New Wage Code | कर्मचाऱ्यांच्या हाती येणारे वेतन घटणार, वेतनवाढीच्या आनंदाला लागणार ग्रहण, पाहा काय होणार बदल

Salary Structure | वेतनवाढीच्या आनंदावर आता ग्रहण लागू शकते. वेतनवाढ झाल्यामुळे हाती येणारा पगारदेखील (Salary) वाढेल असे कर्मचाऱ्यांना वाटत असते. मात्र आता असे होणार नाही. केंद्र सरकारचा नवीन वेज कोड (New Wage Code) म्हणजे नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर तुमच्या हाती येणारा पगार (In hand Salary) घटणार असून तुमच्यावर कराचा बोझादेखील वाढू शकतो.

New Wage Code
नवीन वेतन संहिता आणि सॅलरी स्लिप 
थोडं पण कामाचं
  • नवीन वेज कोड लागू झाल्यानंतर बदलणार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे स्वरुप
  • कर्मचाऱ्यांच्या हाती येणारा पगार घटणार
  • अधिक वेतन असणाऱ्यांना बसणार कराचा फटका

New Wage Code | नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात फेरबदल (Salary structure) केले आहेत. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले देखील आहे. मात्र वेतनवाढीच्या आनंदावर आता ग्रहण लागू शकते. वेतनवाढ झाल्यामुळे हाती येणारा पगारदेखील (Salary) वाढेल असे कर्मचाऱ्यांना वाटत असते. मात्र आता असे होणार नाही. केंद्र सरकारचा नवीन वेज कोड (New Wage Code) म्हणजे नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर तुमच्या हाती येणारा पगार (In hand Salary) घटणार असून तुमच्यावर कराचा बोझादेखील वाढू शकतो. (Take home salary of employees to get reduced, Salary slip to be changed, check the details)

भत्त्यांमध्ये होणार कपात

कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पॅकेजमध्ये म्हणजे कॉस्ट टू कंपनीमध्ये (Cost-to-company) तीन ते चार घटक असतात. यात मूळ वेतन (Basic Salary), हाउस रेंट अलाउंस (HRA), पीएफ (PF), ग्रॅच्युईटी (Gratuity), पेन्शन (Pension) आणि करबचत करणारे एलटीए, एंटरटेनमेंट अलाउंस यांचा समावेश असतो. आता नव्या वेज कोडमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याचे भत्ते ते त्याच्या मूळ वेतनापेक्षा जास्त असता कामा नये म्हणजे भत्त्यांचे वेतनातील प्रमाण एकूण वेतनापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा असता कामा नये. त्यामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार जर ५०,००० रुपये असेल तर त्याची बेसिक सॅलरी २५,००० रुपये असली पाहिजे आणि बाकीचे त्याचे भत्ते २५,००० रुपयांमध्ये असले पाहिजेत. म्हणजेच सर्व कंपन्यांना आता कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढवावी लागणार आहे. आतापर्यत कंपन्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २५ ते ३० टक्के ठेवत असत आणि त्यात बाकीचा हिस्सा हा भत्त्यांचा असायचा. मात्र आता कंपन्यांना बेसिक सॅलरी ५० टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीत कंपन्यांना नव्या वेज कोडच्या नियमांना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्येच कपात करावी लागणार आहे.

असे बदलेल वेतनाचे स्वरुप

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार १ लाख रुपये आहे आणि त्याची बेसिक सॅलरी ३०,००० रुपये आहे. कर्मचारी आणि कंपनी दोघांचेही पीएफमध्ये १२-१२ टक्के योगदान असते. म्हणजेच कर्मचारी आणि कंपनी दोघेही पीएफसाठी ३,६०० रुपयांचे योगदान देतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याच्या हाती येणारा मासिक पगार असेल ९२,८०० रुपये. मात्र जेव्हा बेसिक सॅलरी ५०,००० रुपये होईल, तेव्हा कर्मचाऱ्याच्या हाती येणारा पगार असेल ८८,००० रुपये. कारण बेसिक सॅलरी वाढल्यामुळे पीएफसाठीचे १२ टक्क्यांचे योगदानदेखील वाढेल. त्यामुळे दर महिन्याला ४,८०० रुपयांचे योगदान पीएफसाठी होईल आणि तितकी रक्कम जास्त कापली जाईल. याच पद्धतीने ग्रॅच्युईटीच्या रकमेतदेखील वाढ होईल.

Read Also :तुमच्या पीएफ खात्याबरोबर ७ लाखांचा हा फायदा मोफत मिळतो...

कर्मचाऱ्यांच्या करावर देखील होणार परिणाम

नवीन वेज कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतनाची रचनाच पूर्णपणे बदलून जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना जास्त करावा भरावा लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे त्यांना अधिक कर भरावा लागणार आहे. कारण त्यांच्या सर्व भत्त्यांचा समावेश कंपनीला त्यांच्या वेतनाच्या ५० टक्क्यांमध्येच करावा लागेल. साहजिकच जास्त वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन वाढणार आहे. परिणामी त्यांना अधिक कर भरावा लागेल. त्याउलट कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कराचा कमी बोझा पडणार आहे. कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुलनेने कमी फटका बसणार आहे. शिवाय यामुळे कर्मचाऱ्यांचे पीएफसाठीचे योगदानदेखील वाढेल. त्यांना कलम ८० क अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यतच्या योगदानावर टॅक्स डिडक्शन म्हणजे करवजावटीचा लाभ मिळेल जेणेकरून त्यांच्यावर कराचा बोझा जास्त येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी