58 कोटींनी घटून 1,58,22,119.75 कोटी झाली आहे. 

सेन्सेक्समध्ये सामील शेअर्समध्ये इंडसइंड बँकेला सर्वाधिक नुकसान होत आहे. यात सुमारे 3.45 टक्के घट आली. या शिवाय एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फाइनान्स अल्ट्राटेक सिमेंट और एचडीएफसी बँक यांच्या शेअरमध्येही घट दिसली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी