NEET कौन्सिलिंग प्रक्रियेचा मार्ग मोकळा, नोंदणी प्रक्रिया आणि नवीन नियम जाणून घ्या

NEET : अखिल भारतीय कोट्यातील जागांवर विद्यमान २७% OBC (इतर मागास वर्ग) आणि १० % EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग) आरक्षण नियमांच्या आधारे समुपदेशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही ट्विट केले आहे की NEET PG समुपदेशन प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

NEET Counselling to start from 12 January
NEET कौन्सलिंग प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरू होणार 
थोडं पण कामाचं
  • सर्वोच्च न्यायालयाने केला NEET कौन्सिलिंगचा मार्ग मोकळा
  • अखिल भारतीय कोट्यातील जागांवर विद्यमान २७% OBC (इतर मागास वर्ग) आणि १० % EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग) आरक्षण नियमांच्या आधारे समुपदेशन प्रक्रिया पूर्ण केली जाणार
  • आता पीजी आणि यूजीमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होणार

NEET PG and UG Counselling : नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने NEET कौन्सिलिंगचा म्हणजे समुपदेशनाचा मार्ग मोकळा केला आहे. या अंतर्गत, अखिल भारतीय कोट्यातील जागांवर विद्यमान २७% OBC (इतर मागास वर्ग) आणि १० % EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग) आरक्षण नियमांच्या आधारे समुपदेशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही ट्विट केले आहे की NEET PG समुपदेशन प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. याशिवाय, वैद्यकीय समुपदेशन समितीने लवकरच पीजी आणि यूजी समुपदेशन सुरू करण्याची अधिसूचनाही जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत आता विद्यार्थ्यांनी पीजी आणि यूजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी समुपदेशनाची तयारी सुरू करावी. (Supreme Court clears the way for NEET PG and UG Counselling, check the process & rules)

काय आहे नियम -

यापूर्वी, १८ डिसेंबर २०२१ रोजी, एमसीसीने समुपदेशनाच्या नवीन नियमांची माहिती जाहीर केली होती. त्यानुसार समुपदेशन प्रक्रिया चार टप्प्यात होणार आहे.

  1. - NEET मध्ये राउंड-१, राउंड-२,  MOP UP राउंड आणि स्ट्रे व्हॅकेंसी राउंड असेल.
  2. - AIQ राउंड-१, राउंड-२ आणि MOP UP राउंडमध्ये नवीन नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असेल आणि स्ट्रे व्हॅकेंसी राउंडसाठी नवीन नोंदणी होणार नाही.
  3. - दोन राउंडनंतरच्या रिकाम्या जागा राज्यांना परत केल्या जाणार नाहीत, परंतु त्या जागा मॉप-अप राऊंड आणि स्ट्रा व्हॅकेंसी राऊंडच्या समुपदेशनाद्वारे भरल्या जातील.
  4. - राउंड २ किंवा त्यानंतरच्या समुपदेशनात वाटप केलेल्या जागांवर सामील झालेल्या उमेदवारांना त्या जागा सोडण्याचा पर्याय दिला जाणार नाही. तसेच त्यांना पुढील समुपदेशन फेरीत सहभागी होता येणार नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी वाटप केलेली जागा न स्वीकारल्यास त्यांना पुढील फेरीत बसण्याची संधी मिळेल.
  5. - सीट अपग्रेड आणि मोफत बाहेर पडण्याची संधी फक्त पहिल्या फेरीत दिली जाईल. हा पर्याय राउंड-२ पासून उपलब्ध होणार नाही.
  6. समुपदेशन प्रक्रिया UG समुपदेशन अंतर्गत १५% AIQ जागांसाठी आणि PG जागांसाठी ५०% लागू होईल.

समुपदेशनासाठी हे काम करावे लागणार 

समुपदेशनाची लिंक सक्रिय झाल्यानंतर, उमेदवार mcc.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतील. जिथे त्यांना NEET रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि पालकांचे नाव, जन्मतारीख इत्यादी तपशील सबमिट करावे लागतील. त्यानंतर नोंदणीसाठी शुल्क भरावे लागेल. त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू केली जाईल.

कोरोना संकटकाळात सर्व प्रकारचे शिक्षण आणि प्रवेश प्रक्रिया यावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठ्या अनिश्चिततेला तोंड द्यावे लागते आहे. त्यातच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अधिक अडचणी निर्माण झाल्या असून विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या तणावाला तोंड द्यावे लागते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी