एका छोट्याशा खोलीत राहणारे 'सुंदर पिचाई' कसे झाले 'गुगल'चे सीईओ, प्रेरणादायी कथा...

Happy Birthday Sundar Pichai:आज (१० जून) हा सुंदर पिचाई यांचा जन्मदिवस. जगभरातून सुंदर पिचाई यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तामिळनाडूच्या एका छोट्याशा शहरातील हा मुलगा गुगलचा मुख्य कार्यकारी अधिकारी झाला

Journey of Sundar Pichai
सुंदर पिचाई यांचे करियर 

थोडं पण कामाचं

  • अल्फाबेटचे सीईओपदापर्यतचा सुंदर पिचाईंचा प्रवास
  • आयआयटी खरगपूर ते अमेरिका
  • पिचाई यांचे क्रिकेटवेड

नवी दिल्ली : कोणतीही माहिती हवी असल्यास आपण पटकन गुगल सर्च करतो. गुगल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग झाले आहे. अशा या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO of Google) म्हणजेच सीईओ आहेत सुंदर पिचाई (Sundar Pichai). आज (१० जून) हा सुंदर पिचाई यांचा जन्मदिवस (Birthday of Sundar Pichai,). जगभरातून सुंदर पिचाई यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तामिळनाडूच्या एका छोट्याशा शहरातील हा मुलगा जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या गुगलचा मुख्य कार्यकारी अधिकारी झाला आहे. देशातील लाखो तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असलेल्या सुंदर पिचाई यांचा हा अद्भूत जीवनपट पाहूया. (How Sundar Pichai become CEO of Alphabet Inc. and its subsidiary Google)

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई

पिचाई सुंदरराजन (Pichai Sundararajan) यांचायांचा जन्म १० जून १९७२ला तामिळनाडूतील मदुराई येथे झाला होता. जगभरात त्यांना सुंदर पिचाई याच नावाने ओळखले जाते. अर्थात ट्विटरवर काही लोक सुंदर पिचाई यांचा जन्मदिवस १२ जुलै असल्याचे मांडत आहेत. एल्फाबेट ही गुगलची पेरेंट कंपनी आहे. म्हणजेच गुगलबरोबरच इतर काही कंपन्या अल्फाबेटच्या छत्राखाली येतात. सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ (CEO of Alphabet Inc. and its subsidiary Google)आहेत. त्याचबरोबर ते अल्फाबेटची उपकंपनी असेल्लया गुगलचेही सीईओ आहेत. मात्र सर्वसाधारणपणे त्यांना गुगलचे सीईओ असे संबोधले जाते. 

आयआयटी खरगपूर ते अमेरिका

सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूर येथेून मेटलर्जिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर ते अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी जगविख्यात स्टॅनफर्ड विद्यापीठातून मटेरियल्स सायन्स आणि इंजिनियरिंगमधून एमएस केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाने त्यांना सिबेल स्कॉलने नामांकित केले. त्यानंतर पेनसिल्व्हॅनिया विद्यापीठातील व्हार्टन स्कूलमधून एमबीएदेखील केले. तिथे सुंदर पिचाई यांना पाल्मर स्कॉलरसाठी नामांकित करण्यात आले.

पिचाई यांचे करियर

सुंदर पिचाई यांनी करियरची सुरूवात मटेरियल्स इंजिनियर म्हणूनच केली होती. सुरूवातीला काही दिवस त्यांनी मॅकिन्सी अॅंड कंपनीमध्ये काम केले. २००४ मध्ये ते गुगलमध्ये रुजु झाले. गुगलमध्ये रुजू झाल्यानंतर पिचाई यांनी गुगल क्रोम आणि गुगल ड्राईव्हवर काम केले. त्याची मोठी जबाबदारी पिचाई यांच्यावर होती. याशिवाय जीमेल आणि गुगल मॅप्ससारख्या अॅप्लिकेशनच्या विकासातही पिचाई यांची मोठी भूमिका होती. २०१२ मध्ये क्रोमबुक बाजारात आले. २०१३ मध्ये पिचाई यांच्या देखरेखीखाली गुगलने अॅंड्राईडला बाजारात आणले. अशा रितीने मागील काही वर्षातील गुगलच्या सर्वच महत्त्वपूर्ण सेवा आणि उत्पादनांच्या विकासात आणि बाजारात आणण्यात सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भूमिका होती. 
१० ऑगस्ट २०१५ मध्ये पिचाई गुगलेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवडले गेले. त्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे २४ ऑक्टोबर २०१५ला पिचाई यांच्यावर अल्फाबेट इन्कॉर्पोरेशनची जबाबदारी देण्यता आली. २०१७ मध्ये तर पिचाई यांची नियुक्ती अल्फाबेटच्या संचालक मंडळातदेखील करण्यता आली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दिवशी पिचाई यांनी गुगलमध्ये इंटरव्यूह दिला त्याच दिवशी जीमेल लॉंच झाले होते.

छोट्याशा खोलीत अभ्यास करायचे पिचाई

जानेवारी २०१७ मध्ये सुंदर पिचाई भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांशी संवाददेखील साधला होता. त्यावेळेस ते कॉलेजच्या आठवणीत रमले होते. आपल्या कॉलेज लाईफच्या असंख्य गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. तब्बल २३ वर्षानंतर ते आयआयटी खरगपूरच्या परिसरात आले होते. कॉलेजच्या आठवणी सांगत सुंदर पिचाई हॉस्टेलमधील आपल्या रुम नं. ३०८मध्ये देखील गेले होते. त्या रुममध्ये गेल्यावर पिचाई यांनी सांगितले होते की तिथे घालवलेला वेळ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होता. पिचाई यांनी कॉम्प्युटर पहिल्यांदा आयआयटी खरगपूर येथेच पाहिला होता. ते त्यांच्या बॅचचे टॉपर तर होतेच परंतु सर्वाधिक चांगल्या अॅकेडेमिक कामगिरीसाठी त्यांना सिल्व्हर मेडलदेखील मिळाले होते. 

पिचाई यांचे क्रिकेटवेड

सुंदर पिचाई यांनी क्रिकेटचे वेड आहे. चेन्नईत जेव्हा ते शिकत होते तेव्हा ते स्वत: आपल्या शाळेच्या संघाचे कप्तान होते. त्यांनी अनेक विभागीय स्पर्धा जिंकल्या होत्या. लहानपणी त्यांची इच्छा क्रिकेटर बनायची होती. त्यांना सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा खेळ पाहायला खूप आवडायचे. पिचाई यांना  सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे खेळावे असे वाटायचे. अर्थात पिचाई यांनी टेस्ट क्रिकेटच आवडते त्यांना टी-२० फॉर्मेट आवडत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी