IEC 2022 | 5G स्पेक्ट्रम दर कमी असावेत, भारती एअरटेलच्या सुनील मित्तलांचे मत

5G Spectrum : भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल (founder and chairman of Bharti Airtel, Sunil Mittal)यांनी देशातील दूरसंचार आणि 5G सेवेसंदर्भात महत्त्वाची मतं व्यक्त केली. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' (India Economic Conclave 2022) या टाइम्स नेटवर्कच्या प्रमुख कार्यक्रमात बोलताना सुनील मित्तल यांनी दूरसंचार क्षेत्राबद्दल (Telecom sector) महत्त्वाचे भाष्य केले. एअरटेल ही भारतातील सर्वात जुन्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक आहे.

Sunil Mittal on 5G services & spectrum
5 G स्पेक्ट्रमवर सुनील मित्तलांचे स्पष्ट मत 
थोडं पण कामाचं
  • देशातील दूरसंचार आणि 5G सेवेसंदर्भात सुनील मित्तलांनी महत्त्वाची मतं व्यक्त केली
  • 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' या टाइम्स नेटवर्कच्या प्रमुख कार्यक्रमात मित्तल यांचे स्पष्ट मत
  • दूरसंचार कंपन्यांवर 5G स्पेक्ट्रमच्या जास्त दराचा भार पडता कामा नये

Sunil Mittal at India Economic Conclave 2022 : मुंबई: भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल (founder and chairman of Bharti Airtel, Sunil Mittal)यांनी देशातील दूरसंचार आणि 5G सेवेसंदर्भात महत्त्वाची मतं व्यक्त केली. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' (India Economic Conclave 2022) या टाइम्स नेटवर्कच्या प्रमुख कार्यक्रमात बोलताना सुनील मित्तल यांनी दूरसंचार क्षेत्राबद्दल (Telecom sector) महत्त्वाचे भाष्य केले.  एअरटेल ही भारतातील सर्वात जुन्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक आहे. सुनील मित्तल म्हणाले की दूरसंचार कंपन्यांवर स्पेक्ट्रम खर्चाचा बोजा पडू नये. त्याऐवजी 5G सेवा कार्यान्वित करण्यासाठी निधी वापरला जावा. दूरसंचार कंपन्यांवर 5G स्पेक्ट्रमच्या (5G Spectrum) जास्त दराचा भार पडता कामा नये. देशातील दूरसंचार उद्योग आधीच आर्थिक संकटातून जातो आहे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी 5G स्पेक्ट्रमचे दर कमीत कमी ठेवावेत. (Sunil Mittal requests for low reserve prices of 5G spectrum, while speaking at India Economic Conclave 2022)

अधिक वाचा : IEC 2022 : आव्हाने स्वीकारून आणि पूर्ण करून भारत प्रगतीपथावर : विनीत जैन, एमडी, टाइम्स ग्रुप

ट्रायची स्पेक्ट्रम किंमतीत कपातीची शिफारस

देशात परवडणाऱ्या 5G सेवांना चालना देण्यासाठी, दूरसंचार नियामक संस्था असलेल्या ट्रायने ( TRAI) 5G सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रम किंमतींमध्ये तीव्र कपात करण्याची शिफारस केली आहे. TRAI ने 2021 च्या किंमतींच्या तुलनेत 5G सेवांसाठी वापरल्या जाणार्‍या स्पेक्ट्रमच्या किमतींमध्ये 40% कमी करण्याची शिफारस केली आहे. 5G सेवा प्रदान करण्यासाठी, सर्वाधिक शिफारस केलेले स्पेक्ट्रम बँड 700 MHz आणि 3,300-3,600 MHz हे आहेत. राखीव किंमतीतील कपात 20 वर्षांच्या कालावधीसाठी दिलेल्या स्पेक्ट्रमसाठी जाहीर केली जाते.

मात्र स्पेक्ट्रमचा कार्यकाळ 30 वर्षांपर्यंत (20 वर्षे पूर्वीपासून) वाढवण्यात आला असल्याने, निव्वळ किंमती 20 वर्षांच्या किमतींच्या 1.5 पट असण्याची शिफारस करण्यात आली आहे. अशाप्रकारे, 5G स्पेक्ट्रम खरेदी करणार्‍या दूरसंचार कंपनीसाठीच्या खेळत्या भांडवलातील निव्वळ कपात आमच्या कॅल्क्युलेशननुसार केवळ 3% ते 10% च्या श्रेणीत असेल.

अधिक वाचा : Gold Prices Today | सलग चौथ्या दिवशी सोन्याची झळाली घटली, अमेरिकेतील जॉब डेटाचा सोन्यावर दबाव, आता गुंतवणूक करावी का?

5G मुळे मोठ्या संधी

सध्या, 5G चा वापर अत्यंत मर्यादित आहे. परंतु 5G सेवा मोठ्या प्रमाणात क्षमता आणि कमी विलंब म्हणजे वेगवान सेवा प्रदान करते म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असा विश्वास सुनील मित्तल यांनी व्यक्त केला. 5G सेवांमुळे मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. 5G द्वारे प्रदान केलेली ही प्रचंड क्षमता आणि प्रचंड गतीचा ग्राहक कसे वापरतात, हे त्यांच्या कल्पनेवर अवलंबून असेल, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा : Real Estate update | जाणून घ्या, कोणती शहरे घर खरेदीसाठी आहेत सर्वात स्वस्त आणि महाग

उपग्रहाद्वारे ब्रॉडबॅंड सेवा विस्तारणार

सॅटकॉमसंदर्भात बोलताना सुनील मित्तल पुढे म्हणाले की यामुळे मोठ्या संख्येने लोकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी अंतर्गत आणता येणार आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार, जवळपास 38 कोटी ग्राहक ब्रॉडबँड सेवांचा वापर करत नाहीत. अशा ग्राहकांपर्यत पोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उपग्रहद्वारे इंटरनेट जोडले जाणे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी