Stock Open: सुरूवातीला 55  अंकाची उसळी 44,008 च्या विक्रमी पातळीला Sensex, या शेअरमध्ये तेजीने

स्थानिक शेअर बाजार बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीचा सातत्य कायम राहिले.

stock open sensex reaches to record high in opening
Sensex ने 55 अंकाची उसळी घेऊन 44,008 च्या विक्रमी पातळीला 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक शेअर बाजार बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीचा सातत्य कायम राहिले.
  • इतर आशियाई बाजारात सकारात्मक संकेतांमुळे फायनानशियल स्टॉकमध्ये तेजीमुळे स्थानिक बाजारात तेजी पाहायला मिळाली.  
  • शेअर बाजारांच्या आकड्यांनुसार मंगळवारी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी  शुद्ध आधारावर 4,905.35 कोटी रुपयांच्या मूल्याचे शेअर खरेदी केले. 

नवी दिल्ली :   स्थानिक शेअर बाजार बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीचा सातत्य कायम राहिले. सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 55.15   अंकांच्या तेजी सह 44,007.86 च्या विक्रमी स्तरावर  पोहचला.  NSE चा Nifty  19.10  अंक तेजीसह  12,893.30 अंकांवर ट्रेडिंग करत आहे. BSE Sensex वर सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. 

इतर आशियाई बाजारात सकारात्मक संकेतांमुळे फायनानशियल स्टॉकमध्ये तेजीमुळे स्थानिक बाजारात तेजी पाहायला मिळाली.  सेंसेक्समध्ये सुरूवातीला पावरग्रीडच्या शेअरमध्ये एक टक्क्यापेक्षा अधिकची तेजी पाहायला मिळाली. 

यानंतर एसबीआय, लार्सन एंड टुब्रो, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. दुसरीकडे एचयूएल, टायटन, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया आणि टीसीएस च्या शेअरमध्ये सुरूवातीला घट पाहायला मिळाली. 

यापूर्वी गेल्या सत्रात  BSE Sensex 314.73 अंक म्हणजे 0.72 टक्के वाढून 43,952.71 अंकांच्या स्तरावर  बंद झाला होता.  Nifty 93.95 अंक म्हणजे 0.74 टक्के वाढून 12,874.20 अंकांच्या स्तरावर बंद झाला होता. 

शेअर बाजारांच्या आकड्यांनुसार मंगळवारी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी  शुद्ध आधारावर 4,905.35 कोटी रुपयांच्या मूल्याचे शेअर खरेदी केले. 

रिलायन्स सिक्योरिटीज इन्स्टिट्यूशल बिझनेसचे  प्रमुख अर्जुन यश महाजन यांनी सांगितले की, ' साधारण वैश्विक संकेतामुळे स्थानिक बाजार सपाट दिसतो आहे. दरम्यान, निफ्टी 13,000 अंकाचा मनोवैज्ञानिक स्तर लवकरच गाठू शकतो.  सध्या अंतर्गत मजबूती अजूनही टिकून आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी