Story of Cyrus Mistry : मुंबई : टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा एका कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर टाटा समूहातील एका अध्यायाची अखेर झाली आहे. पालघरजवळ एका रस्ते अपघातात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याने (Cyrus Mistry Death) उद्योग विश्वाला मोठाच धक्का बसला आहे. एरवी टाटा समूह हा शांतपणे आणि आपली व्यावसायिक मूल्ये जपत उद्योग-व्यवसाय चालवणारा समूह म्हणून ओळखला जातो. मात्र सायरस मिस्त्री आणि टाटांमधील वादाने टाटा समूहाच्या (Tata Group) व्यवस्थापनासंदर्भातील वाद चर्चेचा विषय झाला होता. 4 जुलै 1968 मध्ये जन्म झालेले सायरस मिस्त्री हे देशातील एका श्रीमंत आणि नामांकित व्यावसायिक घराचे वारसदार होते. सायरस मिस्त्री, त्यांचा शापूरजी पालनजी उद्योगसमूह (Shapoorji Pallonji Group) आणि त्यांचा टाटांबरोबरचा वाद याबद्दल जाणून घेऊया. (Story of Cyrus Mistry and his clash with Tata group)
अधिक वाचा : हे प्लान खरेदी करा आणि Free मध्ये घ्या Netflix चा आनंद
सायरस मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख असलेल्या पालनजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते. शापूरजी पालनजी समूह हा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेला देशातील आघाडीचा उद्योग समूह आहे. ज्याची सुरुवात 19व्या शतकात पालनजी मिस्त्री यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या बांधकाम कंपनीतून झाली होती. मिस्त्री हे मुंबईच्या पारशी समाजाचे सदस्य होते. झोरोस्ट्रियन धर्माचे अनुयायी होते. ते ब्रिटिश काळात अगदी सुरूवातीपासूनच व्यापारी आणि उद्योगपती म्हणून समृद्ध झाले होते. सायरसने इंग्लंडमधील उच्च शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी मुंबईतील प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. त्यांनी लंडनच्या इंपीरियल कॉलेज येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. 1991 मध्ये त्यांनी कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला होता. शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेड या प्रमुख बांधकाम कंपनीचे ते संचालक झाले. त्यांचा भाऊ शापूर यांनी समूहाच्या रिअल इस्टेट व्यवसायाचे कामकाज पाहिले आणि त्यांचे वडील संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पुढे कार्यरत राहिले. पालनजी मिस्त्री हे टाटा समूहाच्या संचालक मंडळातदेखील होते.
शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये 10 वर्षांसाठी टाटा समूहाचा चेअरमन बनवण्यात आले होते. मात्र त्यांच्या कामकाजामुळे नाराज होत 2016ला सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हटवण्यात आले होते. यानंतर सायरस मिस्त्री आणि टाटा समूहातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोचला होता. या वादात सर्वोच्च न्यायालयाने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय दिला होता. एका बाजूला टाटा समूहातून पीछेहाट होत असतानाच आपल्या स्वत:च्या शापूरजी पालनजी समूहातील आव्हानांनादेखील सायरस मिस्त्रींना तोंड द्यावे लागत होते.
अधिक वाचा : बिहारच्या पंकज त्रिपाठी यांना काय आवडते खायला, जाणून घ्या त्यांच्या Lifestyle बद्दल
शापूरजी पालनजी समूहावर सध्या जबरदस्त कर्ज आहे. सध्या या समूहावर जवळपास 20,000 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अशा परिस्थितीत समूह आपल्यावरील कर्जाला कमी करू इच्छितो आणि बांधकाम व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करू इच्छितो. समूहावरील एकूण 20,000 कोटी रुपयांपैकी 12,000 कोटी रुपयांचे कर्ज आरबीआयच्या कोविड रिलीफ स्कीमअंतर्गत येते. याअंतर्गत कंपनीला या कर्जाची परतफेड 2023पर्यत करायची आहे. अर्थात पुढील काही महिन्यातच यातील निम्म्या कर्जाची परतफेड करण्याचा समूहाचा प्रयत्न आहे. त्यामुळे युरेका फोर्ब्सची विक्री करण्यात येते आहे. युरेका फोर्ब्स वॉटर प्युरीफायर, युरोक्लीन व्हॅक्युम क्लिनरसारख्या बॅंडना बाजारात चालवते. सध्या कंपनीचे 35 देशांमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची एकूण उलाढाल 2,857 कोटी रुपये इतकी होती.
अधिक वाचा : Chinchpokali Chintamani: चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची भाविकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL
घरा घरात वापरल्या जाणारे वॉटर प्युरिफायर बनवणारी युरेका फोर्ब्स (Eureka Forbes)ही कंपनी आता विकण्यात आली होती. टाटा समूहाचे माजी चेअरमन आणि टाटा समूहाशी वाद झालेले सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांची ही कंपनी आहे. अमेरिकेची अॅडव्हेंट इंटरनॅशनल ही कंपनी युरेका फोर्ब्सला विकत घेते आहे. सायरस मिस्त्री मालक असलेल्या शापूरजी पालनजी समूहाच्या 17 कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. शापूरची पालनी समूहाकडे टाटा समूहातील एका हिश्याची मालकी आहे.
युरेका फोर्ब्स (Eureka Forbes) ही आघाडीची कंपनी अमेरिकेची गुंतवणूक कंपनी म्हणजे इक्विटी फंड कंपनी असलेल्या अॅडवेंट इंटरनॅशनलने 4,400 कोटींना विकत घेतली आहे. अॅडवेंट इंटरनॅशनलबरोबरच्या व्यवहाराला शापूरजी पालनजी समूहाने (Shapoorji Pallonji Group) मंजूरी दिली होती. या विक्री प्रक्रियेमुळे १५६ वर्ष जुन्या शापूरजी पालनजी समूहाला आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भांडवल उभारता येणार आहे. यापुढे शापूरजी पालनजी समूह बांधकाम आणि इंजिनियरिंग क्षेत्रातील व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित करणार आहे.
कर्जाची परतफेड करण्यासाठी शापूरजी पालनजी समूह युरेका फोर्ब्सव्यतिरिक्त स्टर्लिंग अॅंड विल्सन सोलर, एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर काही रियल इस्टेट मालमत्ता विकण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. युरेका फोर्ब्स विकत घेण्यासाठी इतरही काही आंतरराष्ट्रीय कंपन्यां स्पर्धेत आहेत. सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून काढल्यानंतर त्यांनी टाटा समूहाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. रतन टाटा विरुद्ध सायरस मिस्त्री असा वाद औद्योगिक विश्वातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक वाद समजला जातो.