बजेट सादर होण्यापूर्वीच गॅस सिलेंडरचे दर भडकले 

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पआधी किंमती वाढल्या आहेत. गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्या महिन्यात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता जास्त पैसे खर्च करावे लागतील.

बजेट सादर होण्यापूर्वीच गॅस सिलेंडरचे दर भडकले 
story commercial gas cylinder price increased by 225 rupees know the new price of gas cylinder business news in marathi budget 20-21  

नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पआधी किंमती वाढल्या आहेत. गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्या महिन्यात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता जास्त पैसे खर्च करावे लागतील. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये २२४.९८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी देशांतर्गत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 

फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरवर २२४.९८ रुपयांची वाढ केल्यात आल्याने त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसणार आहे. त्याचा अप्रत्यक्ष फटका हा ग्राहकांना बसणार आहे. व्यापाऱ्यांना आता या वाढीनंतर व्यावसायिक सिलेंडरसाठी १५५०.०२ रुपये द्यावे लागतील. या वाढीव किंमती आजपासून लागू झाल्या आहेत.

सिलेंडर              किंमत
14.2 किलो -   749.00 रुपए    
19 किलो    -  1550.02 रुपए

गेल्या तीन महिन्यात सिलेंडरची किंमत

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019
14.2 किलो 749.00 रुपये 730.00 रुपये 716.50 रुपये
19 किलो 1325.00 रुपये 1295.50 रुपये 716.50 रुपये
5 किलो 276.00 रुपये 269.00 रुपये 264.50 रुपये

दरम्यान,  घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गॅस सिलेंडरच्या किंमती गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने वाढतच होत्या. त्याचबरोबर आज सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हणजेच, १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला १४.२ किलो सिलेंडर फक्त ७४९ रुपयांना मिळेल. याशिवाय ग्राहकांच्या खात्यात २३८.१० रुपये अनुदान दिले जाईल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...