मुंबई-पुण्यासह पाच शहरात Swiggy नाही देणार किराणा, बंद केली ही महत्त्वाची सर्विस, जाणून घ्या कारण

काम-धंदा
भरत जाधव
Updated May 11, 2022 | 14:45 IST

ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपनी स्विगीने (Swiggy) देशभरातील पाच प्रमुख शहरांमधील सुपर डेली सर्व्हिस (Super Daily Service) बंद केली आहे. स्विगीच्या सुपर डेली सर्व्हिस अंतर्गत, दूध, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू (Daily Essential) आणि किराणा सामानाची (Groceries) डिलिव्हरी दिली जाते.

 Swiggy's service is at a loss, Mumbai-Pune service is closed
Swiggyची ही सर्व्हिस ठरली तोट्याची, मुंबई-पुण्यात सेवा बंद  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • स्विगीने सुपर डेली सर्व्हिस (Super Daily Service) बंद केली आहे.
  • स्विगीची ही सर्व्हिस सबस्क्रिप्शनवर (Subscription) आधारित आहे.
  • 12 मे 2022 पासून या शहरांमध्ये सुपर डेली सर्व्हिस मिळणार नाही. कंपनीनं 10 मे पासून नवीन ऑर्डर्स घेणं बंद केलं आहे.

नवी दिल्ली : ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपनी स्विगीने (Swiggy) देशभरातील पाच प्रमुख शहरांमधील सुपर डेली सर्व्हिस (Super Daily Service) बंद केली आहे. स्विगीच्या सुपर डेली सर्व्हिस अंतर्गत, दूध, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू (Daily Essential) आणि किराणा सामानाची (Groceries) डिलिव्हरी दिली जाते.  दरम्यान सुपर डेली सर्व्हिस बंद करण्याच्या स्विगीच्या या निर्णयामुळे त्यांच्या कस्टमर्सना मोठा फटका बसणार आहे. त्यांना आता पर्यायी सर्व्हिस शोधावी लागेल.

स्विगीची ही सर्व्हिस सबस्क्रिप्शनवर (Subscription) आधारित आहे. म्हणजेच ग्राहकांना ही सर्व्हिस मिळवण्यासाठी अगोदर सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. या सर्व्हिसमुळे स्विगीला तोटा होत असल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. या आव्हानात्मक काळात आपला खर्च आणि तोटा कमी ठेवण्यावर कंपनी भर देत आहे. कंपनी अद्याप या सर्व्हिसमधून नफा मिळवू शकलेली नाही. या शहरांत मुंबई-पुण्यासह पाच शहरांचा समावेश आहे.

या शहरांमध्ये बंद झाली सर्व्हिस

ज्या शहरांमध्ये स्विगीची सुपर डेली सर्व्हिस बंद झाली आहे, त्यामध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई चेन्नई, पुणे आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. 12 मे 2022 पासून या शहरांमध्ये सुपर डेली सर्व्हिस मिळणार नाही. कंपनीनं 10 मे पासून नवीन ऑर्डर्स घेणं बंद केलं आहे. ज्या कस्टमर्सच्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक आहेत त्यांना ते परत केले जातील. सर्व्हिस बंद झाल्यानंतर पाच ते सात बिझनेस डेजमध्ये कस्टमर्सच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

देशातील काही कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये स्विगीनं सुपर डेली सर्व्हिस बंद केली असली तर बेंगळुरूमधील (Bengaluru) ही सबस्क्रिप्शन सर्व्हिस पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. स्विगीचे सह-संस्थापक आणि सुपर डेलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) फानी किशन एडेपल्ली (Phani Kishan Addepalli) म्हणाले की, 'बिझनेस रिकन्स्ट्रक्शनचा एक भाग म्हणून काही शहरांमध्ये ही सर्व्हिस बंद केली जात आहे. त्यासाठी डिटेल प्लॅन तयार करण्यात आला आहे. मात्र, बेंगळुरूमध्ये ही सर्व्हिस वाढवण्यासाठी दुहेरी प्रयत्न केले जातील.'

टारगेट मिळवण्यावर फोकस 

या संदर्भात फानी किशन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मेल पाठवला आहे. मेलमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'आपण आता कस्टमर्सच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनलो आहोत. असं असूनही दुर्दैवानं अद्याप आपल्याला नफा (Profit) मिळवता आलेला नाही. त्यामुळे आपण आता आपल्याला बिझनेस टारगेटपासून दूर नेणाऱ्या सर्व्हिसवर वेळ आणि पैसे खर्च करणं बंद करत आहोत.'पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, मार्केटमध्ये स्वतःचं वेगळं आणि भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी, आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारचे बदल केले पाहिजेत ज्यामुळे आपल्याला आपलं टारगेट (Target) अचिव्ह करण्यात मदत होईल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी