वयाच्या तिशीतच यश: शून्यातून कोट्यवधींचा व्यवसाय उभारणारे ५ भारतीय व्यावसायिक

जे व्यावसायिक या प्रकारे अडचणींवर मात करत व्यवसाय उभे करणारे लोक इतरांसाठी आदर्श ठरत असतात. त्यांच्या यशोगाथेतून इतरांसमोर एक उदाहरण निर्माण होत असते.

Success story
यशस्वी व्यावसायिक 
थोडं पण कामाचं
  • अडचणींवर मात करत व्यवसाय उभे करणारे लोक इतरांसाठी आदर्श ठरतात
  • ५ भारतीय तरुण व्यावसायिक ज्यांनी शून्यातून उभा केला व्यवसाय
  • वयाच्या तिशीत करोडोंची कमाई करणारे तरुण

नवी दिल्ली: शून्यातून व्यवसाय उभा करणे (entrepreneurs)हे सोपे काम नसते. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, त्रास सहन करावा लागतो, विविध असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र जे व्यावसायिक या प्रकारे अडचणींवर मात करत व्यवसाय उभे करणारे लोक इतरांसाठी आदर्श ठरत असतात. त्यांच्या यशोगाथेतून इतरांसमोर एक उदाहरण निर्माण होत असते. असेच ५ तरुण व्यावसायिक ज्यांनी वयाच्या तिशीतच शून्यातून करोडोंचे व्यवसाय (Business)उभे केले त्यांची यशोगाथा जाणून घेऊया. (Success story of 5 Indian entrepreneurs who built businesses & earning crores)

१. बाला सारडा, वाहदम टीज

बाला सारडा याचे कुटुंब चहा निर्यातदार आहे. चहा व्यवसायातील विविध गोष्टी पाहतच बाला मोठा झाला. २०१५ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी बालाने वाहदम टीज ची स्थापना दिल्लीमध्ये केली. हा ब्रॅंड जगभर भारतातील सर्वोत्तम चहाची निर्यात करतो. भारतीय चहाला जगभर मागणी असली तरी भारतीय चहाचे चांगले ब्रॅंडिंग झालेले नाही असेच बालाचे मत होते. बालाने अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाचे सर्टिफिकेट घेऊन आणि नॉन जीएमओ व्हेरिफिकेशन घेऊन अमेरिकेत चहाची निर्यात करण्यास सुरूवात केली. 

वाहदम टीजने त्यानंतर मोठी घोडदौड केली. अमेरिकेत दखल घेतली गेलेला आणि प्रिमियम, लीगल रिटेल चेन असलेला असलेल्या काही तुरळक भारतीय ब्रॅंडमध्ये वाहदमचा समावेश आहे. कंपनीची उलाढाल १४५ कोटी रुपयांच्या वर पोचली आहे. वाहदमचे अमेरिकेत १५ लाख ग्राहक आहेत.

२. रिषभ चोखानी, नॅचरेवाईब बोटॅनिकल्स

रिषभ चोखानी यांनी वयाच्या २९व्या वर्षी आरोग्य आणि आरोग्यदायी आहारावर लक्ष केंद्रीत केले. त्याचे परिणाम लवकरच दिसून आले. त्याला शारीरिक आणि मानसिक पातळीवर याचा फायदा झाला. रिषभचे कुटुंब फार्मास्युटीकल्सच्या व्यवसायात होते. त्यामुळे त्याला आरोग्य, हेल्थ, वेलनेस आणि तत्सम व्यवसायाचा अभ्यास करणे सोपे गेले. रिषभला ऑर्गेनिक फूड क्षेत्रातील क्षमता लक्षात आली आणि त्याने २०१७ मध्ये मुंबईत नॅचरेवाईब बोटॅनिकल्सची सुरूवात केली. रिषभने अमेरिकेत बाजारपेठेत आपला माल विकण्यास सुरूवात केली. नंतर त्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार युरोपातदेखील केला. रिषभ विविध ६५० प्रकारच्या उत्पादनांचे उत्पादन घेतो. त्याच्या व्यवसायाची उलाढाल १४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

३. पल्लव बिहानी, बोल्डफिट

फिट राहणे प्रत्येकासाठीच महत्त्वाचे आहे. २५ वर्षाच्या पल्लवला हे शालेय वयात स्लिप्ड डिस्कची समस्या निर्माण झाल्यावर लक्षात आले. त्याचे वजन १०५ किलो होते. त्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर लक्ष देण्यास सुरूवात केली. जिममध्ये जाण्यास सुरूवात केली.  भारतात फिटनेस हा स्वस्त पर्याय नाही असे त्याच्या लक्षात आले. बहुतांश लोक फिटनेससाठी लागणरी सप्लीमेंट्स, उपकरणे घेऊ शकत नाहीत. २०१९ मध्ये पल्लवने बोल्डफिटची सुरूवात केली. त्याने फिटनेसशी निगडीत ई-कॉमर्स ब्रॅंड सुरू केला. त्यासाठी त्याने वडिलांकडून ८ लाख रुपये उसनवार घेतले.
आज बोल्डफिटचा विस्तार झाला आहे. त्याची उलाढाल ३० कोटी रुपयांच्यावर पोचली आहे.

४. केशव राय, बाईक ब्लेझर

२७ वर्षीय केशव राय हा एक सर्वसाधारणच विद्यार्थी होता. मात्र त्याला व्यवसायात रस होता. २०१५ मध्ये त्याने वडिलांच्या मदतीने अॅपवर आधारित व्यवसाय सुरू केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. आपली बाईक स्वच्छ करताना, त्यावर धूळ झटकताना त्याला एक कल्पना सुचली आणि २०१६ मध्ये त्याने बाईक ब्लेझरची स्थापना केली. बाईक ब्लेझर दुचाकी वाहनांना वॉटर रेझिस्टंट पार्किंग कव्हर पुरवते. बाईक ब्लेझरची वार्षिक उलाढाल आता १.३ कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

५. जय के मुलचंदानी, कोअरबी समूह

जय के मूलचंदानी फक्त १४ वर्षांचा होता तेव्हापासून तो आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. तो मूळचा राजस्थानातील आहे. नोकरीत त्याचे मन रमले नाही. त्यानंतर जयने ट्रक विकून कमिशन कमवण्यास सुरूवात केली.  त्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत सेल्स मॅनेजरची नोकरी मिळाली. ते काम करताना त्याच्या लक्षात आले की सेकंड हॅंड आणि जुन्या ट्रकला मागणी आहे. यातूनच त्याला स्वत:च्या व्यवसायाची कल्पना सुचली.  कोअरबी ग्रुपची स्थापना त्यानंतर झाली. या व्यवसायात त्याचे चांगलेच बस्तान बसले. आता त्याची उलाढाल १०० कोटींच्या आसपास आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी