Sukanya Samriddhi Yojana: आता आनंदाने म्हणा मुलगी झाली हो! 21 वर्षी तुमची कन्या होणार 70 लाख रुपयांची मालकीण; जाणून घ्या काय आहे योजना

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 08, 2023 | 18:47 IST

देशातील महिला आणि मुली आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकार (Government Schemes for Women)अनेक योजना राबवत असते. या योजनांपैकी एक योजना आहे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) दरम्यान सरकारने यंदा काही स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या(Small Saving Scheme)व्याजदरात वाढ केली आहे.  या छोट्या बचत योजनांममध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश होतो.

Sukanya Samriddhi Yojana:
21 वर्षी तुमची कन्या होणार 70 लाख रुपयांची मालकीण  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सुकन्या समुद्धी योजनेत खाते उघडायचे असेल तर मुलीचा जन्म दाखला, आधारकार्ड असावे.
  • छोट्या बचत योजनांममध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश होतो.
  • सरकारने यंदा काही स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरात वाढ केली आहे. या छोट्या बचत योजनांममध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश होतो.

Sukanya Samriddhi Yojana: देशातील महिला आणि मुली आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकार (Government Schemes for Women)अनेक योजना राबवत असते. या योजनांपैकी एक योजना आहे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) दरम्यान सरकारने यंदा काही स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या(Small Saving Scheme)व्याजदरात वाढ केली आहे.  या छोट्या बचत योजनांममध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश होतो. या योजनेच्या व्याजदरात देखील वाढ करण्यात आली असून या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7.60 टक्क्यांऐवजी  8 टक्के व्याज मिळेल. हे दर आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी लागू करण्यात आले आहेत.(Sukanya Samriddhi Yojana: Now happily say you have a baby girl! At the age of 21, your daughter will become the owner of 70 lakh rupees)

अधिक वाचा  : Virat Kohli : IPL मध्ये 'किंग' कोहलीचा 'विराट' विक्रम

मुलीचा जन्म झाल्यापासून ते तिच्या लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता तिच्या पालकाना असते. ही बाब लक्षात घेत सरकारने पालकांची ही चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे.या योजनेत गुंतवणूक करून मुलगी वयाच्या 21 व्या वर्षी लाखो रुपयांची मालकिन बनू शकते. या योजनेसाठी तुम्ही 69 लाख रुपये गोळा करू शकता. या योजनेतील गुंतवणुकीची पात्रताविषयी जाणून घेणार आहोत...  

सुकन्या समृद्धी योजनेतून काढता येतो पैसा 

 सुकन्या समृद्धी योजनेतून 10 वर्ष कमी वयाच्या मुलीच्या नावावर पैशांची गुंतवणूक केल्यास ती 15 वर्षाची झाल्यास त्या खात्यातील पैसा काढता येतो. परंतु फक्त 50 टक्के रक्कम काढता येईल. त्यानंतर वयाच्या 18 वर्षानंतर  या खात्यातील एकूण पैसा 21 वयानंतर काढता येतो. 
 अधिक वाचा  : संकष्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे राशीभविष्य

म्यॅचुरिटीनंतर मिळतील 69 लाख रुपये  

 जर तुम्ही 2023 मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी मध्ये खाते उघडत असाल तर तुम्हाला 8 टक्के दराने पैसा मिळेल. दरम्यान सुकन्या समृद्धी योजनेच्या हिशोबाननुसार 21 वर्षापर्यंत आपल्या खात्यात 69 लाख रुपये जमा होतील. या योजनेत एका वर्षात 1.5 लाख रुपये जमा होतील.  या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या कर सवलतीचा लाभ देखील मिळेल. जर तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला या खात्यात दरमहा 12,500 रुपये जमा करावे लागतील.

खाते कसे उघडणार 

सुकन्या समुद्धी योजनेत खाते उघडायचे असेल तर , मुलीचा जन्म दाखला, मुलीचे आधारकार्ड असावे. तर आई-वडिलांचा रहिवाशी  पत्ता, त्यानंतर एक अर्ज भरुन द्यावा.  यानंतर मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडलं जाऊ शकते.  दरम्यान पालक फक्त दोन मुलींचे खाते उघडू शकतात. पण दुसऱ्या मुलीच्या जन्मावेळी जुळ्या मुली जन्मायला आल्या तर त्या तिघांना या योजनेचा फायदा घेता येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी