स्विगीची आकर्षक ऑफर, भारतात खासगी कंपनीचा पहिला मोठा प्रयोग

Swiggy: फूड ऑर्डर आणि डीलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय असलेल्या स्विगी या खासगी कंपनीने भारतात मोठा प्रयोग सुरू केला आहे. मोठ्या कंपनीच्या पातळीवर भारतात पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे.

Swiggy Announce Moonlight Policy Allows Employees To Take Side Work
स्विगीची आकर्षक ऑफर, भारतात खासगी कंपनीचा पहिला मोठा प्रयोग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्विगीची आकर्षक ऑफर, भारतात खासगी कंपनीचा पहिला मोठा प्रयोग
  • पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना दोन नोकऱ्यांची ऑफर
  • फर्स्ट जॉबच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही अशा प्रकारे सेकंड जॉब करता येणार

Swiggy: फूड ऑर्डर आणि डीलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय असलेल्या स्विगी या खासगी कंपनीने भारतात मोठा प्रयोग सुरू केला आहे. मोठ्या कंपनीच्या पातळीवर भारतात पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे.

स्विगी कंपनीने तिच्या पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना त्यांचे कंपनीतले काम संपल्यानंतर आणि सुटीच्या दिवसांत पार्ट टाइम दुसरे काम करण्याची परवानगी दिली आहे. या कामामुळे स्विगीमधील कामावर परिणाम होणार नाही तसेच स्विगीच्या ध्येयधोरणांशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे काम कर्मचाऱ्यांचे असेल. स्विगीने दिलेल्या या परवानगीमुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्विगी आणि आणखी एका कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. 

स्विगीने पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना दोन नोकऱ्यांची ऑफर उघडपणे दिली आहे. या ऑफरला कंपनीने मूनलाइटिंग पॉलिसी असे नाव दिले आहे. या पॉलिसीनुसार कर्मचाऱ्यांना फर्स्ट जॉबच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही अशा प्रकारे सेकंड जॉब करता येणार आहे. 

दोन ठिकाणी काम करून जास्तीत जास्त उत्पन्न कमावण्याची संधी स्विगीच्या पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. भारतात स्विगीच्या निमित्ताने पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. याआधी कोणत्याही मोठ्या कंपनीने उघडपणे आपल्या पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना दोन ठिकाणी काम करण्याची परवानगी भारतात दिली नव्हती. एखाद दुसरा अपवाद असू शकेल पण सर्व पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना दोन नोकऱ्यांची संधी असा प्रयोग स्विगीच्या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच होत आहे.

स्विगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनाची दोन नोकऱ्यांची ऑफर ही मोठी संधी असल्याची चर्चा आहे. या ऑफरला चांगला प्रतिसाद मिळाल्यास लवकरच आणखी काही बड्या कंपन्याही भारतात दोन नोकऱ्यांची संधी देण्याची शक्यता आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि आपोआपच त्यांच्या राहणीमानात सुधारणा होण्यास मदत होईल.

कोरोना काळात लॉकडाकऊनमध्ये अनेकांनी वेगवेगळे छंद जोपासले होते. या छंदांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना उत्पन्न वाढविण्याची संधी मिळावी या हेतूनेच कंपनीने दोन नोकऱ्यांची ऑफर दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी