Sir Dorabji Tata & Jubille Diamond : नवी दिल्ली: जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांचे पुत्र दोराबजी टाटा (Sir Dorabji Tata) हे टाटा समूहाचे अध्यक्ष होते. एक काळ असा होता की टाटा समूहाने (Tata Group) खूप कठीण परिस्थितीला तोंड दिले होते. एक वेळ अशी आली जेव्हा टाटा स्टील (Tata Steel) बुडण्याच्या मार्गावर होती. या सर्व आर्थिक संकटातून कंपनीला वाचवण्यासाठी दोराबजी टाटा आणि त्यांची पत्नी मेहेरबाई टाटा यांनी त्यांची सर्व मालमत्ता आणि अगदी बहुमोल ज्युबिली डायमंड गहाण ठेवला होता. असे करून दोघांनी कंपनी तर वाचवलीच पण नंतर हीच कंपनी नफ्यातही आली. कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी हिरा गहाण ठेवण्याची ही इतिहासात पहिलीच वेळ असेल. यानंतर त्यांनी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कॅन्सर हॉस्पिटलही बांधले. आज 27 ऑगस्ट सर दोराबजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी पाहूया. त्यांनी टाटा समूहाला अल्पावधीत कशा उंचीवर नेले ते जाणून घेऊया. (Story of Sir Dorabji Tata & precious Jubilee Diamond & Tata Steel)
अधिक वाचा : भावा जिंकलंस! Rohit sharma ने लोखंडी जाळीच्या पलिकडे उभ्या असलेल्या पाकिस्तानी फॅनला दिली 'जादू की झप्पी'
सर डेराबजी टाटा यांना मॅन ऑफ स्टील असेही म्हटले जाते. त्यांचे वडील जमशेटजी टाटा यांच्या स्वप्नांची पूर्तता करून त्यांनी भारतात औद्योगिक क्रांतीचा पाया घातला. यानंतर त्यांनी पहिला पोलाद कारखाना स्थापन केला. त्यांनी टिस्को कंपनीची स्थापना तर केलीच पण इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हितही जपले. कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी 8 तास काम, मोफत वैद्यकीय सुविधा, पगारी रजा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा असे कामगारांच्या कल्याणाचे उपक्रम सुरू केले. तो नंतर भारत सरकारने संपूर्ण देशात कायद्याच्या स्वरूपात लागू केला.
सर दोराबजी टाटा 1904 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. 1932 पर्यंत ते या पदावर राहिले. हा काळ पहिल्या महायुद्धानंतरचा काळ आहे. जमशेदपूर येथे टाटा स्टीलचा कारखाना होता. हा कारखाना त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जात होता. कंपनीने आधीच विस्ताराच्या दिशेने पावले टाकली होती. पण या विस्तारामुळे फायद्यापेक्षा अडचणीच अधिक आल्या. कंपनीला महागाईपासून ते कामगार समस्यांपर्यंतच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. त्याच वेळी, जपानमधील भूकंपानंतर मागणी कमी होत होती. 1923 पर्यंत रोख रकमेच्या कमतरतेचे संकट उभे राहिले. 1924 मध्ये जमशेदपूरमध्ये एक वाईट बातमी घेऊन एक तार आली. टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत अशी बातमी आली होती. यानंतर ही कंपनी चालवता येणार की बंद पडणार, भारतातील पहिल्या पोलाद प्रकल्पाच्या उभारणीच्या स्वप्नांचा आणि विचारांचा चक्काचूर होणार का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले.
1930 च्या उत्तरार्धात टाटा स्टीलची पुन्हा भरभराट होण्यास सुरूवात झाली होती. दोराबजी आणि त्यांची पत्नी मेहेरबाई यांनी त्यांची मालमत्ता गहाण ठेवून केलेल्या त्यागामुळे टाटा स्टील बुडण्यापासून वाचली. 1931 साली मेहेरबाई आणि 1932 साली दोराबजी टाटा यांनी या जगाचा निरोप घेतला. दोराबजींनी त्यांची सर्व मालमत्ता सर दोराबजी टाटा चॅरिटेबल ट्रस्टकडे हस्तांतरित केली. या मालमत्तेमध्येच त्या अमूल्य जुबली डायमंडचादेखील समावेश होता.
जुबली डायमंड हा जगातील सहावा सर्वात मोठा हिरा आहे. 1895 साली दक्षिण आफ्रिकेतील जॅगर्सफॉन्टेन खाणीत तो हिरा सापडला होता. 1896 मध्ये या हिऱ्याला पॉलिशिंगसाठी अॅमस्टरडॅमला पाठवण्यात आले आणि 1897 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या डायमंड ज्युबिलीवरून याला जुबिली डायमंड हे नाव मिळाले. या हिऱ्याची मालकी असलेल्या लंडनच्या तीन व्यापार्यांच्या गटाने विचार केला की या हिऱ्यासाठी सर्वोत्तम जागा ब्रिटिश राणीच्या शाही मुकुटात आहे. पण या हिऱ्याचे नशीब त्याला दुसऱ्याच ठिकाणी नेणार होते.
1900 मध्ये दोराबजींनी पत्नीला ज्युबिली डायमंड भेट म्हणून दिला. ज्युबिली डायमंड पॅरिस प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आला. हे एक जागतिक प्रदर्शन होते ज्याचे मुख्य आकर्षण होते जुबली डायमंड. त्यावेळी जमशेदजी टाटा यांचे पुत्र दोराबजी टाटा ब्रिटनमध्ये होते. दोराबजी आणि मेहेरबाई यांचा विवाह 1898 मध्ये व्हॅलेंटाईन डेला झाला होता. दोराबजींचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते म्हणून त्यांनी मेहेरबाईंना ज्युबिली डायमंड भेट देण्याचा निर्णय घेतला. दोराबजी यांनी तो ज्युबिली डायमंड लंडनमधील व्यापाऱ्यांकडून तब्बल 1 लाख पौडांना विकत घेतला.
अधिक वाचा : First Iphone Auction : पहिल्यावहिल्या आयफोनचा लिलाव, इतक्या लाखांची लागली बोली
मेहेरबाई टाटांनी हा हिरा प्लॅटिनमच्या अंगठीत घालून गळ्यात घालायला सुरुवात केली. हा हिरा फक्त रॉयल कोर्ट्स आणि सार्वजनिक समारंभात, म्हणजे केवळ विशेष प्रसंगी परिधान केला जात असे. मेहेरबाई टाटा यांच्याकडे ज्युबिली डायमंड होता. हा हिरा 245.35 कॅरेटचा होता. या हिऱ्याची गणना जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांमध्ये केली जाते. त्याचा आकार कोहिनूर हिऱ्याच्या दुप्पट आहे.
तुमच्या माहितीसाठी 1937 मध्ये, ज्युबिली डायमंड कार्टियर मार्फत विकला गेला आणि त्या बदल्यात मिळालेले पैसे सर दोराबजी टाटा चॅरिटेबल ट्रस्टकडे गेले. ट्रस्टने मिळालेला निधी टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह अनेक संस्था स्थापन करण्यासाठी वापरला. या संस्थांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांचाही समावेश आहे. ज्युबिली डायमंड फ्रेंच उद्योगपती एम. पॉल यांना प्रदान करण्यात आला. लुई वेलरने तो विकत घेतला. त्यानंतर हाऊस मौवाडीच्या रॉबर्ट बर्केनस्टॉकने हा अनमोल हिरा विकत घेतला.