Swiggy will use drones for home delivery : खाण्यापिण्याचे पदार्थ घरपोच आणून देणारा ऑनलाइन फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी लवकरच ड्रोनच्या मदतीने होम डीलिव्हरी करणार आहे. स्विगी इन्स्टंट ग्रोसरी डीलिव्हरी सर्व्हिस मार्ट ही सेवा ड्रोनच्या मदतीने चालविणार आहे. यासाठी स्विगीने चार ड्रोन स्टार्टअप कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्यांच्या ड्रोनच्या मदतीने ग्रोसरीची होम डीलिव्हरी केली जाईल.
गरुड एअरोस्पेस, स्कायएअर मोबिलिटी, एएनआरए+टेकईगल कंसोर्टिया आणि मारुत ड्रोनटेक या ड्रोन स्टार्टअप कंपन्या स्विगीसोबत काम करणार आहेत. ड्रोन एका गोदामातून मालाची पिशवी घेईल आणि थेट ग्राहकाच्या घरी जाऊन होम डीलिव्हरी करेल. या व्यवस्थेत पेमेंट ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे ग्राहकाची मागणी लवकर पूर्ण होईल. मानवी श्रम, वेळ आणि पैशांची बचत होईल.
सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर बंगळुरू तसेच दिल्ली-एनसीआर येथे ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी केली जाईल. यासाठी स्विगी गरुड एअरोस्पेस कंपनीची बंगळुरूत आणि स्कायएअर मोबिलिटी कंपनीची दिल्ली एनसीआरमध्ये मदत घेणार आहे. पहिला प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यावर कंपनी दुसरा प्रयोग सुरू करणार आहे. यात एएनआरए+टेकईगल कंसोर्टिया आणि मारुत ड्रोनटेक या कंपन्या सहभागी होतील. दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यास स्विगी ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी सुरू करणार आहे.
ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी सुरू करण्यासाठी संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी स्विगी ड्रोनद्वारे होम डीलिव्हरी सुरू करणार आहे.