Stock Market latest updates: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांची संख्याही अधिक आहे. शेअर बाजारातील अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना फारच कमी वेळेत मालामाल करुन दिलं आहे. ट्रेंडलाईन (Trendlyne)चे मार्केट अॅनालिस्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार असे काही स्टॉक्स आहेत जे येत्या वर्षभरात मोठा परतावा देण्याची क्षमता ठेवतात. जाणून घ्या कोणते आहेत हे स्टॉक्स...
फॅशन ज्वेलरी आणि लाईफस्टाईल अॅक्सरसाईज मॅन्युफॅक्चरिंग निर्माता कंपनी वैभव ग्लोबलमध्ये पुढील 12 महिन्यांत जवळपास 105 टक्क्यांची तेजी पहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्टॉकची सध्याची किंमत 321 रुपये आहे.
हे पण वाचा : ट्रेनचं वजन किती असतं रे भाऊ?
केमिकल मॅन्युफॅक्चरर कंपनी बालाजी एमाइंसची सध्याची मार्केट प्राईस जवळपास 2154 रुपये आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील वर्षभरात या स्टॉकमध्ये 93 टक्क्यांची तेजी पहायला मिळण्याची शक्यता आहे.
मॅक्रोटेक डेवलपर्स एक इंडियन मल्टिनॅशनल रिअल इस्टेट कंपनी आहे. हा स्टॉक पुढील 12 महिन्यांत जवळपास 77 टक्के तेजी दाखवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या स्टॉकची करंट प्राईस 718 रुपये इतकी आहे.
हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?
हा स्टॉक आगामी वर्षभरात 92 टक्के तेजी दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही एक केमिकल कंपनी आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राईस 451.35 रुपये इतकी आहे.
या कंपनीचा स्टॉक पुढील वर्षभरात 69 टक्के तेजीने पुढे जाताना पाहिला जाण्याची शक्यता आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राईस जवळपास 16.55 रुपये इतकी आहे. 2010 मध्ये स्थापन झालेली इंफिबीम एवेन्यू कंपनी आयटी सर्व्हिस मॅनेजमेंटचं काम करते.
हे पण वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?
या कंपनीच्या स्टॉकमध्ये पुढील 12 महिन्यांत 69 टक्क्यांची तेजी पहायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या या स्टॉकची मार्केट प्राईस 426.5 रुपये होती. ही हेल्थ केअर सेक्टरमधील कंपनी आहे.
हा एक केमिकल स्टॉक आहे. या स्टॉकमध्ये वर्षभरात 90 टक्क्यांची तेजी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या स्टॉकची करंच मार्केट प्राईस 972.75 रुपये इतकी आहे.
हे पण वाचा : प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची ही आहेत लक्षणे
फायनान्स आणि इव्हेस्टमेंट सर्व्हिस कंपनी आयआयएफएल फायनान्स पुढील 12 महिन्यांत जवळपास 70 टक्क्यांची तेजी दाखवण्याची शक्यता आहे.
टेक्सटाईल बिझनेस कंपनी सेंच्युरी टेक्सटाईल्स अँड इंडस्ट्रीज पुढील 12 महिन्यांत जवळपास 84 टक्क्यांची तेजी दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राईस 606 रुपयांच्या आसपास आहे.
हे पण वाचा : या व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस
इंडस्ट्रियल आणि अॅग्रीकल्चरशी संबंधित केमिकल आणि फर्टिलायझर बनवणारी कंपनी दीपक फर्टिलायजर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन स्टॉक पुढील 12 महिन्यांत जवळपास 75 टक्क्यांची तेजी दाखवण्याची शक्यता आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राईस 626 रुपये इतकी आहे.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. वरील स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आम्ही तुम्हाला सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)