कोरोनाचा शेअर मार्केटवर परिणाम सुरुच, सेन्सेक्स 811 अंकांनी कोसळून बंद, निफ्टीतही घसरण

काम-धंदा
Updated Mar 17, 2020 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे शेअर बाजारातही परिणाम बघायला मिळतोय. चारही बाजूंनी बिकवाली सुरू आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण बघायला मिळतेय.

share market
कोरोना व्हायरसचा शेअर मार्केटवर परिणाम सुरूच   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरसचा शेअर मार्केटवर परिणाम सुरूच
  • मंगळवारी दिवसभर सेन्सेक्समध्ये चढ-उतार
  • बाजार बंद होतांना सेन्सेक्स 811 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण

मुंबई: आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स कोसळला. त्यानंतर जवळपास १ तासात सुधारणा होत बीएसईचं सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारलं. मात्र दिवसभर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाली. शेअर बाजार बंद होताच सेन्सेक्स ८१०.९८ अंकांनी घसरत ३०,५७९.०९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २३०.७० अंकांनी घसरत ८,९६६.७० अंकांवर बंद झालं. बीएसई २.५८ टक्क्यांनी आणि निफ्टी २.५१ टक्क्यांनी एकूण बाजार घसरला. सर्वाधिक बूम येस बँकेच्या शेअर्समध्ये बघायला मिळाले.  

सोमवारी सुद्धा बाजारात घसरण बघायला मिळाली

तीस शेअर्स असलेले बीएसई  सेन्सेक्स सोमवारी २,७१३.४१ अंक म्हणजेच ७.९६ टक्क्यांच्या घसरणीसोबत ३१,३९०.०७ अंकांवर बंद झाला होता. याच पद्धतीनं नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच निफ्टी सुद्धा ७५७.८० अंक म्हणजेच ७.६१ टक्क्यांच्या घसरणीसोबत ९,१९७.४० अंकांवर बंद झाला होता. अंकांच्या आधारावर सेन्सेक्समध्ये ही दिवसातून दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण होती. यापूर्वी १२ मार्चला सेन्सेक्स आणि निफ्टी क्रमश: २,९१९.२६ अंक आणि ८६८.२५ अंकांनी घसरला होता.

सर्व शेअर्स तोट्यात राहिले

सेन्सेक्समध्ये सर्व शेअर्स तोट्यात राहिले. सर्वाधिक नुकसान इंडसइंड बँकेचं झालं ज्याचे शेअर्स १७.५० टक्क्यांनी घसरले. यानंतर क्रमश: टाटा स्टील ११.०२ टक्क्यांनी, एचडीएफसी १०.९४ टक्क्यांनी, एक्सिस बँक १०.३८ टक्क्यांनी आणि आयसीआयसीआय बँक ९.९६ टक्क्यांनी घसरले.

आशियातील बाजारात दिसली घसरण

आशियातील इतर बाजारांमध्ये म्हणजेच शांघाय ३.४० टक्के, हाँगकाँग ४.०३ टक्के, सोल ३.१९ टक्के आणि टोक्यो २.४६ टक्क्यांनी घसरण बघायला मिळाली. युरोपच्या प्रमुख बाजारांमध्ये सुरुवातीला ८ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवली गेली.

चीनमुळे होतेय बाजारात घसरण

चीनमध्ये कारखान्यातील उत्पादनं आणि किरकोळ विक्रीचा आकडा कमकुवत झाला आहे. त्यामुळे याचा फटका आशियातील सर्व बाजारांना होतोय. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात आर्थिक संकट बघायला मिळतंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...