स्विगीची जबरदस्त सुविधा; कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा आठवडा, उचलणार कोविड उपचाराचा खर्च

काम-धंदा
भरत जाधव
Updated May 04, 2021 | 15:02 IST

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी (Swiggy Online Food Delivery) करणारी स्विगी (Swiggy)कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठी घोषणा केली आहे.

swiggy offers 4 days work in a week
स्विगीची जबरदस्त सुविधा; कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा आठवडा  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • स्विगी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा करणार कोविड उपचार
  • कर्मचार्‍यांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सल्लामसलत
  • कर्मचारीच ठरवणार त्यांच्या सुट्टीचा दिवशी

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी (Swiggy Online Food Delivery) करणारी स्विगी (Swiggy)कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठी घोषणा केली आहे. स्विगी कर्मचारी या महिन्याच्या पुढील आठवड्यापासून फक्त चार दिवस काम करणार आहेत. यासंदर्भात एक अंतर्गत मेल पाठवून याची माहिती देण्यात आली आहे. 

Swiggy चे कर्मचारी हप्त्यातून फक्त ४ दिवस करणार काम 

पीटीआय (PTI)ने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यापासून म्हणजेच मे मध्ये स्विगीचे कर्मचारी हप्त्यातून फक्त चार दिवस काम करतील. बाकी दिवस त्यांनी सुट्टी राहणार आहे. स्विगीचे मानव संसाधन प्रमुख गिरीश मेनन (Girish menon)यांनी स्विगीच्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल (Email) पाठवून याची माहिती दिली आहे. त्यांनी यात म्हटलं आहे की, स्विगीच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आम्ही त्याचं कौतुक करतो. देशात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही मे महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचाच आठवडा ठेवला आहे. 

कोणत्या दिवशी काम करायचं ते कर्मचाऱ्यांवर असेल

मेनन यांनी ईमेलमध्ये लिहिले आहे की, आठवड्यातून कोणत्या चार दिवशी काम करायचं आहे, हे कर्मचारी ठरवू शकतील. चार दिवसानंतर बाकीच्या दिवशी आराम करा, आपल्या कुटुंबाची आणि मित्रांची काळजी घ्या. स्विगीने म्हटलं आहे की, देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी करणं आमचं कर्तव्य आहे. आपल्या कर्मचार्‍यांची शारीरिक आणि मानसिक काळजी घेण्याच्या जबाबदारी अंतर्गत हा निर्णय त्यांनी घेतला आहे.

कोविड टास्क फोर्स तयार केली

मानव संसाधन प्रमुखांनी एका ई-मेलमध्ये लिहिले आहे की आपल्याला माहिती आहे की आम्ही कोविड टास्क फोर्स तयार केली आहे. त्यामध्ये अधिकाधिक लोकांना सामील करून आपण चांगले कार्य करू शकतो. आपल्या ब्रेकच्या दिवसांमध्ये आपण कोविड टास्क फोर्समध्ये सेवा देऊ इच्छित असल्यास आपले स्वागत आहे.

स्विगी उपचारांचा खर्च उचलेल

स्विगीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सल्लामसलत व वैद्यकीय सहाय्य सुविधासुद्धा सुरू केली आहे. ही सुविधा त्या कर्मचार्‍यांसाठी आहे जी घर अलगीकरणात ठेवण्यात आली आहेत. आणि कोरोनातून बरे होत आहेत. यामध्ये स्विगीच्या कर्मचार्‍यांना होम आयसोलेशन केअर कव्हरेज सारख्या सुविधा देण्यात येणार आहे. यावर येणारा खर्च कंपनी भरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कुटुंबातील सदस्यांचा रुग्णालयावरील खर्चही कंपनी उचलणार 

जर कंपनीच्या कोणत्याही कर्मचार्‍यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली असेल तर कंपनी तो खर्च उचलेल. जर स्विगीचे दोन कर्मचारी एकत्र राहतात आणि त्यातील एक कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तर कंपनी इतर कर्मचार्‍यांसाठी सेल्फ-क्वारंन्टाईनची सुविधा प्रदान करीत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी